बायको जेंव्हा फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटायला हॉटेलवर जाते आणि हे नवऱ्याला कळते पुढे जे घडते

लाईफ स्टाईल

आज आदित्य ऑफिसमधून न जेवता डबा घरी घेऊन आला होता. त्याला खूप रा ग आला होता तिचा कारण आज तिसऱ्या दिवशी भाजीत मीठ नव्हतं. ज्या पोटासाठी कष्ट करतो त्या पोटाला नीट जेवायला मिळत नाही. बारा तास काम करून काय उपयोग आहे. एका क्लाइंट बरोबर त्याची मिटींग होती त्यामुळे तो रात्री बाहेर जेवून आला. आरोही आणि मुले गाढ झोपी गेली होती. सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत आळणी भाजी बद्दल विचारायचं राहूनच गेलं. कदाचित तिला कळलच नसावं तो जेवला नाही ते परत तीच चूक आरोहीने केली होती.

त्याने विचार केला. आज डबा असाच घरी न्यायचा आज जरा लवकरच घरी गेला. तेव्हा मुल अभ्यास आणि आरोही स्वयंपाक करत होती. तो डबा ओट्यावर ठेवला व फ्रेश व्हायला गेला. तो वाटच बघत होता आज डब्बा कधी उघडेल व त्याला विचारेल. पण तसं काही झालं नव्हतं. डब्यातलं अन्न कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं. त्याला तिचा खुप राग आला होता. जरा सुद्धा काळजी नाही नवऱ्याची नवरा जेवला का नाही ? तो मनाशीच विचार करू लागला.

आता आमच्यात संवादापेक्षा वादच जास्त होतात. पण एवढा दुरावा यावा लग्नाच्या बाराव्या वर्षी विचार करून त्याचं डोकं दु खायला लागलं होतं. त्याचा लहान मुलगा अनुज जेवायला बोलवायला आला. तो आणि दोन्ही मुलं जेवली. आरोही बेडरूममध्ये झोपून गेली. ती जेवली नव्हती पण याचा त्याला काहीच फरक पडत नव्हता. खाल्लेल्या पदार्थाची चव त्याला कळत सुद्धा नव्हती. थोडक्यात कर्तव्य म्हणून हा स्वयंपाक करण्यात आला असावा.

नक्कीच काहीतरी बिनसले असं त्याला वाटत होतं. पण काय झाले अशी का वागते याचं कारण मात्र त्याला कळेना. मुले झोपी गेली आणि आदित्य ही झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेला. तो आल्याचे कळून सुद्धा तिने कूस बदली. एकमेकांकडे पाठ करून झोपण्याची वेळ जरा त्यांच्या वै वाहिक आयुष्यात लवकरच आली होती. तेवढ्यात त्याचा हात तिच्या ऊशिवर पडला ऊशीचा अब्रा भिजला होता. आज ती खूप र डली होती.

त्याला काय नक्की झाले ते कळेना झालं काय चाललय तिच्या मनात ती हरवल्यासारखी का वाटते. घरात असून सुद्धा नसल्यासारखे वाटते. ती काही लपवत तर नाहीना आपल्यापासून त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर उठले. त्याच्या चेहऱ्यावर बायकोबद्दल असणारी काळजी दिसत होती. मुलं झोपली होती. आदित्य उठला आणि आरोहीचा खांदा हलकेच हलवून तिला बाहेर यायला सांगितलं. तिचे डोळे र डून सुजल्यासारखे वाटत होते. त्याच्या डोक्यात विचार आला.

एकाच घरात राहून एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नाही. आम्ही म नापासून साधी विचारपूस, गप्पा मा रत नाही. लग्नानंतरचे पाच वर्ष त्याला आठवले किती छान होते. ते दोघे एकमेकांचे किती काळजी करायचे. पण आता संसाराची घडी कुठेतरी वि स्कटल्या सारखी वाटत होती. गोंधळलेला आदित्य तिच्यापाशी गेला. तिला मिठीत सामावून घेतलं. त्याच्या मिठीत तिला किती दिवसात न मिळालेला स्वर्गच भेटला होता. त्याने काही विचारायच्या आधीच तिने सांगायला सुरुवात केली.

दोन महिन्यापूर्वी माझ्या आयुष्यात अचानक तो आला. त्याचं नाव राकेश, त्याची दोन महिन्यापूर्वी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तो अनोळखी होता मला पण मी कशी स्वीकारली मलाच कळलं नाही. पहिला एकमेकांच्या पोस्टला ला ईक, क मेंटने सुरुवात झाली. व्हाट्सअप नंबर एक्सचेंज झाले. तो आल्याने आयुष्यातला हरवलेला आनंद परत मिळाल्यासारखं वाटलं. त्याच्या गमतीदार बोलण्यात, याची काळजी, दोघांची सेम छंद खूप आवडत गेलं.

दोन महिने असेच गेले आणि अचानक चार दिवसापूर्वी त्याचा फोन आला. मुंबईत येणार आहे आठवडाभर कामाकरता भेटशील का ? त्याला भेटून मला खूप खूप गप्पा मा रायच्या होत्या. त्याच्या बरोबर बोलून मन मोकळं करायच होत. त्याला आवडतात म्हणून रसगुल्ले केले होते. आणि त्याला नयनतारा या हॉटेलमध्ये भेटायला गेले. त्याला बघून खूपच आनंद झाला होता. पण त्याच्या पहिल्याच “मि ठी” मध्ये त्याची विचित्र भूक जाणवली. तो जवळ येऊ पाहत होता.

मी त्याला दूर वाटलं. तो म्हणाला यात काही गैर नाही. तुला सुद्धा गरज आहेस की माझी. पण दोन महिन्यापासून मी त्याला माझा चांगला मित्र समजत होते. तो असा निघाला. याचा मला राग येत होता. फक्त त्याला श रीर सुखासाठी एक स्त्री हवी होती. त्याला एक चांगली मैत्रीण कधीच नको होती. संसारात रमत नसलेली, फक्त मुलांसाठी जगणारी त्याला एक स्त्री हवी होती. पटकन निघून आले तिथून.

चार दिवस आतल्याआत कुढत होते. मी टाळाटाळ करत होते त्याच्या कॉल, मेसेजला तू असुनही नसल्यासारखाच असायचाच. एकटी पडले होते. मला आधार हवा होता. पण मी तिथेही फसले. आरोहीचा हात हातात घट्ट धरला त्याने तिला दिलासा दिला. ते ही मुक्याने ती फसली नाही आणि कधी फसली नव्हती. दुसऱ्या दिवशी त्याने सकाळी जवळच्याच एका हॉटेलमध्ये मस्त तिच्या आवडीचा मसाला डोसा खाऊन कॉफी पीत होती आरोही आणि आदित्य तिच्याकडे प्रेमाने बघत होता.

ती त्याच्याकडे बघत होती कौतुकाने आणि प्रेमाने आज खूप प्रेम दाटून आलं होतं दोघांचं. कारण या हॉटेलमध्ये येण्यापूर्वी आदित्य तिला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. जिथे राकेश उतरला होता. तो म्हणाला अग अशा माणसांपासून फक्त सुटका करून घ्यायची नसते. परत कुठल्या स्त्रिला फसवू नये यासाठी त्यांना चांगली अद्दल घडवायची असते. आदित्य रूमच्या बाहेर उभा होता आणि आरोही राकेशच्या मुस्काटात ठेवून आली होती.

तिच्यातल्या बाईला गृहीत धरणाऱ्या त्याच्यातल्या पुरुषांची नांगी ठेचून काढली होती. आज आरोही खूप खुश होती. बऱ्याच दिवसांनी आज तिच्या मनातलं मोकळं झालं होतं. स्त्रियांनी सुद्धा भावनेच्या भरात वाहून न जाता आपल्या संसारात गोडी कशी निर्माण होईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या पत्नीशी मन मोकळे बोलले पाहिजे तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.

तरच कुठे सुखी संसाराचा गाडा आयुष्यभर व्यवस्थित चालेल……. म्हणतात रोपट्याला रोज पाणी घातलं की त्याचं पुढं छान वटवृक्षात रुपांतर होतं. आणि तेच आपल्याला सावली देतात. तसंच नात्याच देखील आहे त्याची काळजी घेतली तर ते सुद्धा आपल्याला आयुष्यभरासाठी भरभरून प्रेम देत……..

Leave a Reply

Your email address will not be published.