बायको अचानक खूप बदल्यासारखी वागायला लागली, पण शेवटी जे कळते ते पाहून धक्का बसेल…बायको सोबत जे होत होते

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, शांताताई चार दिवस झोपल्या नव्हत्या त्यामुळे तिला थकल्यासारखे वाटत होते. बऱ्याच दिवसापासून तिची खूप चिडचिड होत होती. मन उदास वाटत होतं आणि उत्साह हरवला होता. तिने आपल्या फॅमिली डॉ क्ट रला दाखवले. त्यांच्याच सल्ल्याने तिने मनो वि कार तज्ञ डॉ क्टरला दाखवून औ षधे चालू केली. एके दिवशी तिचे पती तिला म्हणाले, “मी तीन महिन्यांपासून नवीन नोकरी शोधत आहे आणि मला काही नवीन चांगली नोकरी मिळत नाही.

मी मित्रांसह बि अर पिण्यास जाणार आहे. तिने शांतपणे ऐकले आणि उत्तर दिले, ‘ठीक आहे’. दुपारी तिचा छोटा मुलगा तिला म्हणाला ,”आई, माझा JEE चा अभ्यास नीट होत नाही, सर्वच विषयांमध्ये कमी मार्क येतील अस वाटते आहे मी परीक्षा देणार नाही” तिने त्याला जवळ घेतले आणि बोलली, “ठीक आहे, सर्व ठीक होईल, पण परीक्षा न देणे योग्य नाही, जर कमी मार्क आले तर पुन्हा पुढील वर्षी अजून चांगली तयारी कर आणि परीक्षा दे.”

सायंकाळी तिच्या मुलीचा फोन आला ती म्हणाली, “आई, कॉलेजला जाताना माझी स्कुटी बंद झाली आहे. मला लवकर कॉलेजला जायचं होते” तिने उत्तर दिले, “ठीक आहे, तू गाडी जवळच्या दुकानात घेऊन जा आणि पैसे ATM मधून काढ आणि जर गाडी दुरुस्त होत नसेल तर बसने कॉलेजला जा. काही वेळात दरवाज्याची बेल वाजली, तिची सासू आली होती.

माझी आणि मोठ्या सुनेची भांडणे झाली आहेत. मी काही दिवस इथे राहणार आहे.” तिने त्यांचे स्वागत केले आणि बोलली, “ठीक आहे, बाजूची बेडरूम खाली आहे जेवढे दिवस राहायचे मजेत रहा.”शांती कडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून सर्वजण काळजीत पडले. तिचा स्वभाव पूर्ण बदलला होता. सर्वांना शंका आली की ती ज्या मा नसो पचार डॉ क्टरकडे गेली होती त्याने तिला काही विचित्र गो ळ्या लिहून तर दिल्या नाहीत ना किंवा ती कदाचित त्या गो ळ्याचा ओ व्हर डोज तर घेत नसेल!

त्यानंतर घरातील सर्वांनी तिच्याशी बोलण्याच ठरवलं, तिची psy chia trist चे उपचार बंद करावे असे ठरले. घरातील सर्वजण रात्री जेवल्यावर एकत्र जमले. त्यांनी जे ठरवले होते ते तिला सांगितले. सर्वाचं ऐकून ती बोलली, “प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे हे समजायला मला बराच वेळ लागला. माझी व्यथा, चिं ता, माझे नै राश्य, माझे धैर्य, माझी निद्राना श आणि माझा त णावता ण फक्त तुमच्या समस्या सोडवण्यात गेला.

पण हे करता मी तर माझ्या समस्या वाढवतेय, हे कळायला मला अनेक वर्षे लागली. “आई, ते कसे काय” तिची मुलगी बोलली. “होय, मी बरोबर बोलते आहे, मी कोणाच्याही कृतीसाठी जबाबदार नाही आणि तुम्हा सर्वांना आनंद देणे हे माझे काम नाही. मी केलेल्या कृतीवर दिलेल्या प्रतिक्रियांसाठी जबाबदार आहे. माझे विचार, भावना, वागणे मी बदलू शकते आणि तुम्ही तुमचे “पण तुला अचानक असे का वाटायला लागले” तिचा नवरा बोलला.

“अचानक नाही बरीच वर्षे लागली. तुमची सर्वांची खूप काळजी, चिं ता, सेवा करून मी खूप थकले होते. नै राश्याच्या आ जारातून जाता जाता मी या निष्कर्षा पर्यंत पोहोचले की माझे स्वतःचे कर्तव्य आहे की शांत राहणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्याशी सं बं धित असलेल्या गोष्टी सोडवायला देणे.” “आई तू अशी न वागता, योगा मे डिटेशन कर, मन शांत राहील.” मुलगा बोलला. “मी योग, ध्यान, चमत्कार, स्वयं विकास पुस्तके आणि न्यू रोलिं गुइ स्टिक प्रोग्रा मिंगचे अभ्यासक्रम केले आणि म नोवि कार डॉ क्टरकडे ही औ षधे करते आहे.

माझी झोप, मूड यामुळे चांगला झाला. मी डॉ क्टरांना विचारले की “माझी औ षधे कधी बंद होणार?” त्यांनी मला सांगितले, ”नै रा श्य चिं ता आ जार सहा महिने योग्य प्रमाणात डॉ क्टरी सल्ल्याने औ षधे घेतली की बरा होतो. पण तुमची औ षधे बंद होणे तुमच्या हातात आहे. जो पर्यत स्वभाव आणि जीवनशैली बदलणार नाही तो पर्यत ते शक्य नाही. त्यांनी मला माझ्या दु:खाच कारण शोधायला सांगितले” त्या मनमोकळेपणे बोलल्या “मी जेव्हा विचार केला.

तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे हे आहे परंतु तुमच्या समस्या सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.”

“तुम्ही मला विचारले तरच मी तुम्हाला माझा सल्ला देऊ शकते आणि ते पाळायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयांचे चांगले किंवा वाईट परिणाम आहेत आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील , अनुभवावे लागतील. “आता पुढे काय ठरवलं आहेस?” सासू बोलली. “आतापासून मी माझ्या जबाबदाऱ्यांचे योग्य पार पाडणार पण तुमच्यामुळे तयार झालेली अपराधाची, पश्चात्तापाची भावना मनात ठेवणार नाही.

तुमच्या चुकांची वकिली करणार नाही, तुमच्या जबाबदारी माझ्या खांद्यावर घेणार नाही, तुमची कर्तव्य तुम्हाला पार पाडावी लागतील. आजपर्यंत मी तुम्हाला सर्वानाच लहान मुलासारखी जपत होते. आतापासून, मी तुम्हाला सर्व स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रौढ घोषित करते.” ती धीर गं भीर होऊन बोलली. तिच्या घरचे सगळेच अवाक झाले होते. त्या दिवसापासून, कुटुंब अधिक चांगले कार्यरत झाले कारण आता घरातील प्रत्येकाला माहित होते की त्याची जबाबदारी काय आहे आणि त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे.

शांती ने हरवलेली मनःशांती परतली होती आणि सर्व औ षधे बंद झाली होती. आपल्यापैकी काहीं लोकांसाठी हे सर्व खूप कठीण आहे, कारण आपण काळजी वाहू म्हणून मोठे झालो आहोत. आपण इतरांसाठी जबाबदार आहोत हे मनावर बिंबले गेले आहे. आई आणि पत्नी म्हणून आम्ही सर्व स्वीकारले आहे. ‘कुटुंब म्हणजे मी’ हा विचार आपल्याला त्रा सदायक होतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे किंवा सं घर्ष करावा असे आपल्याला कधीच वाटत नाही.

प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी आमची इच्छा आहे. परंतु, जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून काढून प्रत्येक प्रिय व्यक्तीवर टाकू, तितकेच चांगले. आपण त्यांनाही जबाबदार होण्यासाठी तयार करू. प्रत्येकाला खुश करण्यासाठी, सर्वकाही बनण्यासाठी, आपण पृथ्वीवर आलो नाहीत. स्वतःवर दबाव आणणे थांबवा आणि मोकळेपणाने जगा. मग कुटुंब ही आनंदात जगेल आणि तुम्हीही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *