नवरा बायकोच नातं कसं निखळ आणि निस्वार्थ असावं. नात्यात मोकळेपणा असावा, म्हणजेच दोघांच्यात समजूतदारपणा असेल तर आयुष्य सु खकर होते. याउलट जर नवरा बायकोत मतभे द असतील किंवा एखाद्या गोष्टीं विषयी सं श य म नात असेल तर आयुष्य जगत असताना खूप स मस्यांना तोंड द्यावं लागत.
त्यामुळे नात्यात दु रावा निर्माण होतो. म्हणून नवराबायकोचं नातं नेहमी निखळ पाण्यासारखं असावं त्यात कुठल्याच प्रकारचा द्वेष अथवा स्वार्थ नसावा. आजच्या या काळात अनेक नाती अशी आहेत कि जी केवळ स्वार्थासाठी किंवा नातं आहे ते टिकवलं पाहिजे असं विचार करून आयुष्य जगत आहेत. आणि हे कशामुळे होतंय याची जाणीव ही करून घेत नाहीत.
या गोष्टीसाठी आणखी एक कारण आहे. बायकोला वाटत असते कि, ‘नवऱ्याने तीझ्या मुठीत राहायला हवे. ती सांगते तसच त्याने करायला हवं.’ आणि नवऱ्याला वाटत असत कि, ‘बायकोने तो जे काही सांगतो आहे ते ऐकून त्या पद्धतीने जीवन जगायचं.’ ह्या गोष्टीमुळे म्हणजेच एकमेकाला धाकात ठेवण्याच्या नादात त्यांच्या संसारावर अनेक परिणाम होतात आणि स मस्या ही निर्माण होत असतात. तर ते परिणाम कोणते ? हेच आपण आज जाणून घेणार आहोत….
बायकोने नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला धा कात ठेवण्याचे परिणाम –
१) प्रेम आणि विश्वास कमी होतो – दोघांचे एकमेकांवर कितीही प्रेम असले किंवा विश्वास असला तरी जर म नात धाकात ठेवायचा विचार असेल तर त्या नात्यात कालांतराने अविश्वास निर्माण होतो व एकमेकांवरचे प्रेम ही कमी होते.
२) मा नसिक त्रा स – धा कात ठेवायच्या नादात दोघांतील संवाद संपतात. मग दोघेही अनेक प्रश्न डोक्यात असूनही त्या प्रश्नांचे निरसन करत नाहीत व त्याचा विचार मात्र म नात करत असतात. अतिविचार आणि नै रा श्य यामुळे मा नसिक त्रा स होण्यास प्रारंभ होतो.
३) एकमेकांचे मत जाणून न घेणे – बायको म नात विचार करते मी का नवऱ्याला विचारून करू किंवा नवरा म नात विचार करत असतो मी का बायकोला विचारायचं. यातून होत असं कि दोघेही कोणत्याही गोष्टीचा निर्णय स्वतः घेतात. निर्णयात एकमेकांच्या मत जाणून घ्यावं असं त्यांना वाटत नाही.
४) दुरावा निर्माण होतो – एकट्याने निर्णय घेणे, एक दुसऱ्याला कमी महत्व देणे किंवा म नाविरुद्ध वागणे यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते.
५) कुटुंबावर परिणाम – नवरा किंवा बायको या दोघांपैकी एकट्याच्या जरी म नात असले विचार असतील तर त्यामुळे त्या नात्यालाच नाही तर पूर्ण कुटुंबाला याच्या परिणामांना सामोरे जावे लागते. कारण कुटूंब हे घरातील सर्व माणसांनच्या स्वभावावरच टिकून असते.
६) सोड चि ट्टीची शक्यता – धा कात ठेवण्याचा जो विचार असतो तो जर जास्त काळ राहिला. तर अशा कारणामुळे कालांतराने दोघांचे नाते टि कत नाही. परिणामी दोघांना सोड चिट्टीला सुद्धा सामोरे जावे लागू शकते.
७) ध्येय प्राप्तीस विलंब – बायको व नवरा एकमेकांचा विचार करत असतात कि, मी सांगत आहे तस ते, ती वागत असेल काय ? या विचारात असल्याने ते त्यांच्या ध्येयाचा विचार करत नाहीत किंवा त्यासाठीची वाटचाल ची गतीही कमी होते. परिणामी ध्येय प्राप्तीस विलंब होतो.
८) नात्यात मोकळेपणा राहत नाही – जर एकमेकांना धा कात ठेवायचा विचार असेल तर आपण समोरचा काहीही बोलला तरी त्याचा गैर अर्थ लावला जातो. त्यामुळे वा द होईल या विचारामुळे नात्यात मोकळेपणा राहत नाही.
आपल्या नात्यात अश्या स मस्या नसाव्यात हीच प्रार्थना. पण जर असल्या तर आपल्या स्वभावात बदल करा जेणे करून आपले नातं टि कून राहील. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.