मस्तानी व बाजीराव पेशवे यांच्या मृत्यनंतर त्याच्या मुलाचे पुढे काय झाले..जाणून घ्या अज्ञात असा इतिहास..कोणी त्या मुलांचा सांभाळ केला होता

लाईफ स्टाईल

मित्रांनो, बाजीराव पेशवा व मस्तानी यांच्याविषयी आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र ही माहिती फक्त आपणाला बाजीराव पेशवा व मस्तानी यांच्या नावापुरतीच मर्यादित आहे. या दोन नावांच्या वलायाबद्दल आपण थोडेफार जाणतो. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांचे काय झाले, ते कसे घडले याबद्दल आजवर आपणा सर्वांच्या ऐकिवात व वाचण्यात कधी आलेले दिसत नाही.

तर मित्रांनो याच गोष्टीबद्दलची विशेष माहिती आज आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेत आहोत. तर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना आपले बुंदेलखंड रा ज्य मु घल सुभेदार मुहम्मद बंगशापासुन वाचवण्यासाठी राजा छत्रसालने बोलावले. छत्रसाल हा हिं दू राजा असल्यामुळे बाजीराव पेशवे त्यांच्या मदतीला धाऊन गेले आणि त्यांनी बंगशाला धुळ चारुन बुंदेलखंड रा ज्य मु घलांपासुन वाचविले.

बाजीराव साहेबांचा हा पराक्रम पाहुन खुष झालेल्या छत्रसाल राजाने त्यांना बुंदेलखंड राज्याचा १/३ हिस्सा, पन्ना येथील हिऱ्याची खाण बहाल केली. यांच्यासोबतच आपल्या राणी पासुन झालेली पुत्री मेहरुन्निसा बेगम उर्फ़ मस्तानी हिचा पन्ना येथेच मल्हारराव होळकर वगैरे मातब्बर सरदारांच्या साक्षीने खांडा पद्धतीने बाजीराव पेशव्यांशी वि वाह लावुन दिले. परंतु तिला सर्वांनी बाजीरावांची दुसरी पत्नी हा मा न न देता उपस्रीच मानले.

पुढे बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांना कृष्णसिंग उर्फ़ समशेरबहाद्दर हा पुत्र झाला. आपल्या वडीलांप्रमाणेच शहामतपनाह म्हणजेच शौर्यनिधी ही पदवी लाभलेला आणि मराठा साम्राज्यासाठी विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासोबतच पानिपत येथे लढताना मृ त्यु झालेल्या या श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या ला डक्या सरदाराबद्दल ही खास माहिती. कृष्णसिंग उर्फ़ समशेरबहाद्दर ! बाजीराव पेशव्यांना, द्वितीय मस्तानीपासुन झालेला हा पुत्र.

१७३४ साली त्याचा जन्म झाला होता. हा रघुनाथराव दादांजवळच होता. त्याचीही रघुनाथराव दादांसोबत मुंज करावी, अर्थात शुद्धी करून घ्यावी हि राऊस्वामींची इच्छा होती, असे म्हटलं जातं. त्याच्या आयुष्यात त्याला फक्त सहा वर्ष मातापित्यांचा सहवास लाभला. त्यानंतर तो एक लेकुरवाळा अशीच त्याची गणती होत. मात्र माता-पित्यांच्या मृ त्युमुळे अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षी एकटा पडलेल्या या लहान पोराला, समशेरबहाद्दरला, नानासाहेबांनी आपल्या सख्या भावाप्रमाणे सांभाळले.

म्हणुनच मागे त्याचा लाडका असा उल्लेख मुद्दामच केला. श्रीमंत नानासाहेब पेशवे झाल्यावर त्यांनी समशेरबहाद्दरला लेकुरवाळ्याबाबतीतले सगळे चालत आलेले रिवाज मोडुन मराठी व फारसी या भाषांची अक्षर ओळख करून दिली. त्याला यु द्ध शास्रातही निपुण केले. हिं दूंचे सर्व रिवाज त्याला शिकवले आणि त्या बरोबरच नमाज पढणे, कुराण वाचणे, दरग्यांना भेटी देणे वगैरे त्याच्या मातेच्या ध र्माच्या रिवाजाचीही त्याला सवय लावली.

समशेरबहाद्दरवर नानासाहेबांचे विशेष लक्ष असे. त्याचे मराठी, मोडी अक्षरे एकदम सुंदर होते. हे पाहून नानासाहेबांनी समशेरबहाद्दरला सदाशिवराव भाऊंच्या हाताखाली दिले. त्यांनीच समशेरबहाद्दरला फडाचे आणि यु द्ध शा स्राचे शिक्षण दिले. तलवारबाजी वगैरे सर्वातही समशेरबहाद्दर चांगला तयार झाला. त्यामुळे त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नानासाहेबांनी त्याला पेशव्यांची सरदारकी दिली.

गोविंदराव काकिर्डे या कारभाऱ्यांवर समशेरबहाद्दरचा कारभार सोपवला. मुसलमानी आणि हिं दुस्थानी पेहेरावांचा एकत्र मेळ म्हणजे त्याचा पोशाख! मुसलमानी बांधणीची पगडी, त्यावर तुरा, मराठेशाही अंगरखा, बुंदेलखंडी दुपट्टा, कमरेला ब्राह्मणी लपेटा, मखमली म्यान, त्यात तुर्कस्तानी त लवार, हातात फारसी क ट्यार, अशा पोषाखात तो उठुन दिसे. माता पित्यांसारखाच तोही रूपवान होता, हे वेगळं सांगायलाच नको.

अगदी प्रेमाने मोठ्या भावाने सांभाळावे याप्रमाणे नानासाहेबांनी त्याला वाढवले. सर्व बाबतीतील शिक्षण वगैरे आवश्यक गोष्टी पुर्ण झाल्यावर नानासाहेबांनी त्याचे ल ग्न करायचे ठरवले. त्यानुसार पेठ संस्थानच्या संस्थानिकांची कन्या लालकुँवर हिच्याशी त्याचे लग्न नानासाहेबांनी करविले. हे ल ग्न १७४९ साली झाले. त्यानंतर चारच वर्षांनी, १७५३ साली दुर्दैवाने ही लालकुँवर म रण पावली.

त्याच वर्षी पुन्हा नानासाहेबांनी समशेरबहाद्दरचा दुसरा विवाह मु सलमानी घराण्यातील मेहेरबाई हिच्याशी लावून दिला. आपला पती ब्राह्मणांप्रमाणेच त्यांचे सर्व रितीरिवाज पाळतो, हे पाहून तिला त्याचे कौतुक वाटे. फडावरच्या कारभाराची ओळख करवुन दिल्यावर श्रीमंत नानासाहेबांनी त्याला रणभुमिची ही सवय लावायचे ठरवले. त्यानुसार त्याला राजपुतना आणि हिं दुस्तानच्या मोहिमेवर पाठवले.

त्यात त्याने उत्तम कामगिरी केली. बहादुरीबद्दल आणि त्याची स्वामिनिष्ठा पाहून त्याला साहेब नौबतीचा मा न नानासाहेबांनी दिला आणि शिक्का वापरण्याचीही परवानगी दिली. १७५८ साली त्याला मेहेरबाईपासून पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव अलिबहाद्दूर असे ठेवण्यात आले. समशेरबहाद्दरला रमाबाई व फुलबाई या दोन राण्या होत्या. मात्र त्यांच्यापासून पुत्रप्राप्तीचे उल्लेख नाही.

पुढे १७६१ साली विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत समशेरबहाद्दर हाही पानिपतावर ल ढला. त्यातच तो ज खमी झाला. तिथुनच जवळ भरतपुर या ठिकाणी तो म रण पावला. तिथे त्याची कबर आजही आहे. त्याची नित्य पूजाही चालु आहे. स्थानिक लोक त्या कबरीला बडे अवलियाची क बर म्हणतात. समशेरबहाद्दरच्या पत्नीला आणि मुलाला पुढे थोरले माधवराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले.

वरील माहिती ही वेगवेगळ्या पौ राणिक कथांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. यातून कोणताही गैरसमज पसरविण्याचा हेतू नाही. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *