नमस्कार मित्रांनो, मुलगी वयात येते व पा ळी येते म्हणजे नक्की काय होते, हे आपल्या मुलींना कस सांगायचं, आणि खरं तर त्यावेळचे शा रीरिक बदल बघून मुली फार घाबरून गेलेल्या असतात, नवे बदल पाहून मुली गोंधळलेल्या असतात. पण यावेळी उत्तम मार्गदर्शन देणे गरजेचे असते त्याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाची वाढ खुंटते.
अस करू नको, तस करू नको, इकडे पळू नको या सर्व गोष्टी मुलींना खुरडवून टाकते. काही मुली बं डखोर होतात काही वेळेला जगाला सामोरे जायला घाबरतात. पण अशावेळी आईचे कर्तव्य आहे की आईने मुलीला मा नसिक आणि शा रीरिक दृष्ट्या या गोष्टीसाठी तयार केले पाहिजे आणि यासाठी आपण मासिक पा ळी म्हणजे काय हे आयुर्वेदाच्या भाषेत समजून घेऊया.
स्त्रीयांमध्ये मासिक पा ळी येणं हे आ रोग्य संपन्न तरी असल्याचं लक्षण आहे. मासिक पा ळी साधारण वयाच्या 12 व्या वर्षांपासून सुरू होते ते सामान्यतः वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत टिकते. वयाच्या 10 ते 15 वर्षापर्यंत मुलींमध्ये अनेक बदल होतात. या काळात शरीरातील सात ही धातूंची वाढ पूर्ण झालेली असते.
मुलींच्या शरीरातील स्त्री विशेष अवयवांना परिपूर्णता येऊ लागते आणि ग र्भाशयाचा विकास सुरू होतो. अं डाशयामध्ये दर महिन्याला एक वि ष तयार होऊ लागते जे ग र्भ नलिकेद्वारे ग र्भाशयात येते व ग र्भाशयात र क्त आणि मां सपे शींची गादी तयार होऊ लागते. या बीजाचा जर पुढील 14, 15 दिवसांत पुरूष बिजाशी संपर्क आला नाही तर ते बी ज तयार झालेल्या र क्त मां स पे शीसह ग र्भा द्वारे यो नीतुन बाहेर पडते.
म्हणजेच मासिक पा ळी येते. हा काळ साधारणतः 3 ते 4 दिवसांचा असतो. जेव्हा मुली वयात येऊ लागतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये काही बदल घडून येतात ते बदल कोणते आहेत ती माहिती घेउया. या बदलांच्या आधारे तुम्ही अंदाज लावू शकता की लवकरच मासिक पा ळी येईल.
1 मुलींना नक्की कधी मासिक पा ळी येईल हे सांगता येत नाही पण कधी कधी ही लवकर येते, म्हणजे वयाच्या 12 ते 13 व्या वर्षापर्यंत तर कधी कधी काही मुलींना वयाच्या 16 व्या वर्षी येते. हे आपला आहार आणि जी वनशैलीवर अवलंबून आहे.
2 जेव्हा मुलींच्या स्त नाचा आकार अचानक वाढू लागतो तेव्हा तिचा कालावधी जवळ आलेला असतो. आ रोग्य शास्त्रानुसार मुलींचे स्त न बाहेर येण्यास आणि परिपूर्ण होण्यास चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. जर हा बदल तुमच्या मुलीमध्ये दिसत असेल तर मुलीला मासिक पा ळी बद्दल माहिती देणे सुरू करा.
3 मुलगी वयात येण्याच्या एक, दोन वर्ष आधी मु लीच्या अं डर आर्म मध्ये आणि यो नी वर के स येऊ लागतात, अशा वेळी आपल्या मुलीला मासिक पा ळीबद्दल आईने सांगायला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून मुलगी होणाऱ्या बदलांना घाबरणार नाही. 4 मासिक पा ळी सुरू होण्याच्या काही महिने आधी मु लींच्या यो नीतुन पांढरा स्त्राव येण्यास सुरुवात होते. मासिक पा ळी येण्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे मुलीला याबद्दल माहिती द्या.
जेव्हा मुलगी 12 ते 13 वर्षांची होते तेव्हा आईने मुलीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जेव्हा पाहिल्यादा मासिक पा ळी येते तेव्हा मुलगी घाबरते त्यामुळे मुलीला आधीच जागरूक केले पाहिजे आणि मासिक पा ळी विषयी सर्व बेसिक गोष्टी मुलीला समजावून सांगितल्या पाहिजेत जेणेकरून तिला नवीन काही वाटणार नाही आणि ती घाबरणार नाही. ही माहिती आवडली असल्यास आमचे पेज ला ईक, शे अर आणि फॉ लो करा.