छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वाना माहीतच आहे. आपण शाळेला असल्या पासून शिवाजी महाराजांच्या गाथा ऐकल्या आहेत. जस कि, अफजल खानचा व ध, शाहिस्ते खानची बोट का पलेली, महाराजांनी आग्र्याहून स्वतःची करून घेतलेली सुटका, सुरतेची लू ट असे अनेक पराक्रम शिवाजी राजेंनी केले आहेत.
तसेच आपल्याला माहित असेल कि महाराजांनी सुरत दोन वेळेला लुटली आहे. १६६४ साली आणि १६७० साली महाराजांनी सुरतेची लू ट केली आहे. पण दुसरी लू ट केली त्यावेळी त्यातील निम्याहून जास्त म्हणजे जवळ जवळ बाराशे टन इतका मोठा खजिना गायब झाला. तो गेला कुठे ? कुठे आहे ? तो कोणाला सापडला काय ? तर याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लू ट दोन वेळा केली होती. १६६० च्या दशकात सुरत मध्ये सोने, हिरे, मानकांचे व्यापार होत असता. त्यावेळी सुरतेत अनेक हिऱ्यांचे व्यापारी होते. मोघलांची अर्थव्यवस्था ही सुरतवरच अवलंबून होती. म्हणून जानेवारी १६६४ ला महाराजांनी घोडदळासह सुरतेची लू ट केली होती.
परत ज्यावेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी सोहनराय हे देखील सुरत मध्ये असत त्यावेळी म्हणजेच १९७० साली महाराजांनी सुरतची आणखी एकदा सुरत लु टली. आणि ही लू ट करण्यामागे शिवाजी महाराजांचा एकमेव उद्देश होता. तो म्हणजे सुरत लु टून मुघलांना दु बळे करणे, तसेच शिवाजी महाराजांना स्वराज उभारणीसाठी संपत्तीची आवश्यकता होती त्यामुळेच त्यांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली.
त्यानुसार योग्य नियोजन करून मुघलांची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची आणि तेथील संपत्ती लु टून सुरतचे महत्व कमी करायचे या उद्देशानेच महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली. पण परतीच्या मार्गावर मुघलांचा सामना करावा लागला. परिणामी महाराजांनी लुटलेल्या खजिन्याचे दोन भाग केले, एक स्वतः आणि दुसरा भागाची जबाबदारी सरदार गोंदाजी यांच्याकडे दिली.
पहिला भाग महाराजांनी शिताफीने गडावर सुखरूप आणला. पण दुसरा भाग जो सात हजार जनावरांच्या पाठीवरून सरदार गोंदाजी वाहून नेत होता तो परत आलाच नाही तो जवळ जवळ बाराशे टन इतका होता. तो परत न येण्याचे कारण म्हणजे गोंदाजी यांनाही परतीच्या मार्गामध्ये श त्रूंनी गाठले आणि मुघलांच्या ह ल्ल्यात ज खमी झालेला गोंदाजी याचा कै दमध्येच मृ त्यू झाला.
श त्रूच्या हाती तो बाराशे टनाचा खजिना लागू नये यासाठी गोंदाजींनी तो लपून ठेवला. पण गोंदाजींना श त्रूंनी म्हणजेच मोगलांची पकडून कै द केले व त्याच्याकडे चौकशी केली. पण गोंदाजींनी काहीही न सांगितल्यामुळे मुगलांच्या हाती हा बाराशे टन खजिना लागलाच नाही. कै देतच गोंदाजींचा मृ त्यू झाला आणि खजिना कुठे लपवला याच गुपितंही सोबतच घेऊन गेला असं म्हणावं लागेल.
तर खजिना कोठे आहे हे गुपितही गोंदाजींन सोबत निघून गेले. पण नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या नंतर संभाजी महाराजांनीही या खजिण्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. इंग्रजांनी देखील या खजिन्यासाठी शोध मोहीम राबवली पण त्यात त्यांनाही यश आले नाही. त्यानंतर अनेक वेळा केलेल्या शोध मोहीम ही अयशस्वीच राहिल्या.
तर मग हा खजिना आहेतरी कुठे ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचा उल्लेख ‘शोध’ नावाच्या कादंबरीत आपल्या पाहायला मिळतो. कादंबरीत मुरलीधर खैरनार यांनी लिहिले आहे कि हा बाराशे टन इतका मोठा खजिना नाशिकमधील एका रांगेत असलेल्या आठ किल्यांपैकी कुठल्यातरी भागात हा खजिना लपवला गेला होता.
ते पुढे जाऊन असं ही लिहितात कि, भारतातील काही मोठ्या कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाने ह्या खजिन्याच्या शोधात आहेत. तसेच ‘सुरत लु टणे’ इतकेच उद्दिष्टय महाराजांचे कधीच नव्हते तर तेथील श्रीमंतांची संपत्ती लु टून आणली तर तेथील त्यांची आर्थिक स्थिती कोलमडेल आणि त्याचा फा यदा स्वराज्याला होईल.
तसेच सूरत लु टली तर मुघलांना जरब बसेल, असा विचार शिवाजी महाराजांनी केला होता, तसेच जेंव्हा त्यांनी पहिल्यांदा म्हणजेच १६६४ मध्ये केली तेंव्हा त्यांचा सू ड उगवण्यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना महाराजांकडे पाठवले होते. त्यानंतर महाराज आग्र्याला गेले आणि त्यांना तिथे कै द झाली. पण तिथून सुटून ते राजगडावर पोहचले.
आणि पुन्हा १६७० मध्ये दुसरी लूट करायची ठरली पण या दरम्यान मराठे आणि मुघल यांच्यात पुरंदरचासह अनेक किल्ल्यांचा तह झाला. पुन्हा नव्या जोमाने महाराजांनी औरंगजेबाला द णका देत सलग तीन दिवस सुरत लु टली आणि मिळवलेली संपत्ती स्वराज्य उभारणीसाठी वापरली.