मुलं होत नाही म्हणून बायकोला त्रा स देतात, पण सात वर्षांनी नवऱ्याचे जेव्हा तसले घाण रिपोर्ट्स समोर येतात.. तेव्हा जे घडते

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, सकाळपासून पावसाचा लपंडाव सुरू होता जणू आज माझ्यासारखंच आकाशही आपले सगळे दुःख हळूहळू रीतं करत होता. मी कॉफीचा मग घेऊन गॅलरीत आले अवचितपणे पावसाचे दोन टपोरे थेंब माझ्या गालावर पडले. तुला ही कळल्या कारे…माझ्या वेदना…माझे दुःख… जो लगेच धावलास माझ्या डोळ्यातल्या अश्रूंना सोबत करायला.

आठवणींचे ओझे जड झालेल्या पापण्यांमधून ओघळत राहिले. लग्नाला सात वर्षे होऊनही मातृत्वाची चाहूल लागली नव्हती त्यामुळे घरच्या, बाहेरच्या लोकांचे बोलणे ऐकून त्रास होत होता. तुला कधीच कोणी बोलायचं नाही पण मला मात्र मनाला लागेल असे टोमणे रोज ऐकवले जायचे. मला मुल होत नाही यासाठी फक्त मला आणि…फक्त मलाच जबाबदार धरले जायचे.

माझा मा नसिक छळ तुला दिसायचा पण तु कधीच काही बोलायचा नाहीस. मी मात्र हळूहळू आतल्या आत खचत चालले होते. तुला डॉ क्टरकडे चलण्यासाठी किती विनवण्या केल्या पण तु एकदाही आला नाहीस. नंतर नंतर तर डॉ क्टरच्या नावानेच तू चिडायचास, ओरडायचास, अंगावर हात उचलायचास.

मला तर ऑफिस मधून घरी येण्याची इच्छाच होत नव्हती. वाटायचे का जावे घरी, कोण आहे तिथे आपली वाट पाहणारे. माहेर तर तसंही नव्हतंच आई-वडिलांनी लग्न करून त्यांची जबाबदारी झटकली तर सासरच्यांनी मूल होत नसल्यामुळे वाळीत टाकलेले. तू मात्र मस्त दिलखुलास जगायचास. लग्न, वाढदिवसाच्या कार्यक्रमात सामील व्हायचास.

सुरुवातीला मी पण यायचे तुझ्यासोबत पण नंतर नंतर लोकांच्या कुत्सित नजरा स हन व्हायच्या नाहीत. कितीदा तरी लोकं तुझ्यासमोरच माझ्यावर ताशेरे ओढायचे, मला हिणवायचे पण तू एकदाही त्यांना थांबवलेलं, टोकलेलं मला आठवत नाही. तो दिवस अजूनही मला आठवतो माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी घरीच होते.

डॉ क्टरांची फाईल शोधत असताना जे दिसलं ते वाचून माझा मेंदू ब धीर झाला. ज्या गोष्टीमुळे मला वांझ, अवदसा म्हणून हिणवले जायचे त्याचं मुळ कारण सापडलं होतं. वर्षानुवर्षे जो मा नसिक त्रा स मी स हन करत होते त्यात माझी जराही चूक नव्हती. मनावरचा ता ण एकदम हलका झाला.

रात्री तुझ्या समोर जेव्हा तुझी फाईल ठेवून तुला विचारले. का वागला असं… अरे तु मला सांगितले असते ना तरी मी तुला काही एक बोलले नसते. पण सात वर्षे तु कधीच बाप होऊ शकत नाहीस हे लपवून ठेवून सगळं खापर, सगळा दोष माझ्यावर टाकून जगासमोर स्वतःची खोटी म र्दुमकी गाजवत राहिलास.

तु रागाने अख्खं घर डोक्यावर घेतलंस. मला नाही नाही ते बोललास. भर रात्री मला घराबाहेर काढलं… मी तुझ्याकडे परत कधीही न परतण्यासाठी निघून आले तिथून. घट स्फो ट घेता़ना तोंड बंद ठेवण्यासाठी मला मोठी रक्कम देऊ केलीस. तुझ्या सोबत जे शापित जी वन मी सात वर्षे भोगले त्याची परतफेड पैशाने करु पहात होतास.

अरे तुझ्या सारख्या खोटारड्या आणि फसव्या माणसापासून मुक्त होणेच माझ्यासाठी अनमोल होतं. तु दिलेल्या धक्क्यातून स्वतःला सावरायला वेळ लागला पण आज परत तू कोणाला तरी फसवून लग्न केल्याचे समजले आणि मन भरून आले. स्वतःचा नाम र्दपणा लपवपण्यासाठी तू परत एका निष्पाप मुलीचा ब ळी घेतलास आणि मी मात्र तु दिलेल्या जखमा कुरवाळत बसली आहे.

अजून किती दिवस अशीच एकटी जगणार आहेस..मनाच्या कोप-यातून आवाज आला. अगं झुगारून दे शापीत आठवणींचे ओझे…अन् सगळं विसरून तु पण आयुष्याची नवी सुरुवात कर..मी अपूर्वला फोन लावला. पाऊस जाऊन दूर आभाळात उगवलेला इंद्रधनुष्य आपल्या सप्तरंगांत मलाही चिंब भिजवू लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *