नमस्कार मित्रांनो, मी आमच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात गेलो होतो. नवऱ्या मुलाचा मेकअप झाला का? अंजु आज सकाळी दिलेला रुखवत लावला का? अंजु सगळ्यांचा नाश्ता झाला का? असे बरेचसे प्रश्न माझ्या कानावर येत होते, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एक सावळ्या रंगाची तरतरीत मुलगी देत होती. या समारंभात सर्व कामे अगदी उत्तम रित्या आणि जबाबदारीने ती करत होती.
हीच मुलगी अंजु असावी असं मला वाटलं म्हणून मी माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या आत्याला विचारलं की आत्या कोण आहे ही अंजु तेव्हा तिने सांगितलं हीच अंजु. घरची परिस्थिती तशी बेताची होती, त्यात वडील नाहीत आणि आई स्वयंपाकाची कामे करत होती. अंजु शिकत ही आहे न आपल लांबच नातं ही आहे.
तेवढ्यात अंजु आमच्या जवळ आली आणि आत्याने आमची ओळख करून दिली, आत्या माझ्याकडे बघत म्हणाली हा माझा भाचा विद्याधर आणि अंजु माझ्याकडे बघून नमस्कार म्हणाली. सावळा रंग, मोठे थरथरीत नाक, पाणीदार डोळे, चेहऱ्यावर मोहक हास्य बघून मी तिच्याकडे आकर्षित झालो. लग्न झाले, जेवण झाले इतक्यात माझे काका मला शोधत आले आणि विचारले की तुला मोटार सायकल येते का? तेव्हा मी मान डोलावली.
ते म्हणाले अरे अंजुला घरी सोडायचे आहे तेव्हा मी ताडकन उभा राहिलो. अंजु मला रस्ता सांगत होती आणि मी गाडी चालवत होतो. अंजुच्या घरी पोहोचलो, साधं घर अगदी व्यवस्थित आणि टापटीप ठेवलेलं होतं. अंजुने चहाचा आग्रह केला पण खरंतर श्रीखंडाच्या जेवणावर काहीच नको होते पण तिच्यासोबत थोडा वेळ मिळेल म्हणून मी हो म्हणालो.
अंजु अगदी मनमोकळे पणाने बोलत होती ती एम एला ऍ डमिशन घेणार होती. माझ्या एका मित्राचं नुकतंच एम ए झालं होतं आणि त्याची पुस्तके पडून होती म्हणून मी तिला म्हणालो की मी तुला पुस्तकं आणून देतो तेव्हा ती हो म्हणाली. पुस्तके द्यायच्या निमित्ताने आणि इतर कारणामुळे मी अंजुला भेटत राहिलो. ती नेहमी मनमोकळे पणाने बोलायची पण अंतर राखुनच.
आई असल्यावरच येण्यासाठी तिने मला अप्रत्यक्षपणे सुनावलं ही होतं. बरेच दिवस गेले मलाही चांगली नोकरी मिळाली आणि अंजूचीही फायनल ची परीक्षा झाली. शेवटी मी जे आहे ते विचारायचे ठरवले आणि एकदा तिची आई नसताना घरी गेलो आणि तिला म्हणले मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मी घरात गेलो आणि म्हणले की मी विद्याधर, वय 25, बँकेत नोकरी करतो.
पगार 40000 आहे आणि पुढे वाढुही शकतो, आ र्थिक परिस्थिती चांगली आहे, स्वतःचे घर आहे मी हे सगळे एका दमात बोलून गेलो. माझ्याकडे आश्चर्याने बघत ती मला म्हणाली पण तू हे मला का सांगत आहेस. तेव्हा मी म्हणालो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तेव्हा ती म्हणाली हे शक्य नाही आपल्या परिस्थिती खुप फरक आहे आणि तुझे वडील मला सुन म्हणून घेणार नाहीत. ते म्हणतील चांगला मुलगा पाहून हिने जा ळे टाकले.
तेव्हा मी म्हणालो की आपण वेगळे राहू पण ती नाहीच म्हणाली एकुलत्या एक मूलग्याला आपल्या आई वाडीलांपासून तोडण्याचे मी पाप करणार नाही. मी तिला हे ही विचारले की तुझ्या मनात दुसरे कोणी आहे का त्यावर ती म्हणाली तुला असे वाटते का? मी हे ही म्हणालो की पाहिजे तर मी तुझी आई असताना येतो तरीही ती नाहीच म्हणाली. अंजु माझीच चूक झाली मी माझ्या भावी आयुष्याची स्वप्ने तुझ्यासोबत रंगवली येतो मी असे म्हणत मी दुःखाने तेथून निघून गेलो.
आज या गोष्टीला सात वर्षे झाली आहेत मी त्याच कार्यालयात बसलो आहे. जुनीच वाक्य ऐकू येत आहेत पण फरक इतका होता की अंजु ऐवजी ती आता अंजु ताई झाली होती. ती प्रत्येकाला नाश्ता कसा झाला आहे हे आवर्जून विचारत होती. ती आता थोडी जाड झाली होती. पण मला मात्र ती टाळत होती इतक्यात माझी बायको जवळ आली आणि तिने अंजुला हाक मा रली आणि मी घाबरलो पण आम्ही विपरीत काहीच केले न्हवते.
तिने अंजुला विचारले हे केटरिंग चे काम तुम्ही केले का? छान केलं आहे असं म्हणत तिने पुढच्या महिन्यात असणाऱ्या आपल्या दिराच्या लग्नाची ऑर्डर तिला देऊन टाकली. तेवढ्यात बायकोला कोणी हाक मा रली म्हणून ती उठून गेली. अंजु ही उठत होती तेवढ्यात मी तिला म्हणालो की थांब अंजु, कशी आहेस? दिसते तशीच आहे, लग्न ठरले तेव्हा छोटी मोठी स्वयंपाकाची कामे घेत होते मी धंदा वाढला आणि आज आम्ही दोघेही स्वतंत्र कामे घेतो आणि हाताखाली माणसे ही आहेत.
एकेकाळी जे शक्य वाटत नव्हतं ते शक्य झालं आहे बंगला आहे, कार आहे, बँक बॅलन्स आहे अजून काय पाहिजे. मी म्हणालो सुखी आहेस ना त्यावर ती मोठ्याने म्हणाली अर्थातच आणि उठून गेली. मी सुन्न झालो, डोळ्यात पाणी आले म्हणून मी चेहरा धुण्यासाठी बेसिन जवळ गेलो न पाहिले तर अंजु त्या कोपऱ्यात साडीने आपले डोळे पुसत होती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचे पेज ला ईक, शे अर आणि फॉलो करा.