महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडला कशी गेली?…काय आहे त्यामागील रहस्य..तसेच ती तालावर आपण भारतात आणू शकतो कि नाही

लाईफ स्टाईल

मित्रांनो आपणा सर्वांचे हृदयसम्राट व महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांच्या कीर्तीची महती खूप मोठी आहे. आणि ही कीर्ती घडविताना त्यांनी जी काही माणसे मिळवली. जी काही श स्त्रास्त्रे बाळगली. या सर्वांनाच खूप मोठे महत्त्व आहे. ऐतिहासिक दृष्ट्या नोंदविण्यात आलेली माहिती. आणि विविध स्त्रोतातून सध्याची उपलब्ध असणारी माहिती यामध्ये बऱ्याचदा अनेक तफावती दिसून येतात.

तर मित्रांनो फारसे विषयांतर न करता आपण आजच्या या लेखामध्ये शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवार याबद्दलची विशेष माहिती जाणून घेऊया. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेमक्या एकूण किती तलवारी आहेत याची माहिती आजही उपलब्ध नाही. छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रतीनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदी मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन तलवारी ज्ञात आहेत.

आपल्यातील प्रत्येकाला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवार विषयी महाराष्ट्रातील प्रत्येकालाच विलक्षण आकर्षण आहे आणि भवानीच्या अस्तित्वाचा शोध अविरतपणे सर्व संशोधक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणखी एका तलवारीचा उल्लेख कागदपत्रात नावासकट केलेला आहे. त्या तलवारीचे नाव आहे जगदंबा. हीच जगदंबा तलवार आज लंडन मध्ये आहे.

जगदंबा तलवार लंडनला गेली कशी यामागे सुद्धा एक कहाणी आहे. ऑक्टोंबर 1875 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आला असताना त्याला भारतातील वस्तू भेट स्वरूपात दिल्या. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार भेट म्हणून दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट म्हणून दिलेली तलवार दुसऱ्या-तिसऱ्या कोणाची नसून मराठा स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची होती.

असे नमूद करून ठेवले आहे. सध्या ही तलवार लंडन मधील मालवणी हाऊस मध्ये ठेवण्यात आलेली आहे. या तलवारीचा क्रमांक 201 असून कॅटलॉक मध्ये दोन वेळेस या तलवारीस छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार असे संबोधण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरच्या नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तलवारी विषयी अजून पन्नास तपशील वाचायला मिळतो.

या तलवारीचे नाव जगदंबा असे दिलेले आहे. रत्नजडित शिवाजी महाराजांची तलवार पूर्वापार चालत आलेले नाव जगदंबा आहे. हे स्पष्ट होते. त्या तलवारीची लांबी 121 सेंटीमीटर म्हणजेच जवळजवळ चार फूट इतकी आहे. तलवारीवर रत्नजडित संपूर्णपणे सोन्याचे काम केले आहे. तलवार अतिशय सुंदर असून वजनाने फार कमी आहे.

याच जगदंबा तलवारीला भारतात परत आणण्यासाठी अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवप्रेमी अंतुले यांच्या काळात साऱ्या महाराष्ट्राचे रा जकारण ढवळून निघाले होते. तलवार भारतात आणण्याची तयारी सुद्धा त्यांनी सुरू केली होती. पण दु र्दैवाने त्यांचे कष्ट फळाला आले नाही. त्यामुळे आजही जगदंबा भारतात परत येऊ शकली नाही.

स्वार्थी लोकांच्या नादान विचारांमुळे आपल्या मातीतला शौर्याचे प्रतीक असलेला काळजाचा ठेवा आजही भारताबाहेर आहे. अशी ही जगदंबा तलवारीची कहाणी. वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही कुठल्याही वा ईट गोष्टीची संदर्भ जोडू नये. ही विनंती. मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा.

आणि अशाच प्रकारच्या कुठल्याही लेखांची माहिती आवश्यक असल्यास तेही कमेंट बॉक्स द्वारे कळवा. शक्य तितकी जास्तीत जास्त चांगली व वास्तवास अनुसरून असणारी माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *