मुलगी पैशांसाठी गावाकडचे घर विकायला काढते पण शेवटी जे घडते…प्रत्येक आई वडिलांनी एकदा पहाचं

लाईफ स्टाईल

” उद्या संध्याकाळ पर्यंत पोहचते काका मी गावी !”असा म्हणत सुजाताने फोन ठेवला आणि गरम चहाचा कप घेऊन ती बाल्कनीत असलेल्या झोपाळ्यावर जाऊन बसली.तिथून सूर्यास्त काय मस्त दिसायचा. अस्ताला जाणारा सूर्यदेव जणू उद्या मी आजच्यापेक्षा चांगला दिवस घेऊन येईन असाच सांगत असल्याच तिला जाणवलं. चहा घेऊ लागली. चहाच्या एका घोटानेच तीच मन शांत आणि प्रसन्न झाल.

” जायलाच हव का गावी?” नवऱ्याने थोड्या नाराजीनेच तिला विचारल.त्याच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली,” हो,घराला कोणीतरी चांगलं गिर्हाईक मिळालंय, मागेल ती किंमत देईल अस सांगितला काकांनी. त्यामुळे जाऊन येते. आज नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठली ती, कधी एकदा आपल्या गावाकडच घर डोळेभरून पाहते अस तिला झालेलं जणू. त्याच आठवणीत काल रात्रभर जागी राहिली.

रामू सांगितलेल्या वेळी गाडी घेऊन हजर झला आणि ती भरधाव वेगाने तिच्या गावी पोचली.ती आत्ता जरी गाडीतून जात असली तरी मानाने मात्र कधीच गावी पोचलेली होती. तिच्या घराच्या अंगणात बागडू लागली होती. तीच घर म्हणजे चौसोपी वाडाच होता. गेट उघडून समोर गेल कि वडाच मोठ झाड, त्याच्या पराब्यांच्या झोपाळ्यावर मैत्रिणींचे खेळ रंगायचे. त्याच्याच पारावर संध्याकाळी अप्पांचा संस्कारवर्ग चालायचा, हनुमान चालीसा, रामरक्षा, शुभंकरोती अस सगळं म्हणून झाला कि अप्पा सगळ्यांच्या हातावर एक एक रेवडी ठेवत प्रसाद म्हणून.

त्यानंतर पाढे, मराठी व्याकरण, इंग्रजीचे शब्द आणखीन काय काय म्हणून घेत असत अप्पा.. त्यामध्ये ज्याचा नंबर येईल त्याला मात्र लिमलेटच्या गोळ्या मिळत असत.त्या गोळ्यांवर मात्र सगळ्यांचाच डोळा असे. अभ्यास झाला कि माई गरम गरम तूप भात खायला आत बोलवायची.तो खून पुन्हा पडवीत जाऊन बसलं कि मग दादा च्या गोष्टींचा डाव रंगात येई. गोष्टी ऐकत ऐकत सारे मग तथेच झोपी जात असू. सकाळी उठल्यावर पुन्हा मग धमाल सुरु…

अंघोळीसाठी मागच्या विहिरीवर नंबर लाऊन बसायचं,अंघोळ झाल्याझाल्या देवाला नमस्कार करून माजघरात जाऊन बसायचं आणि माईने केलेली गरम भाकरी खायची आणि शाळेला धूम ठोकायची. हाच नित्यक्रम सतरा वर्षे सुरु राहिला. ” इथून दोन फाटे आहेत बाई, कोणत्या फाट्याने आत घेऊ गाडी?” रामू तिला विचारू लागला. त्याच्या प्रश्नाने ती भानावर आली. क्षणभर गोंधळून इकडे तिकडे पाहू लागली, तोच तिची नजर डाव्या बाजूच्या निंबोणीच्या झाडाकडे गेली.

“कधी वाट चुकलीस तर हे निमोन्याच झाड लक्षात ठेव पोरी”,असा माईने तिला लहान असतानाच सांगितलं होत.ती खुण अजूनही तिच्या पक्की लक्षात राहिलेली.तिथून आत जाताच समोरच गावाची स्वागत कमान दिसली. कमानीपासून रास्यांपर्यंत खूपशा गोष्टी आता बदललेल्या होत्या. कच्च्या पायवाटांची जागा आता पक्क्या डांबरी रस्त्याने घेतली होती. साध्या कौलारू शाळेची इमारत आता भव्य पक्क्या विटांच्या आणि सिमेंटमध्ये हरवून गेली होती.

घरांची अंगणे लहान होउन दुकानांचा डोलारा वाढत चालल्याचे तिला प्रकर्षाने जाणवू लागले होते. तिने रामू काकांना गाडी उजव्या हाताला घ्यायला सांगितली. इथे मात्र काही फारसा बदल झाल्याचे जाणवत नव्हते. समोर तिचा वाडा तिची वाट पाहत थांबला होता. आणि त्याच्या समोरच तिच्या काकाचं घर होत. ती आधी तिथे गेली. काकूने मायेने तिला जवळ घेतलं. वयाने ठाकली असली तरी माया मात्र अजूनही तशीच होती. वाहिनीने चहा आणून दिला.

चुलीचा मंद सुगंध चहाची लज्जत अजूनच वाढवत होता. चहा पिऊन ती अजूनच उत्साहित झाली. मी वाड्यात जाऊन येते म्हणून उठली. जेवायला इकडेच ये म्हणून वाहिनीने आग्रह केला, तिचा आग्रह मोडण तिला जमल नाही. किल्ली घेऊन ती वाड्याच फाटक उघडून आत गेली. काकांनी येतानाच सांगितलं लक्ष्मीबाई रोज येऊन वाडा झाडून जात असते. तू पैसे पाठवत असतेस त्यातून अधून मधून वाड्याची डागडुजी करून घेतो. आमच्यापरीने वाडा राखलाय आम्ही.

आता पुढे तू बघ. त्याप्रमाणे खर काकांनी वाडा राखला होता. अंगणातला वड त्याची साक्ष देत होता. सभोतालची फुलझाडे आनंदाने डोलत होती. दरवाजा उघडून ती आत गेली, वाड्याच्या भिंती जणू तिची गळाभेट घेण्यासाठी पुढे सरसावल्या असा भास तिला झाला. समोरच रामाचा फोटो, ज्याला ती रोज उदबत्तीने ओवाळायची,कधी काही लागल तर बिनदिक्कत या रामाकडे माग, तो कधी काही कमी पडू देणार नाही अस अप्पा तिला सांगायचे.

आज मात्र तो सुद्धा तिला काय हव ते देऊ शकला नसता,म्हणूनच तिने मागण्याचा हट्ट सोडून दिला. सातारा वर्षाची असताना अप्पा गेले अचानकच. तेव्हा मामा तिला आणि माई ला घेऊन गाई गेला, तेंव्हापासून हा वाडा त्यांच्या आठवणीतच राहिला. आज त्याला डोळेभरून पाहताना तिला स्वर्गसुख मिळाल्याचा भास होत होता. ती सगळ्या गोष्टी भरभरून बघत असताना काठी टेकत लक्ष्मीबाई समोर आली.

तिने तिला घट्ट मिठी मारली.दोघींनीही अश्रुना वाट मोकळी करून दिली. भेट पंचवीस वर्षांनी होत असली तरी ऋणानुबंध मात्र जन्मोजन्मीचे असल्यागत दोघी रडत होत्या. लक्ष्मीबाई सुरकुतलेल्या हाताने तिच्या पाठीवर मायेची उब देत होती. शांत झाल्यावर ती सुजाताला घेऊन मागच्या आंगणात गेली. तिथे माईने एक चूल सारवून ठेवली होती, पाणी तापवण्यासाठी तिचा उपयोग होत असे.

तेव्हासुद्धा लक्ष्मीबाई वाड्यात कामाला येत असे,वीस वर्षाची बालविधवा बाई ती. चार घरची काम करून पोट भरायची.सकाळी जेव्हा वाड्यात येत असे तेंव्हा माई तिला याच चुलीवर गरम भाकरी करून देत असे. त्याची आठवण तिला आजही राहिली. ते पाहून दोघीनाही पुन्हा गलबलून आल. पुढे सोफ्यात काकांचा आवाज आला. डोळे पुसत दोघी पुन्हा घरात आल्या. तू सांगशील ती किंमत द्यायला तयार आहेत हे म्हणून यांना घेऊन आलोय बघ,काका बोलू लागले.

सुजाताने एकदा लक्ष्मी कडे पाहिलं.तिचे डोळे काळजीने भरून आले होते.आत्ताच घर विकायचं नाही काका अस तीने सांगून टाकल.दोघेही उदास चेहऱ्याने निघून गेले.सुजाताने लक्ष्मीचा हात हातात घेऊन तिला सांगितलं ,समोर पाटलाच्या अंगणात झोपायची काही गरज अन्ही.तू जोपर्यंत इथे आहेस तोपर्यंत मी हा वाडा विकणार नाही.आजपासून तू इथेच राहा. लक्ष्मीबाई तीच बोलणं ऐकून धान्य झाली. तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले.आज वाड्यातून दिसणारा सूर्यास्त जणू उद्याचा दिवस खोखर चांगलाच असेल याची शास्वती देऊन गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *