मंदिरे ही पैसे कमावण्याचा कारखाना झाला आहे का?…आपण मंदिरात जावे का? दान करावे का? पूजा करावी का?…जाणून घ्या आपण काय करतो आहे

लाईफ स्टाईल

आज आपल्यातील प्रत्येक व्यक्ती अगदी श्रद्धेने मंदिरात जात असते, तर आपल्यातील काही लोक मंदिरामध्ये अगदी आनंदाने आणि म नाने हजारो, लाखों रुपयांमध्ये दान करतात, तसेच आपण मंदिरामध्ये नारळ, फुले, वस्त्र घेऊन जातो. पण जर आपण जेव्हा सुद्धा एखाद्या मंदिरामध्ये जाल तेव्हा जर आपण काही गोष्टीचा बारीकपणे विचार आणि निरीक्षण केले तर आपल्याला सुद्धा आमच्या सारखा प्रश्न नक्की पडेल तो म्हणजे, मंदिरे ही पैसे कमावण्याचे साधन आहे का किंवा पैशाचा कारखाना आहे की काय?

होय जर बुद्धी शाबूत असेल तर आपल्याला नक्कीच याची प्रचिती येईल, कारण आज या मंदिरांपासून प्रत्येक पु जाऱ्यांला कमवायचे आहे, तसेच व्यापाऱ्यांना कमवायचे आहे आणि अगदी स रकारला सुद्धा कमवायचे आहे. मग यामध्ये आ स्था आली कोठे? मंदिराचे पावित्र्य कोठे असते? आपण अगदी श्रद्धेने मंदिरामध्ये जातो, दोन तीन तास रांगेमध्ये उभे राहतो आणि केवळ चार-पाच सेकंदाचे दर्शन घेऊन आपण परत येतो.

अशा या धावपळीमध्ये आपल्याला कोणते अ ध्यात्मिक समाधान प्राप्त होते? पण जर आपली खर्च देवावर म नापासून श्रद्धा असेल तर आपण चु कून सुद्धा मंदिरामध्ये जाऊ नका, त्याऐवजी आपण आपल्या घरातील देवघरातच म नोभावे पूजा करावी. म्हणजे आपले घरचं एक पवित्र मंदिर होईल, आपल्या घरातील देव जागे करा. रोज देवाची पूजा करा, आपल्या घरात रोज जे काही बनेल त्याचा प्रसाद देवाला दाखवा.

तसेच आपण कधी सुद्धा एखाद्या मंदिरामध्ये जाल, तेव्हा कधीच नारळ, फुले, वस्त्र नेऊ नका. होय, कारण या सर्व गोष्टीचा होतो तो म्हणजे फक्त बाजार, आणि फुलांचे जे काही ढीग लागतात ते शेवटी नदीमध्येच जातात आणि तेच पाणी आपण सेवन करतो. आपण येते एक गोष्ट लक्षात तेव्हा फुलांनी मंदिर सुशोभित करणे हे मंदिर व्यवस्थापनाचे काम आहे आपले नाही.

तसेच आपल्या त्या फुलांच्या ढिगात मूर्तीचे पावित्र्य न ष्ट होतेच. शिवाय ती मूर्ती सुद्धा आपल्याला दर्शन घेताना ठळक पणे दिसत नाही. त्यामुळे आपण जेव्हा सुद्धा जाल तेव्हा मंदिर सुशोभित राहावे याची काळजी घ्या आणि व्यवस्थापनास देखील याचा आग्रह करा. फेरीवाले, भिकारी, विक्रेते हे मंदिर परिसरात राहू नये असे वाटत असेल, तर त्यांच्याकडून काही खरेदी करू नका. या सर्वांमध्ये मंदिराचे असणारे पावित्र्य नष्ट होत आहे.

तसेच आपण मदिरात अन्नदान किंवा कोणतीही पूजा करू नका. या सर्व पूजा स्वतःच्या घरात करा. कारण जेव्हा सुद्धा आपल्या घरी पूजा होईल तेव्हा आपली वास्तु प्रसन्न, तसेच वास्तुदो ष नाहीसे होतील घरातील वास्तूपुरुष जागा होईल आणि आपल्याला आशीर्वाद मिळतील. तसेच आपणास सांगू इच्छितो कि ध र्म ग्रंथानुसार अन्नदान म्हणजे आपण ज्यांना ओळखत नाही अशा व्यक्तींना खाऊ घालणे असा अर्थ कधीही होत नाही.

ध र्म शास्त्रांनुसार अन्नदान म्हणजे आपले नातेवाईक, मित्रमंडळी, तसेच आपल्याला प्रत्येक कामात मदत करणारे आपले सहकारी यांना बोलावून त्यांना तृप्त करणे होय. समजा आपल्याला अजून काही वेगळे अन्नदान करायचे आहे तर अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी अन्नदान करा. आज खरी अन्नाची गरज तिथे आहे. आणि आज आपल्याला त्या मा नवरूपी आशीर्वादाची खरी गरज आहे.

आज देवाला कोणत्याही दानाची अपेक्षा नाही आहे आपल्याला दान ध र्म करायचा आहे ना तर आपण एखाद्या गरिबाला जेवण द्या, त्यांना साह्य करा, एखाद्या रु ग्नांला पैशाची आवश्यकता असेल तर त्याला मदत करा. तसेच एखाद्या गरीब मुलाला शिक्षणात मदत करा, आपल्या स माजात अनेक चांगल्या स माजसेवी संस्था आहेत त्यांना मदत करा आज खरी गरज त्यांना आहे.

आता सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे मंदिरात पैसे दान करावेत कि नाही, येथे एक गोष्ट आपण लक्षात तेव्हा देवाने कधीही तुमच्या कडे पैशांची मागणी केली नाही. देवाला या तुमच्या पैशांची मुळीच गरज नाही. त्यामुळे आपण मंदिरामध्ये पैसे देताना आपण देवाला काही देत आहे ही भावना आधी म नातून काढून टाका. त्यामुळे जेव्हा कधी सुद्धा आपण मंदिरामध्ये जाल तेव्हा फक्त एक रुपयांच दान करावा.

ज्यामधून स्वच्छता, देखभाल, पूजाअर्चा करणारी माणसे याचा प गार निघेल, जी मंदिरे स रकारी देखरेखीखाली आहेत त्यांना दान देण्याची काय आवश्यकता आहे? आपल्या कररूपी पैशातूनच त्यांची देखभाल होते म्हणजे आपण अप्रत्यक्ष त्यांना दान देत आहोतच ना? पण जी मंदिरे स रकारी देखरेखीखाली नाहीत त्यांना दान नक्कीच द्या, पण एक रुपया पेक्षा अधिक दान कधीच करू नका.

म्हणजे पैशासाठी मंदिरांचे रा जकारण करणारी माणसे आपोआपच मंदिरांपासून दूर जातील. आणि खरा सेवाभाव करणारी वृद्ध मंडळी, साधू संत पुढे येथील जे खऱ्या अर्थाने मंदिराला खरे रूप देतील, तर आपल्याला काय वाटतं हा बदल झाला पाहिजे का? तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *