भारतातील ‘टॉप ५’ चोर बाजार…जेथे करोडो रुपयांच्या वस्तू मिळतात काही हजारांमध्ये…जाणून घ्या कोठे कोठे आहेत हे चोर बाजार

अजब गजब

जगभरात तुम्ही अनेक चोर बाजारांबद्दल ऐकले असेल जिथे चो रीचे सामान मिळते. या चो र बाजरात कपड्यांपासून गाड्यांपर्यंत सर्वच वस्तू इथे मिळतात. तिथे स्वतःच्या घरातील चोरीला गेलेली वस्तू देखील पहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. भारतात देखील असे काही मार्केट आहे जे खास जागांवर तयार झाले आहेत आणि या बाजारांमध्ये खास वस्तू विकल्या जातात.

अशाच काही बाजारांबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. तेथे प्रत्येक प्रकारची चोरी केलेली वस्तू खुलेआम विकली जाते. त्यामुळे जाताना आपण कार किंवा बाईक घेऊन जात असू तर पार्किंग करताना खूप काळजी घ्यायला हवी. इथे आपल्याच गाडीचे पार्ट विकले जाण्याची शक्यता ना कारता येत नाही.

चोर बाजारात काय मिळत नाही असं नाही, फक्त ताजमहाल सोडून बाकी सगळे मिळतं हा एक डायलॉग प्रसिद्ध आहे. कारणच तसं आहे इथे ब्रँ डेड चपलांपासून ते थेट महागड्या गॅ जेट्स आणि नवीन कारपर्यंत सगळं मिळतंय. इथे आपल्याला काय हवं ते मिळत. चोरीचा माल घेतलाही जातो आणि विकलाही जातो. महागडी वस्तू तेही कमी किमतीत हवी असेल तर हे चोर बाजार आहे तरी कुठे? चला तर मग या बद्दल माहिती जाणून घेऊया.

मटन स्ट्रीट मुंबई – सर्व चोर बाजारांचे पप्पा म्हणजेच मटन स्ट्रीटवाला चो र बाजार. येथे दुकानदार आपला माल ओरडून ओरडून विकतात म्हणून या बाजाराला ‘शोर बाजार’ म्हणायचे पण ब्रि टिशांना हा उच्चार जमत नसे. उच्चारताना ते चोर बाजार म्हणतं आणि इथूनच शोर बाजाराला ‘चो र बाजार’ म्हटलं जाऊ लागलं आणि हे नाव या बाजाराला अगदी परफेक्ट बसलं. हा चोर बाजार दक्षिण मुंबईत असून दीडशे वर्ष जुना आहे.

सकाळी ११ पासून ते संध्याकाळी ७:३० पर्यंत येथे चो रांची आणि ग्राहकांची धा वपळ सुरू असते. आपलं सामान चो रीला गेले असेल आणि ते इथल्या बाजारात मिळालं तर नवल वाटून घेऊ नका. कारण येथे चोर हाथ की सफाई मध्ये माहीर आहेत. या बाजारात जुने कपडे, ऑटोमोबाइलचे पार्टस्, चोरीच्या घड्याळी, चो रीच्या अँ टीक वस्तू, मु घलकालिन वस्तू अशा आदीप्रकारच्या वस्तू स्वस्त दरात मिळतात. तेव्हा तुम्ही कधी मुंबईला गेलात तर हा चोर बाजार नक्की पाहा.

दिल्ली चोर बाजार – दिल्लीचा चोर बाजार जगात सर्वात जुना चोर बाजार आहे. आधी हा बाजार रविवारचा बाजार म्हणून लाल किल्ल्याच्या पाठीमागच्या भागात भरत असे. आता हा बाजार दरियागंज मध्ये नोवेल्टी आणि जामा मस्जिद जवळ भरतो. हा बाजार मुंबईच्या बाजारापेक्षा खूप वेगळा आहे. या बाजाराला कबाडी बाजार असेही म्हटले जाते.

सोतीगंज, मेरठ, यूपी:- जर तुम्हाला तुमची बाईक खूप जास्त आवडतं असेल तर हा बाजार तुमच्यासाठी खुला आहे. चोरीच्या गाड्या, स्पेअर पार्टचा इथे खजिनाच आहे. मारुती कार पासून रॉयल गाड्यापर्यंत सर्व येथे मिळतं. इथल्या बाजारातील एक खास गोष्ट म्हणजे इथे सै न्यातून निवृत्त झालेल्या अ धिकाऱ्यांच्या जीप अगदी स्वस्त दरात मिळतात.

चेकपेट मार्केट, बंगळूर:- हा चोर बाजार एवढा प्रसिद्ध नसला तरी इथे दिल्ली आणि मुंबईच्या चोर बाजारात मिळणारे सर्व काही मिळेल. ग्रामोफोन, चो रीचे गॅजेट्स, कॅमेरा, अँ टिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्वस्त जिम् इक्विपमेंट इथे तुम्हाला मिळतील.

पुदुपेट्टई, चेन्नई:- पुदुपेट्टई चोर बाजार हा ‘ऑटो नगर’ म्हणून ओळखला जातो. कारण इथली माणसं कारचे ओरिजनल पार्ट्स बदलण्यात आणि संपूर्ण कारचा कायापालट करण्यात पीएचडी करून बसलेले आहेत असंच म्हणावं लागेल. कारचे पार्ट तसेच कार बदलण्याची सामान इथल्या हजारोच्या संख्येने असलेल्या दुकानात मिळतात.

हा बाजार अगदी हुबेहूब बॉ लीवूड मधल्या ‘मसाला मारके’ टाईप चो र बाजार सारखा आहे. इथेही अनेकदा पोलिसांनी रे ड टाकली पण असल्या रे ड मुळे बंद होईल तो चोर बाजार कसला! चला तर मग वाट कसली पाहताय अशाच मस्त वस्तू स्वस्त दरात पाहिजे असतील तर या चोर बाजारांना नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *