आपल्याला माहित असेल कि महाभारताचे यु द्ध हे अनेक रथी-महारथी यांच्या ना शाचे कारण होते. समस्त कौरव सेना यामध्ये मा रली गेल्याचे आपल्याला माहितीच आहे. पण, महाभारताचा काळ हा श्री कृष्णाच्या अवतार स माप्तीची सुरवात म्हणून देखील ओळखला जातो. विष्णूनी श्रीकृष्ण म्हणून द्वापारयुगात अवतार घेतला.
आणि कंस, कालिया सारख्या अनेक दैत्यांचे द हन करून अर्जुनाला भगवतगीतेचे निरुपण केले. तसेच महाभारताचे यु द्ध संपल्यावर जेंव्हा श्रीकृष्ण कौरव माता गांधारी हिची भेट घेण्यास गेले, तेंव्हा आपल्या शंभर पुत्रांच्या वियोगाने व्याकूळ झालेल्या गांधारीने कृष्णाला मृ त्यूचा शाप दिला. अर्थात, श्रीकृष्ण म्हणून मा नवी अवतार घेतलेल्या विष्णूंना आपल्या अवतार स माप्तीसाठी मानवी शरीराचा त्या ग करणे गरजेचे होतेच.
आणि यु द्ध संपल्यावर सुमारे ३६ वर्षांनी श्रीकृष्णाने देहत्याग केला. श्रीकृष्णाच्या नि धनानंतर पांडवानी त्यांचे अं तिम कार्य केले. त्यांच्या देहाला अ ग्नी दिला गेला, परंतु संपूर्ण शरीर अ ग्नीमध्ये भस्म झाले तरी त्यांचे हृ दय मात्र अजूनही धडधडत असल्याचे त्यांनी पहिले. पांडवाना या गोष्टीचे आश्चर्य वाटले.
तेवढ्यात एक आकाशवाणी झाली कि, हे हृ दय तुम्ही समुद्रात विसर्जित करा. त्याप्रमाणे त्यांनी ते हृ दय पाण्यामध्ये विसर्जित केले. हे हृदय प्रवाहासोबत वाहत जाऊन आजच्या ओरिसाच्या किनारी एका लठ्ठेचे रुपात पोहचले. त्यारात्री भगवान श्रीकृष्ण राजा इंद्रद्युम्न याच्या स्वप्नात जाऊन आपण लठ्ठेचे रुपात समुद्रकिनारी त्याची वाट पाहत आहोत असे सांगितले.
आणि जेव्हा सकाळी राजाने समुद्र किनारी जाऊन पाहिले तेव्हा लठ्ठेला नमस्कार करून त्याने ती घरी आणली. विश्वकर्मानी त्या लठ्ठेमधून भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि सुभद्रा यांच्या लाकडी मुर्ती बनवल्या. या घटनेला पुनर्ज न्म देखील म्हणता येईल. हि जगन्नाथ मूर्ती दर १५ ते १९ वर्षांनी बदलली जाते.
याविधी आधी संपूर्ण शहराची वीज खं डित केली जाते. त्यानंतर देवळाचा पुजारी देवाचा चेहरा बदलतो. यावेळी त्याचे डोळे पट्टीने बांधलेले असतात, आणि हात कापडाने बांधलेले. असे म्हणतात की, या मूर्तीखाली श्रीकृष्णाचे हृ दय आजही धडधडत आहे. मूर्तीचा चेहरा बदलत असताना शहराची वीज घालवणे, पुजाऱ्याचे डोळे बांधणे यामागचे कारण विचारले असता असे सांगितले जाते कि.
जर चुकून कोणी त्याला पहिले तर त्याचा मृ त्यू होईल. तसेच मूर्ती बदलणारे पुजारी आपला अनुभव सांगताना म्हणतात, जेंव्हा मूर्ती बदलण्याची प्रक्रिया चालू असते तेंव्हा असे दिसते कि, जणू एखादा ससा काळेवरच्या आत लपला आहे. हे जगन्नाथ मंदिर आज समस्त हिं दूंसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. चारधाम यात्रेमधील हे एक प्रमुख धाम आहे.
पुराणांमध्ये याला धरतीचे वैकुंठ मानले आहे. या ठिकाणाला श्रीक्षेत्र, श्रीपुरुषोत्तम क्षेत्र, शाक क्षेत्र, निलगिरी किंवा जगन्नाथपुरी म्हणून देखील ओळखले जाते. कृष्ण अवताराच्या आधीपासूनच या क्षेत्राचे महत्त्व आहे. ब्रम्ह आणि स्कंद पुराणांमध्ये या नगरीचा उल्लेख आढळतो. त्यानुसार भगवान विष्णू निल्माधव रुपात यथे प्रकट झाल्याचे सांगितले जाते.
मस्त्य पुराणानुसार पुरुषोत्तम क्षेत्राची देवी हि विमला आहे. उत्तर रामायणा मध्ये श्रीरामांनी बिभीषणाला आपल्या इस्वाकू वंशाच्या कुलदेव जगन्नाथ यांची आराधना करण्यास सांगितले होते. आजही येथे बिभीषणाची परंपरा कायम आहे. त्याचप्रमाणे राजा इंद्रद्यन्म्न याचे मंदिरही येथे पाहायला मिळते .
जगन्नाथ मंदिर जवळपास चार लाख चौरस फुट क्षेत्रात सामावलेलं आहे. मंदिराची उंची ६५ मीटर इतकी आहे. त्याच्या शिखरावर एक चक्र असून त्याला नील चक्र म्हणाले जाते. ते अष्ट धातूनी बनलेलं आहे. हे मंदिर आजपर्यंत १८ वेळा लु टलं गेल आहे तरी सुद्धा इथे १२० किलो हून जास्त सोने व २२० किलो इतकी चांदी आजही आहे.
तसेच मंदिरावरील ध्वज हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. तसेच या मंदिरावरून कोणतेच पक्षी उडत नाहीत. मंदिराची सावली देखील जमिनीवर पडत नाही. आणि येथील जगन्नाथ यात्रा फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द आहे. अशा अद्भुत जागेला तुमी कधी भेट देताय?