भर लग्न मंडपातून ”मुलगी” पळून जाते कारण…त्यानंतर तिचे आई वडील जे काही करतात…जाणून घ्या एक वास्तवदर्शी कहाणी

लाईफ स्टाईल

लग्नाचा मंडप सजला होता. काही वेळातच वऱ्हाडी मंडपात येणार म्हणून लगबग चालूच होती. तेव्हा मुलीचे वडील उत्साहाने सर्वांना ओरडून ओरडून कामे करून घेत होते. कारण त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांना कोणताही हलगर्जीपणा झालेला नको होता. त्यांची एवढी मोठी ऐपत नसताना सुद्धा लग्नाचा एवढा मोठा डोलारा त्यांनी एकुलत्या एक मुलीसाठी उभारला होता.

कारण आपली मुलगी आता सासरी जाणार मग तिचा निरोप मोठ्या थाटामाटात व्हावा एवढीच त्यांची अपेक्षा होती. मुलीचं लग्न हे तिच्या वडिलांचं मोठं स्वप्नच असत हे आपल्याला माहित आहेच. ते अहोरात्र एक कष्ट करून, आपल्या हाडाचे पाणी करून, स्वतः मात्र दुःखाची झळ सोसून लेकीला सुखात पाहण्यासाठी झटत असतात आणि तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून तिचा सांभाळ करत ते तिच लग्न व्यवस्तीत पार पडावे आणि ती तिच्या संसारात आनंदाने नांदावी हीच अपेक्षा मणी बाळगत असतात.

त्यांच्या लग्नाला तब्बल बारा वर्ष झाल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली होती त्यामुळे त्यांनी तिला फुलासारखं जपलं होत. कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नव्हती तिला. अस सर्व असताना आपलं लेकरू दुसऱ्याच्या हवाली करताना काय वाटत असेल या बापाला. अगं राधा बघ जरा साधनाची तय्यारी कुठपर्यंत आली आहे ते, कधीपासून खोलीत बसून मेकअप करते ती. तिला सांग बस झालं आता लग्न होणार आहे तुज आज असं मिश्किल हसत मुलीचे वडील मंडपात आले.

मुहूर्ताची वेळ सुद्धा झालीच होती. भडजी जोरजोरात ओरडत होते, मामांनी लवकरात लवकर मुलीला मंडपात आणण्याची कृपा करावी मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे पण बराच वेळ झाल्यावर सुद्धा मुलगी मंडपात पोहोचली नव्हती. वाट पाहण्याचा अवधी आणि सय्यम संपत चालला होता. आता मात्र मुलीचे वडील थोडे चि डले आणि रागातच ते साधनाच्या खोलीकडे सरकले. पण आतून दरवाजा बंद होता.

बाहेरून सर्व तिला आवाज देत होते पण ती दरवाजा उघडत नव्हती. आता मात्र त्यांचा रा ग चिं तेत उतरला होता. कारण साधना काही केल्या दरवाजा उघडत नव्हती आणि आतून आवाजही देत नव्हती. काही नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा तो डला पण आतमध्ये साधनाच नव्हती. कुठे गेली काहीच पत्ता नव्हता मनातील चलबिचल वाढत होती. इकडे वऱ्हाडी आणि नवऱ्याकढची माणसं हजार प्रश्न विचारात होती.

काय उत्तर द्यावे हे तिच्या जन्मदात्या आई वडिलांना सांगणं असहय होत चाललं होत. अशातच ती सोडून गेलेली चिट्टी तिच्या आईला सापडली त्यातला मजकूर वाचून तिजे वडील जागीच कोसळले. “आई बाबा तुम्ही नेहमीच जे हव ते दिलं, पण लग्नाच्या बाबतीत मला नाही वाटत कि मी या मुलासोबत लग्न करेल. कारण माझं प्र णयवर खूप प्रेम आहे. आपल्याच बाजूच्या गावात तो राहतो. तुम्हाला कधीही सांगायची हिम्मत नाही झाली कारण तो सध्या कुठेच जॉबला नाही आहे.

म्हणून असे असताना तुम्ही माझा हात त्याला दिला नसता. तुम्ही ल ग्न करत असलेला मुलगा खरंच खूप चांगला आहे. श्रीमंत आहे, पण मला नाही वाटत मी त्याच्यासोबत सुखी राहील. प्लीज मला माफ करा. मी प्र णय सोबत पळून जाऊन ल ग्न करत आहे.” हे वाचून आई वडील मात्र पार गळून गेले होते. एकदा बोलून तर बघायचस ना पोरी माझ्याशी, आजवर तुजी प्रत्येक गोष्ट पूर्ण केली मग हि नसती का केली? का नाही समजली तू तुज्या बापाला? एवढा नीच आहे का मी ?

त्यांना सावरता सावरता इकडे नवरदेवाकडील लोकांनी धिं गाना घातला होता. आमचे चार पाच लाख लग्नात संपले आहेत ते आताच्या आता आम्हाला द्या नाहीतर आम्ही पो लीस के स करू. आधीच खूप इ ज्जत गेली होती, म्हणून तीज्या वडिलांनी इथून तिथून पैसे जमवून त्यांना पैसे देवून टाकले. आणि तडक बाजूच्या गावात प्र णयच्या घरी जाऊन पोहोंचले. त्या जाऊन ल ग्न सुद्धा केले होते आणि बाप समोर आल्यावर साधनाने एका शब्दाने सुद्धा त्यांना आवाज दिला नाही.

तिजे असहाय वडील तिज्याशी बोलायला गेले तर प्र णय त्यांना अडवले, आता तुमचा तिज्याशी सं बं ध नाही ती माझी आहे त्यामुळे तुम्ही इथून निगुन जा आणि त्याने त्यांना ध क्का दिला. तिचा नवरा वडिलांसोबत असा वागत आहे तरी साधना काहीच बोलत नाही गप्प उभी आहे हि गोष्ट पाहून तिच्या वडिलांना खूप त्रा स होत होता. आणि त्यांची अवस्था म रून मे ल्यासारखी झाली होती. ते तिथून निघून आले. पण पुढे काही महिन्यातच व्हायचे तेच झाले.

सोन्यासारखी पोर त्यांना नको वाटायला लागली. प्र णय तर तिला मा रायचा पण सासू सासरे पण छ ळ करत होते तिचा. एक दिवस असा उजाडला साधना आपल्या घरी आली. तिच्या वडिलांनी देखील मगच सगळं विसरून तिला घरात घेतलं. शेवटी बापाचं काळीज ना ते, मुलीसमोर पाघळणारच ना, प्र णय परत कधीच तिच्याकडे परत आला नाही कारण त्याच्याबाजूने कधी प्रेम नव्हतेच होती ती फक्त वासना. आणि ती कधी साधनाला कळलीच नाही.

काही दिवसांनी त्यांचा घटस्फो ट झाला. पण ज्या मुलीची बाजू बापाने नेहमी घेतली त्या मुलीच सुद्धा काही कर्तव्य बनत का नाही. प्रेमाच्या ओघात अखंड बुडताना तुम्ही ज न्मदात्यांना विसरता हे कसलं प्रेम. म्हणून माझी प्रत्येक मुलीला एक विनवणी आहे तुम्ही प्रेम करा पण आई वडिलांना विसरू नका. लहानाचे मोठे त्यांनी आपल्याला हे दिवस दाखवण्यासाठी नाही केले. एवढं मा त्र विसरू नका, आई वडिलांना दुःख देवुन तुम्ही कधीच सुखी राहू नाही शकणार हे त्रिकाल सत्य आहे.

मुलांना पण मला हेच सांगायचं आहे दुसऱ्याच्या मुलीला किंवा बहिणीला पळवून नेताना आपल्याही घरी बहीण आहेच हाच विचार नेहमी मनात ठेवावा. कितीही काहीही झालं तरी जे दुःख आपण स हन करू शकत नाही आसले दुःख दुसर्यांना देताना माणसाने हजार वेळा विचार करावा. तुम्ही आई वडिलांना सुखच दिले नसेल तर तुम्हाला कोणताही अधिकार नाही त्यांना दुःख देण्याचा. त्यांची मा न तुमच्या अभिमा नाने उंचवली नाही तरी चालेल पण मा न खाली जाईल असे कृ त्य करून वा ईट आदर्श ठेऊ नये हि विनंती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *