मासिक राशीफल – मेष राशी (२०२२); नोकरीमध्ये संपन्नता मिळवून देणारी संधी, आर्थिक लाभांची परभणी निर्माण होईल….हा महिना आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे…

राशी भविष्य

नमस्कार मित्रांनो, तर आज आपण फेब्रुवारी २०२२ हा महिना आपल्यासाठी कसा असणार आहे हे पहाणार आहोत, ग्रहदशा, नोकरी, भविष्य, आ रोग्य, सं तती याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत..चला तर मग जाणून घेऊया व्यक्तिमत्त्व –व्यक्तिमत्वाचा विचार केला असता राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते. फेब्रुवारी महिन्यात तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह भाग्यस्थानात बसलेला आहे ज्यामुळे राशीस्वामी मजबूत असतो आणि अर्थातच तुम्ही मजबूत असता. त्यामुळे ध र्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्वांवर विजय प्राप्त करून तुम्ही सर्वांगीण आनंदाचा उपभो ग घेत असता.

याचप्रमाणे तुमच्या राशी स्वामीची स्थिती बघितली असता तो भाग्य स्थानात विराजमान असणे ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. या महिन्यात कौटुंबिक विसंवा द, आढतळे निर्माण होतील पण राशी स्वामी बळकट असल्यामुळे कोणत्याही संकटावर मा त करण्याचे बळ तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल. साहजिकच या सर्व गोष्टींचा सकारात्मक प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडणार आहे.

कुटुंब –कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता पत्रिकेतील कुटुंबेशाची स्थिती महत्वाची ठरते. तुमचा कुटुंबेश भाग्यस्थानात तुमच्या राशीस्वामी सोबत विराजमान आहे आणि ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. या महिन्यात अनेक वेळा तुम्ही निवांत असाल की आपल्याला कुटुंबाकडून सहकार्य प्राप्त होणार आहे मात्र सं कटाच्या वेळी त्यात तुम्हाला सहकार्य मिळणार नाही त्यामुळे तुमची ल ढाई तुम्हाला करावी लागेल.

परिश्रम- परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता परिश्रमेशाची स्थिती महत्वाची ठरते, तुमच्या परिश्रमाचा कारक गुरू म्हणजे बुध होय. तो तुमच्या दशम स्थानात मित्राच्या राशीत मित्रांसह विराजमान आहे म्हणजे परिश्रमाचा कारक ग्रह कर्म स्थानात बसलेला आहे अशा स्थितीमध्ये कर्म प्रधानता वाढलेली असते त्यामुळे त्याचे शुभत्व नक्की तुम्हाला मिळेल. या महिन्यात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात.

वास्तु, वाहन, जमीन -वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता चतुर्थेश अत्यंत महत्वाचा ठरतो पण तुमचा चतुर्थेश चंद्र हा सातत्याने भ्रमण करत असतो आणि त्या भ्रमणानुसार त्याचा तुमच्यावर प्रभाव पडतो. पण फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता महिन्याच्या सुरुवातीपासून राशी स्वामीची दृष्टी चतुर्थ स्थानावर असणार आहे.

त्यामुळे एकीकडे घरातील वातावरण आनंदी राहील तर दुसरीकडे वाद विवा द निर्माण होतील. घरातील शांतता भं ग होईल. त्याचप्रमाणे एकीकडे वास्तुदो ष निर्माण होतील तर दुसरीकडे त्यामध्ये आढतळे निर्माण होतील. असे परस्पर विरुद्ध परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतील. पण वास्तू योगाच्या दृष्टीने हा काळ शुभ आहे.

शिक्षण:-या दृष्टीने विचार केला असता तुमचा पंचमेश म्हणजे ग्रहांचा राजा रवी हा तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे. शैक्षणिक दृष्ट्या विचार केला असता महिन्यातील पहिला पंधरवडा हा थोडा सं घर्षाचा तर दुसरा पंधरवडा हा संधी निर्माण करणारा आहे. या काळात स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. पण अभ्यासात सातत्य ठेवा. या महिन्यात इष्टदेवतांचे सहकार्य मिळेल.

नोकरी व व्यावसाय:- या दोन्ही आघाडीवर मेष जातकाना सामान्य यश मिळेल. या महिन्यात मेष राशीचे व्यक्ती नोकरी व व्यवसायात स्थिरतेने प्रगतीच्या मार्गावर असतील. दशम भावात उपस्थित शनी देव आणि बुध ग्रह मिळून उत्तम परिणाम देईल. दोन्ही ग्रहांचे शुभ संयोग तुम्हाला मेहनत आणि इमानदारीने काम करण्यास प्रेरित करेल. नोकरीपेशा लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

भाग्य – भाग्याच्या दृष्टिने विचार केला असता मेष राशीचे भागेश गुरू महाराज हे लाभ स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे भाग्यातून लाभ मिळण्याची संधी आहे. व्यावसायिकांना हा महिना उत्तम परिणाम घेऊन येईल. आपला व्यायसाय करणाऱ्यांसाठी सुरवात चांगली राहील. बृहस्पती आणि शनीची सप्तम भावावर दृष्टी राहील जे तुमच्या व्यावसायिकांना बऱ्याच तेजीने पुढे जाईल. हा महिना मेष जातकांसाठी लाभाचा, आर्थिक प्रगती घडवून आणणारा आहे त्याचा भरपूर लाभ घ्या.

व्यय व परदेशागमन- फेब्रुवारी महिना मेष जातकांसाठी बऱ्यापैकी खर्चिक राहील पण आर्थिक लाभ ही त्याच प्रमाणात होतील. पण योग्य ठिकाणी योग्य खर्च करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जे लोक परदेशात आहेत त्यांना देखील हा काळ उत्तम असेल.

शुभ दिवस – या महिन्यात 8, 18 आणि 27 फेब्रुवारी हे दिवस शुभ असतील तसेच विवाहित लोकांसाठी हा महिना मिळता-जुळता राहील. या वेळी मेष राशीतील जातकांना आ रोग्याच्या प्रति गं भीर राहावे लागेल म्हणून, पौष्टिक आहाराकडे लक्ष द्या.

Leave a Reply

Your email address will not be published.