मुलीच्या पर्समध्ये आईला जेव्हा कं’डोमचे पाकीट सापडते.. तेव्हा मुलगी काय म्हणते पहा.. एकदा नक्की पहा..

लाईफ स्टाईल

रविवारची सकाळ म्हणून ती उशिरा उठली व तिला जाणवले घरातील वातावरण थोडे वेगळेच आहे, एक प्रकारची तणावपूर्ण शांतता घरात पसरली होती पण तिने लक्ष न देता तीची तयारी करायला सुरुवात केली. इतक्यात आईने मोठ्या आवाजात सांगितले आज दुपारी कुठे जाऊ नकोस, थोडे बोलायचे आहे तुझ्याशी. ती पटकन बाथरूम मध्ये शिरली, तिच्या मनात शंका आली.. काय असेल ?

याचा विचार मनातून जाईना पण काय होईल ते होईल एक दिवस हे घडणारच होते याची कल्पना तिला होतीच, तशी मनाची तयारी देखील तीने करून ठेवली होती, जास्त विचार न करता समोर आसलेला नाष्टा करून पुस्तक घेऊन गॅलरीत बसली तोपर्यंत थोड्यावेळाने आईची हाक आली. हॉलमध्ये येताच समोर लहान बहीण आणि तिचे मिस्टर बसलेले दिसले तिची नजर फिरली,

काही न बोलता ती समोर येऊन बसली आणि समोर चार न्या’याधीश बसले होते, कधी काही न बोलणारे बाबा, लायकी नसताना लुडबुड करणारी बहीण आणि वा-सनेने भरलेली नजर असणारा तिचा नवरा. हे काय आहे ? हातातलं पाकीट उंचावत आईने खड्या आवाजात विचारले. च्यायला ही भानगड आहे होय. मनातल्या मनात ती विचारात पडली.

नेहमी तर उरलेली पाकिटे न चुकता फेकून देते यावेळी कशी विसरले? तिला कालची संध्याकाळ आठवली, दर वेळेप्रमाणे काल तो तिला तिच्या मैत्रिणीच्या रूमवरती भेटला होता, ते दोघे महिन्यातून दोनदा तर भेटतच होते, काल त्याच्याबरोबरचा कार्यक्रम आटपून ती घरी आली आणि तशीच झोपून गेली. पर्स मधून ती वस्तू काढायची तिच्या ध्यानात आले नाही,

कधी ना कधी हा प्रसंग येणार याची तिला कल्पना देखील होतीच आणि त्यासाठी तिने मनाची तयारी केली होती. कोण आहे तो? किती दिवस चालू आहे तुझे? आईचा आवाज चढला, बहिण रोखून पाहू लागली, नेहमीप्रमाणे शांत असणारे बाबा गप्प बसले होते. मित्र आहे, चार वर्षे माझ्या बरोबर आहे ती शांतपणे म्हणाली. लग्न करणार आहेस का नाही ? असा प्रश्न समोरून आला,

यावर ती म्हणाली – त्याचे लग्न झाले आहे, त्याला मुले देखील आहेत. असं वागायला काहीच कसे वाटत नाही का तुला ? लोक काय म्हणतील? आपल्या घराला काही इज्जत आहे की नाही. त्याचे काहीच वाटत नाही का तुला? तरी कसे बसे बहिणीचे लग्न झाले. यावर ती म्हणाली – मला यामध्ये चुकीचे काहीच वाटत नाही, आणि का वाटावे ? माझे वय किती आहे सांगू शकाल का तुम्ही ?

माझे लग्न करायला हवे याची आठवण तरी आहे का तुम्हाला ? तुझे बाबा नाकर्ते, हे असे, असून नसल्यासारखे, तरी मी तुम्हा दोघींना शिकवले, दोघी शिकलात, नशिबाने म्हणून चांगली नोकरी ताबडतोब लागली. बहिणीचे शिक्षण झाले की तुझे लग्न करू असा विचार केला पण ही त्याच्या प्रेमात पडली, शिक्षण अर्धे सोडून तिचे लग्न करावे लागले, अजूनच उशीर झाला, असं सगळं वाढत गेले.

तुझे लग्न जमेना हीच परिस्थिती होती म्हणून असे झाले, म्हणून तू अस करायचं का ? ती पुढे बोलली, स्पष्ट बोलते आहे, शरीराची भूक मिटवणे कारण मला शरीर आहे, मन आहे, भावना आहे, किती दिवस असंच जगू मी ? आजही तू बाबांच्या जवळ जातेस दिसत नाही का मला? माझी बहीण वेळ न पाहता दरवाज्याची कडी लावून आपल्या नवऱ्या बरोबर काय करत असते ते कळत नाही का मला ?

आणि तरीही तिचा नवरा माझ्याकडे वा-सनेच्या नजरेने पहात नेहमी अं’गचटीला येण्याची संधी शोधत असतो, हेही कळत नाही का मला? उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करणार्‍या आपल्या बहिणीला हाताने थांबवत ती म्हणाली, त्यांच्याने होत नाही तर त्यांना पाठीशी घालून तू माझ्या पगारावर घर चालवतेस, बहिणीचे शिक्षण अर्धवट राहिले तर का ! तिला चौथा महिना चालू झाला म्हणून ना !

काय करतो तिचा नवरा पंधरा दिवस तरी इथेच पडलेला असतो, माझी आता पस्तीशी पूर्ण झाली , मलाही वाटते लग्न व्हावे, मुलं व्हावी, नवर्‍याने प्रेमाने पहावे. हळदी-कुंकूला जावे पण लग्न झाले तर पैशाची मीटर बंद होईल याची भीती आहे तुम्हाला ! तुमची काळजी आहे म्हणून लग्न करत नाही मी. म्हणून शरीरही तसेच ठेवू का ? चार वर्षे झाले तो माझ्या आयुष्यात आला, महिन्यातून दोन वेळा भेटतो आम्ही,

या व्यतिरिक्त कोणताही सं’बंध नाही माझा त्याच्याशी. एकमेकात गुंतायचे नाही हे ठरवलेले आहे आम्ही. हे चालूच राहणार. तिच्या या विषयाने सगळे थंड पडले आणि हे आम्हाला मान्य नसेल तर? आईने निर्वाणीचा प्रश्न केला. तर आत्ता याक्षणी मी घर सोडून जायला तयार आहे, तुमची ही दुसरी मुलगी आणि लाडका जावई काळजी घेतील तुमची तिने सांगितले. ते ऐकून सर्वच शांत झाले.

ठीक आहे, जे आहे तसेच चालू दे, तुझ्या बाबतीत थोडा अन्याय झाला आहे हे कळते आम्हाला, आईने शरणागती पत्करली. हो, पण आज एक प्रश्न विचारून तुम्ही माझे सं-बंध क्लीयर केले आहेत. तेव्हा यापुढे तू माझ्या पर्समध्ये हात घालून पैसे काढायचे बंद कर आणि असे बोलून ती उठली आणि गॅलरीत जाऊन पुस्तक वाचत बसली.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *