बायकोला जगवण्यासाठी या आजोबांनी आपल्या मुलाचे जे गुपित लपवून ठेवले होते..पण जेव्हा हे गुपित बाहेर येते तेव्हा जे काही होते

लाईफ स्टाईल

इंतजार बुजा नही पाया है उम्मीद की लौ। कभी देखने की हसरत में। कभी मिलने की उम्मीद में । अगर‌ हौसला है तो हर मौज में किनारा है । आमच्या शेजारी एक जोडपं राहायचं. साधारण दोघांचे वय 50 ते 60 असेल. त्यांना आम्ही प्रेमाने काका-काकू म्हणायचो. त्यांना राज नावाचा एक मुलगा होता. तो भारतीय सुरक्षा यंत्रणेशी निगडित गुप्त मिशनवर गेला असता.

तिथेच बेपत्ता झाला. काही जण म्हणाले या जगातच नाही. हे ऐकून काका-काकूंना खूप मोठा धक्का बसला. हे ऐकून काकूंना मा नसिक धक्का बसला. त्या अंथरुणाला खिळल्या. आपल्या मुलाला असं काही ऐकल्यावर त्या आईची अवस्था काय झाली असेल याचं वर्णन कल्पनेत करणे सुद्धा अशक्य आहे. काही दिवसांनी दिल्लीतून मिशन वाल्यांचं पत्र आलं.

त्यांनी काकांना दिल्लीला बोलावून घेतलं. काका दिल्लीहून परत आले तेही अगदी आनंदात. मुलाच्या मृ त्यूच्या बातम्या अखेर अफवाच होत्या. पण पार्थिव काही मिळालं नव्हतं. कदाचित मुलगा अजून मिशन वरच आहे. कधी येईल सांगता येत नाही हे ऐकून सगळ्यांना खूप बरं वाटलं. हळूहळू काकू या आ जारातून ठीक होत होत्या. त्या मुलाला आवडतात म्हणून गुलाबजाम, बेसनचे लाडू करून ठेवायच्या.

पक्षी आपली पिल्ले बाहेर गेल्यावर संध्याकाळी घरात येण्यासाठी कशी वाट बघतात तस त्या राजची वाट बघायच्या. स्वागतासाठी जंगी तयारी करायच्या. त्याच्या बालपणातील आठवणी दररोज दोघांच्या गप्पांमध्ये असायच्या. काकू ने कधी त्याच्या फोटोला हार घातला नाही. त्यांच्या वाढदिवसादिवशी फोटोला औक्षण करायच्या. त्याच्या आवडीचे पदार्थ करायच्या. त्याची वाट बघून संध्याकाळी गरीब मुलाला देऊन टाकायच्या.

काकांनी अधून मधून पत्रव्यवहार केला पण काही उत्तर मिळाले नाही. हे सगळं करायला काकांचा पाठींबा असायचा. दोघांनी कधी सुद्धा धीर सोडला नाही. असेच दिवसा पाठोपाठ दिवस निघून गेले. बघता बघता बारा वर्षे झाली. काकूंच्या चेहऱ्यावर आता सुरकुत्या पडल्या होत्या. अशाच एका रात्री काकू शांत झोपल्या होत्या. काका सकाळी फेरफटका मारून आले. तरी काकू उठल्या नव्हत्या.

बारा वर्षापूर्वी मृ त्यूच्या हुलकावणीच पारड मात्र आज जड झालं होतं. दुसऱ्या दिवशी सोसायटीतली जुनी मित्रमंडळी काकांना भेटायला आली‌. काका शांत होते कोणत्या तरी विचारात. सगळे म्हणाले, काळजी घ्या स्वतःची. स्वतःला सांभाळा. आम्ही आहोतच. काकांच्या चेहऱ्यावर काकी गेल्याचं काही दुःख दिसत नव्हतं. अरे मी ठीक आहे. काकू गेल्या‌ काही त्रा स न होता. हे एका अर्थी बरंच झालं.

पण जाण्याआधी एकदा राजला भेटल्या असत्या तर बारा वर्षांचा वनवास सार्थकी लागला असता. एक आजी डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली. कसा भेटणार होता, तो कधी भेटणारच नव्हता. अहो वहिनी, दिल्लीला जाऊन बारा वर्षापूर्वी मी या माझ्या हातांनी अ ग्नी दिलाय. तुम्हाला आठवते तिची अवस्था, अंथरुणाला खिळली होती बिचारी. मला बघवत नव्हते. तिच्यातला प्राण गेला होता. म्हणून मी तिला सांगितलं. तिच्या मनात आशा निर्माण केली.

खोटं बोलल्यामुळे ती किती वर्ष माझ्या बरोबर जगेल हे माहीत नव्हतं. मी माझ्या मुलाला गमावल होतं आता मात्र तिला गमवायचं नव्हतं. एका मित्राने विचारलं, मग ती पत्र आमची ही खूप भोळी होती. त्यामुळे सगळं चाललं. गावाकडच्या बंद घराच्या पत्त्यावर ती पत्र पाठवायचो. एकदा गेलो तेव्हा सगळी पत्र जा ळली. तिला कळू नये म्हणून सगळं केलं. अपरा धी पण वाटलं रे.

एका आईला खोट्या आशेवर बारा वर्ष जगाव लागल याचं खूप वाईट वाटतं. पण एकदा सांगितले तिला तो देशाची सेवा करण्यासाठी केला आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. पण त्या रात्री तापाने फणफणत होती. त्यामुळे विचार केला हा विषय परत कधीच काढायचा नाही. उमीद पर दुनिया कायम है मी हेच लक्षात ठेवले. त्यांच्या मित्रांना काय बोलावं ते कळेना यावर. त्यांनाही धक्काच बसला…

इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती माझी…ती खऱ्या आशेवर जगत तर होती. पण मी खरे माहित असून सुद्धा माझा भावना कधी मुक्तपणे मांडू शकलो नाही. तिचे आणि माझे नातेवाईक सोडले तर कोणालाच माहित नव्हतं. ती लेकाच्या आशेवर जगत होती आणि मी तिच्या आशेवर बारा वर्षाच साठलेल सगळ दुःख बाहेर येत होतं.
एकदम लक्षात आलं ..अरे चला… तुम्ही कामाची माणसं…मी रिकामा आहे…

तुम्ही मला जे सांगता तेच आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कधी काही मदत लागली तर मला नक्की सांगा. कारण आता कसलीच चिं ता नाही. शारी रिक-मा नसिक उम्मीद पर दुनिया कायम है । एखाद्याच्या जाण्याने आपला आयुष्य कधीच थांबत नसत. त्या माणसाच्या आठवणी कायम आपल्या बरोबर असतात. जर काका खोटे बोलले नसते तर काकू त्यांच्याबरोबरची बारा वर्ष कधीच जगल्या नसत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *