बिझनेस आयडिया: आपल्या घराचे टेरेस असेल रिकामे तर ‘ह्या’ मार्गाने आपण लाखो रुपये कमावू शकता…होय, जाणून घ्या..

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि या लॉकडाऊनच्या अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत, आणि आता हेच तरुण व्यवसायाकडे वळत आहेत, पण अनेक तरुणांसमोर हा प्रश्न उभा राहत आहे तो म्हणजे व्यवसाय करायचा तरी काय, पण आम्ही आपल्यासाठी अशाच काही आयडिया घेऊन आलो आहोत. ज्यामधून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

होय, फक्त जर का आपल्या घराची छत म्हणजेच जर टेरेस रिकामे असेल तर आपण हजारो, लाखो रुपये महिन्याला कमावू शकता. होय, आपण हे टेरेस भाड्याने देखील देऊ शकता, आपल्याला माहित असेल कि बाजारात असा अनेक कंपन्या आहेत जे आपले टेरेस भाड्याने घेऊ शकतात, आणि आपल्याला त्याचे योग्य पैसे देखील देऊ शकता.

बाजारात आज अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या छताच्या जागेनुसार आपल्याला व्यवसाय ऑफर करतात. काही व्यवसायासाठी तर स रका रकडून देखील मदत केली जाते, चला तर मग जाणून घेऊया कि आपल्याला कशा प्रकारे पैसे मिळू शकतात.

सौर प्रकल्पातून बंपर कमाई:- आपल्याला माहित असेल कि गेल्या काही वर्षांपासून सरकार सौर ऊर्जेला खूप प्रधान्य देत आहे, वाढते वीजबिल यामुळे सरकार अशा योजनांना खूप प्रोत्साहित करत आहेत, पण आपणास सांगू इच्छितो कि बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या टेरेसवर सौर ऊर्जा प्रकल्प उभा करू शकतात आणि त्यासाठी ते आपल्याला योग्य भाडे देतातच शिवाय ते आपल्याला वीज देखील मोफत देतात, आणि यातून निर्माण झालेली वीज ते औद्योगिक कंपन्यांना देतात.

मोबाइल टॉवर:- जर का आपण आपल्या घरावर मोबाइल टॉवर लावला तर आपण घरबसल्या लाखो रुपये कमावू शकता. होय, तसेच आपल्याला यामधून काही सुद्धा धो का नसतो, शिवाय आपल्याला मोठ्या प्रमाणत पैसे देखील मिळतात. फक्त यासाठी आपल्याला कोणत्याही मोबाईल कंपनीला सविस्तर माहिती पाठवावी लागतात.

त्यानंतर ते येऊन आपल्या जागेचा सर्वे करतात आणि मग ठरवतात कि आपल्या टेरेस वर मोबाईल टॉवर लावायचा कि नाही, त्यानंतर त्याच्याकडून तसा होकार आला तर आपल्याला आजूबाजूच्या लोकांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि स्थानिक महानगरपालिका किंवा प्राधिकरणाकडून त्यास मान्यता घ्यावी लागेल.

टैरेस फार्मिंग:- होय, यामधून सुद्धा आपण आज हजारो, लाखो रुपये आपण कमावू शकता, कारण आज भारतात टेरेस फा र्मिंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. यासाठी आपल्याला इमारतीच्या छतावर ग्रीन हाऊस बांधावे लागेल. तसेच आवाज वाढत्या प्र दूषणामुळे आणि दररोज अन्नामध्ये भे सळ केल्याच्या वृत्तांमुळे त्र स्त लोक आता ओरिजिनल आणि घरगुती शेतीमालाला खूप प्रोत्साहन व प्राधान्य देत आहेत.

त्यामुळे जर आपण हा व्यवसाय केला तर आपल्याला या मालाला बाजारात मोठी किंमत मिळू शकते. कारण आज नैसर्गिक आणि सें द्रिय भाज्यांना बाजारात मोठी मागणी आहे, आणि यासाठी मोठं मोठी व्यक्ती हजारो रुपये देत आहेत. आपल्याकडे मोठा टेरेस असल्यास आपण शेती सुरू करू शकता आणि फळे आणि भाज्या वाढवू शकता. जर आपण मोठ्या प्रमाणात भाज्या आणि फळांचे उत्पादन केले तर आपण डिलीव्हरी बॉय देखील ठेवू शकता.

लोणचे-पापड:- हा व्यवसाय आपण घरबसल्या कधीही करू शकतो, याला टेरेसच हवं आहे असं काही नाही, आपण घरातून हा व्यवसाय चालू करून महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. फक्त लोणचे-पापड कसे बनवायचे माहित असेल तर आपण हा व्यवसाय खूप मोठ्या स्तराला नेऊ शकता. अशा व्यवसायांसाठी सरकार क र्जदेखील पुरवते. महिलांनी लघु उद्योग सुरू करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.

तसेच आपण घरातून शेंगदाणे चिक्कीचा देखील व्यवसाय करू शकता, आज ही चिक्की आपल्याला एखाद्या छोट्या दुकानांपासून ते चक्क डी मार्ट मध्ये सुद्धा बघायला मिळते. कारण याची मागणी खूप मोठ्या प्रमाणत आहे. कारण अगदी लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यत सर्वच लोक ही चिक्की अगदी आवडीने खात असतात आणि याची रोजची मागणी देखील मोठ्या प्रमाणत आहे.

त्यामुळे आपल्याला ही संधी साधून अल्प भां डवलात सहजगत्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्‍या कच्च्या मालापासून हा उद्योग करता येऊ शकतो. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपला व्यवसाय सुरु करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *