भावाच्या संपतीमध्ये बहिणीने हक्क मागितला पण पुढे जे झाले ते पाहून धक्का बसेल…वडिलांनी आपल्याच मुलींसोबत जे केले

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, ताईच्या मुलाचे लग्न झाले होते आणि तिच्या सुनेची पहिलीच दिवाळी होती त्यामुळे भाऊबीजेला सुनेचा भाऊ घरी जेवायला येणार होता म्हणून चुलीवर मटण शिजवायला घातलेलं होत. आज जेवण चुलीवर करताना बघून सुनेने ताईला विचारलंच की आज सगळं जेवण चुलीवर का करताय, नाही म्हणजे चुलीवरच जेवण तसं छानच असतं पण घरातून सगळं चुलीजवळ आणण्याचे कष्ट का करताय?

आईच्या ऐवजी मुलाने उत्तर दिले की तुझी जशी लग्नानंतर पहिली दिवाळी आहे तस आईची पहिली दिवाळी असताना आजीने आईला सांगितले होते की तुझा भावासाठी आज सगळं चुलीवर करायचे आहे तेव्हापासून भाऊबीजेला आई सर्व जेवण चुलीवरच बनवते.

मुलाने आईला विचारले आज बाळा मामा येईल का? कारण ताईचे लग्न झाल्यापासून तिच्याहुन लहान असलेला बाळा नेहमी तिला माहेरी न्यायला यायचा. गेल्यावर्षी तरी नवीन कार घेऊन तो आपल्याकडे आला होता पण कोणालाही बसू दिले नाही, त्याने आधी ताईला गाडीत बसुन फिरवले मगच घरात गेला. मागील तीस वर्षे बाळा आपल्या ताईला माहेरी घेऊन जाण्यासाठी येत असे.

ताईचे लग्न ठरल्यावर तर बाळाला काहीच समजत न्हवते तो खुप कावरा बावरा झाला होता आणि आता जेवणार नंतर जेवणार म्हणून उपाशीच रहायचा. ताईने त्याला खुप माया लावली होती. ताई सासरी जायला निघाल्यावर तो खुप रडला होता. भावाच्या या आठवणीने ताईच्या डोळ्यात पाणी आले.

दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक त्याने लढवली व तो निवडून आला तेव्हापासून बाळाचे दिवस बदलले. तशी घरची परिस्थिती आधीपासूनच चांगली होती, भरपूर शेती व मोठे घर होते. पण निवडुन आल्यापासून भरपूर पैसे मिळू लागले आणि गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाल्याने बाळाची हाव ही वाढू लागली.

आता जमिनीचा भाव इतका वाढला होता की चार वर्षांपूर्वी जो भाव एकराला होता तो आता गुंठ्याला होता. पण ग्रामपंचायतीमध्ये त्याला हे कळले होते की जेवढी संपत्ती आहे त्यामध्ये अर्धा हिस्सा हा ताईचा आहे. असच एके दिवशी बाळाच्या बायकोने व मुलांनी संपत्ती चा विषय काढलाच. ताईचे सगळे समान जरी असले तरी ताईला एकदा विचारून तर पहा तिला हिस्सा नको असेल.

पण बाळाची हिम्मतच होत न्हवती हे पाहून बाळाच्या मुलाने ताईच्या मुलाला फोन लावला आणि बोलला अत्याला आमच्या प्रॉ पर्टी मधून नाव काढायला पाठवून दे, यावर ताईचा मुलगा बोलला तुमची प्रॉ पर्टी? ती प्रॉ पर्टी मामा आणि आईची आहे त्यांचं त्यांना ठरवू दे काय करायचं आहे ते तू कशाला मध्ये पडत आहेस?

हे झालेलं बोलणं पोरांनी ताईला आणि बाळाला सांगितले तेव्हापासून ताई आणि बाळा यांचे बोलणेच झाले न्हवते. त्या दिवशी 9 वाजतील तसे आईच्या हृ दयाचे ठोके वाढू लागले, बाहेर गाडीचा आवाज आला म्हणून ताई बघायला गेली पण बाळा आला न्हवता तिचा चुलत भाऊ आला होता. त्याला ताईने ओवाळले त्यावेळी बाळाच्या आठवणीने ताईच्या डोळ्यात अ श्रू येत होते पण तिने बाळाबद्दल काहीही विचारले नाही.

चुलत भाऊ घरी परत जाताना तिने त्याच्याजवळ मटणाचा डबा आणि दोन पाकिटं दिली. दुसऱ्या पाकिटावर लिहिलेलं होत पाहिलं पाकीट उघडल्यावरच हे पाकीट उघड. तो डबा बघून बाळाच्या डोळ्यात अ श्रू आले आणि त्याने पहिलं पाकिट उघडलं त्यात एक स्टॅ म्प पेपर होता आणि त्यात लिहिलेलं होत की मी सौ ताई पाटील आज स्वखुशीने माझ्या वडिलोपार्जित जमीन व घरावरील सर्व हक्क सोडत आहे.

आणि माझा भाऊ बाळा पाटील याच्या नावावर करण्यास माझी कोणतीही तक्रार नाही आणि खाली सही होती. पेपर वाचून बाळा ढसा ढसा र डू लागला आणि त्याने दुसरं पाकीट उघडले. त्यात लिहले होते की तुझ्या मुलाने माझ्या मुलाला फोन केला म्हणून तू निराश झाला आहेस. पण मी दिलेला डबा खा आणि लगेच मला घ्यायला ये मी वाट बघत आहे मानाने माहेरी यायला. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉलो करा.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.