सावी उठ आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे. सावीची आई रा गाने तिच्याशी बोलू लागली. रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस. सावी काळ रात्री काम संपून उशिरा घरी आल्याने निवांत झोपली होती. सकाळ सकाळी आईने आज चहा देऊन उठवण्याच्या ऐवजी आरडा ओरडा करून का उठवलं हे तिला समजेना. काय बोलायचं असेल याचा विचार करतच ती अंघोळीला गेली.
बाहेर येऊन आवरून गच्चीत जाऊन पुस्तक वाचत बसली. हे काय आहे? आईने चढ्या आवाजातच बोलायला सुरवात केली. साविने सुरवातीला दुर्लक्ष केलं, पण आईने आता तीच्या समोर ते पाकीट टाकून पुन्हा चिडचिड सुरु केली. आई पाठोपाठ सावीची बहिण शैला सुद्धा बोलू लागली. बाबा मात्र नेहमी प्रमाणे शांतच होते.
अरे देवा हे पाकीट काल पर्स मध्येच राहील वाटत असा, म्हणून सावीने ते पाकीट आईकडून काढून घेतलं आणि पुन्हा पर्स मध्ये ठेऊन पुस्तकात लक्ष घालून बसली. साविने हा सगळा प्रकार येवढा थंडपणे सोडून दिल्यामुळे सावीची आई आणि बहिण दोघीही तिच्यावर आणखीनच चिडल्या आणि तीला काहीही बोलू लागल्या.
सावीचे लक्ष अजूनही पुस्तकातच होते, तरीही तिच्या म नात कालचा प्रसंग होता काल भास्कर आणि ती पुन्हा मैत्रिणीच्या रूमवर भेटले त्या सगळ्या प्रसंगानंतर ती उशिरा घरी आली, आणि तशीच झोपून गेली. गडबडीत कं डो मचे पाकीट तसेच तिच्या पर्स मध्ये राहून गेले. नेहमी तर पाकीट टाकून घरी आलेली असते मी काल पाकीट पर्स मध्येच कस काय राहील? याचा ती विचार करू लागली.
ती आणि भास्कर गेली चार वर्षे एकमेकांना भेटतात, नेहमीच मैत्रिणीच्या रूम वर भेटून रा त्रीची मजा घेणे ठरलेले असते. आईचा चढलेला पारा आता सविला सर्वकाही सांगण्यास मजबूर करत होता. कोण आहे तो? आईने विचारताच सावी बोलू लागली तो माझा क्लासमेट आहे. आम्ही गेली चार वर्षे एकमेकांना भेटतो आणि एकमेकांशी सं बं ध ठेऊन आहोत.
मग लग्न वगैरे काही करणार आहेस कि अशीच राहणार आहे? आई साविच्या कोरडेपणाला वैतागून विचारू लागली. त्याच लग्न झालय आणि आता या वयात मी तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करणार आहात का ? आधी तुमची सर्वांची पोट भरली तर तुम्ही माझा विचार करणार न.. मला म न आहे, मलाही भावना आहेत हे तुम्हाला कधी समजणार? सावीचा पारा देखील आता चढला होता.
वयाच्या पंधराव्या वर्षापासून नोकरी करत आहे मी तुम्हा सगळ्यांना पोसत आहे, माझ मन मा रून जगत आहे, अजून किती दिवस अशीच राहू? मनाला समजावेन मी, पण श री राचं काय? श री राची भूक कशी भागवू? तू बाबांच्या जवळ जातेस शैला तिच्या नवऱ्याशी म नात येईल तेंव्हा दिवस रात्र न बघता ल ग ट करते ते मी सगळ शांतपणे बघत राहायचं का?
मला देखील वाटत माझा अस कोणी असाव, मला प्रेमाने कोणीतरी पहाव, माझं कौतुक कराव. पण त्याचा काही उपयोग आहे का? तुम्हा सगळ्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी सगळे माझ्यशी गोड बोलता, नंतर मलाच नावे ठेवता, मला हे काहीच स माजात नाही अस वाटत का तुम्हाला?
“हे सगळ आम्हाला पटणार नाही, आम्ही हे सगळ स हन करणार नाही, अस जर आम्ही म्हणालो तर? “साविच्या आईने नि राशेने शेवटचा पर्याय वापरला. तसा असेल तर मी आत्ता घर सोडून जायला तयार आहे. महिन्याचा तुमचा खर्च कसा भागवायचा ते तुम्ही बघा. मला देखील आयुष्यभर तुमच्या साठी राबायचा कंटाळा आलाय.
तुम्हा सर्वांचे पैसे कमावण्याच मशीन बनून राहण्यापेक्षा मी माझी स्वतंत्र राहीन. माझ्या गरजा मी स्वतः पुरवीन, बघा तुम्हाला मंजूर आहे का? आणि एक शेवटच तू मला समोरून प्रश्न म्हणून तुला सांगते आई, माझ्या पर्समधून असे चो रून पैसे घेण बंद कर.. सावी एवढे बोलून तावातावाने निघून गेली. हताश चेहऱ्याने आई तिच्याकडे पाहत राहिली.