बायकोने त्या रात्री मला मेडिकल मधून अचानक ‘सॅ निटरी पॅड’ आणायला सांगितले…पण त्यारात्री मीने तिच्यासोबत ज्या पद्धतीने

लाईफ स्टाईल

पहाटेचे अडीच वाजायला आले होते, नेहा उठून बा थरूमला गेली, परत येऊन तिने बेडरूमची छोटी लाईट चालू केली आणि तिच्या कपड्याचा कपाटात ती काहीतरी शोधू लागली. तिची शोधा शोध बराच वेळ चालू होती. हळू हळू राघवच्या डोळ्यावरची झोप कमी होत होती. त्याला त्या लाईटचा प्रकाशाचा त्रास होऊ लागला. तो तिला चिडून म्हणाला.” अगं झोप ना, काय करत बसली आहेस एवढ्या रात्री ?”त्यावर ती त्याच्याकडे पाहत.” काही नाही रे!

“एवढंच बोलली आणि परत कपड्यासाठी घरात काहीतरी शोधू लागली. सगळीकडे शोधून झाल्यावर हताश होऊन तिने कपाटाचे दार बंद केले आणि बेड जवळ येऊन त्याला म्हणाली .”राघव अरे मला पि रि यड आली आहे .”नेहाचं ते वाक्य कानावर पडल्या बरोबर तो प्रश्नार्थक नजरेने तिला पाहत “मग ?”एवढेच म्हणाला. ती अपराधीपणे त्याच्याकडे पाहत त्याला म्हणाली. ” अरे पॅ ड नाहीये घरात एक पण, प्लीज रोडवरच्या मे डि कलवर जाऊन घेऊन येतोस का?”

तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला म्हणाला. अगं नेहा किती वाजले आहेत बघ जरा !सॉरी मी नाही आणू शकत. एवढं बोलून तो खाली सरकलेली चादर अंगावर ओढली आणि नेहा कडे पाठ फिरवली. पि रि यड मुळे अवघडलेली नेहा विचार करत जागेवरच थांबली. त्याने हेतूपुरस्पर तिच्याकडे दुर्लक्ष केलं. नेहा पुन्हा तिच्या कपाटाकडे जाऊन काहीतरी उचकापाचक करत असल्याचं त्याला जाणवलं. काही वेळाने का त्रीने कापड कापल्यचा आवाज राघवच्या कानावर पडला, साधारण पाच मिनिटांचा अवधी निघून गेला.

नेहाने काय केलं त्याला काही कळलं नाही, लाईट बंद करून ती त्याच्या बाजूला येउन झोपली. त्याची पाठ तिच्या बाजूला होती. ती त्याच्या पाठी ला बिलगली आणि आपले ओठ त्याच्या कानाजवळ आणून हळू आवाजात म्हणाली. “राघव प्लीज मला जवळ घे ना !”झोप अर्धवट झाल्यामुळे त्याची चिडचिड झाली होती. त्याच्या अंगावरचा हात बाजूला करत तो जरा चिडक्या स्वरातच तिला म्हणाला नेहा झोपू दे यार मला “नेहा निमूटपणे त्याच्यापासून बाजूला झाली.

आणि आपल्या दोन्ही हातांची बोटं छातीवर एकमेकात गुंफून छताकडे पाहत तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्याच्या डोळ्यावरची झोप आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. उगीच डोळे बंद करून झोपेची वाट बघत होता. एकदम नेहाचा आवाज आला म्हणून तो कूस बदलून तिच्याकडे त्याने पाहिलं, आता तिची पाठ त्याच्याकडे होती. गुढघ्यात पाय दुमडून तिने आपलं पोट दोन्ही हातात गच्च पकडून ठेवलं होतं. शरीराचा मुटका करून बेडच्या एका किनाऱ्यावर नेहा शांत पडली होती.

मधेच पोटावरचा तिचा हात कमरेवर फिरत होता. ती आपल्याच हाताने कमरेवर दाब देत होती. हळूहळू त्रा स दिला जाणवत होता. त्याचा मोबाईल वर सहाचा अलार्म वाजला तशी त्याला जाग आली. राघव उठून बेडवर बसला. समोरचे दृश्य बघून त्याला गरगरल्यासारखं झालं मागच्या बाजूने नेहा र क्ताने ओलाचिंब झाली होती, खालचा बेडशीट लाही र क्त लागलं होतं नेहा मात्र गाढ झोपेत होती. त्याची नजर तिच्या चेहर्‍यावर स्थिरावली, तिचा चेहरा निस्तेज दिसत होता, तिला बराच त्रा स झाला असेल कदाचित, आता शांत झोप लागली असेल.

असा विचार मनात चालू होता पण समोरची र क्ताचे डाग बघून नेहाचा राग आला होता. त्याने नेहा म्हणून जरा रागानेच तिला आवाज दिला. शांत झोपलेली नेहा त्याच्या आवाजाने दचकून जागी झाली. र क्ताने डागाळलेल्या बेडशीट कडे हात दाखवून,”हे काय आहे ? “म्हणून त्याने तिला विचारले. नेहाने ते बेडशीट वरचे र क्ताचे डाग, स्वतःचा गाऊन सगळं पाहिलं, ते बघून तिला एकदम अपराध्यासारखे वाटू लागले. कसेतरी तरी त्याच्या नजरेला नजर देत ती म्हणाली, “मी काय करू सांग मला नाही रे कापड घेता येत, तुला म्हटलं होतं मला पॅ ड आणून दे.

जा ना प्लीज आता तरी घेऊन ये ! “तिच्या या बोलण्यावर त्याचं डोकं सरकलं, जवळजवळ तो तिच्या अंगावर जात तिला म्हणाला .”मूर्खासारखं काहीही काय काम सांगतेस ग ?तुझं तू घेऊन ये ना जाऊन, तुला ह्या असल्या गोष्टी जरा आधी आणून ठेवायला काय होतं? डे टची माहिती नसतात का स्वतःच्या स्वतःला ?” नेहा शांतपणे बेडशीट काढत होती. तो कसलाही विचार न करता फाडफाड बोलून टॉय लेटमध्ये निघून गेला.

दहा मिनिटांनी परत आला तेव्हा बेड आणि नेहा दोघेही चकचकीत झाले होते आणि नेहा किचन मध्ये त्याचा टिफिन तयार करत होती. तो आंघोळीला निघून गेला. सगळं आटोपून रोजच्यासारखा जाऊन डायनिंग टेबलवर जाऊन बसला. नेहानं गरमागरम उपीट पुढ्यात आणून ठेवलं तो पोटात ढकलून तो जायला निघाला, टिफीन घ्यायला किचनमध्ये गेला नेहा पोळ्या करत होती. ती पाठमोरी उभी होती. तो काहीतरी घ्यायला म्हणून सहज खाली वाकला तेव्हा त्याच लक्ष तिच्या पायावर असलेल्या र क्ताच्या ओघळाने वेधून घेतलं. नेहाची टाच र क्ताने लाल बुंद झाली होती.

पुन्हा त्याच्या रा गाचा पारा चढला, तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत घराबाहेर पडला. ऑफिसला गेला होता पण त्याचं मन लागत नव्हत. परत परत नेहाचा चेहरा समोर येत होता. किती विश्वासाने तिने त्याच्याशी लग्न केलं होतं. केवळ दोनच वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला. ही माझी किती काळजी घेते. मला काय हवं, काय नको हे तिला चांगले ठाऊक आहे. आज पर्यंत ती कधीच त्याच्या मनाच्या विरुद्ध वागली नाही. त्याच्या तब्येतीची तर त्याच्यापेक्षा तिला जास्त काळजी असते.

आजही चांगला आठवते त्याला मागच्या वर्षीचा एक किस्सा, किती पाऊस पडत होता त्या रात्री, तो ता पाने फणफणत होता रात्र बरीच झाली होती. नेहा सारखं त्याचं अंग थंड पाण्याने पुसून ती मध्येच खिडकीतून पाऊस उघडायची वाट पाहत होती. तिची नुसती तगमग चालू होती. पाउस काय थांबायच नाव घेत नव्हता. नेहा त्या पावसात आलेच म्हणून घराबाहेर पडली आणि तेवढ्या रात्री जाऊन तिने त्याच्यासाठी मे डिकल वरून औ ष ध आणलं होतं. औ ष ध देऊन त्याला लहान मुलासारखे जवळ घेऊन ती झोपली होती.

त्याला तिच्या उबदार कुशीत चांगली झोप लागली होती. हे सगळे त्याला आठवत होतं तो स्नेहा सोबत रात्रीपासून असा का वागला याचे उत्तर मात्र त्याला सापडत नव्हतं. केवळ त्याने त्याला सॅनि टरी पॅ ड आणायला सांगितलं म्हणून तर नाहीना आपण असे वागलो तिच्याशी? हा प्रश्न त्याला त्याच्या अंतर्मनाला विचारला तेव्हा आतून त्याने अगदी बरोबर उत्तर दिलं. हो तिने तुला पॅ ड आणायला सांगितले म्हणून तुझा पुरुषी अहंकार दुखावला पॅ ड आणणे पुरुषाचे काम आहे का ?

परत तो पुरुषी अहंकार त्याला हेच सांगत होता तो क्षणात त्याला बाहेर ओढला आणि पायाखाली घालून कच कच तुडवला. नेहाचा निस्तेज चेहरा त्याला समोर दिसत होता. रात्री नेहाला त्याने पॅ ड आणून द्यायला पाहिजे होतं, तिला जवळ घेऊन झोपायला हवं होतं, तिची कंबर दाबून द्यायला पाहिजे होती. सकाळी किती ब्ल डिं ग झालं होतं तरीही नेहाने त्याला नाश्ता, टिफिन दिलाच ना, पण तो तिच्यासाठी पॅ ड नाही आणू शकला, मग खरच नक्की पुरुष आहे का हाच प्रश्न त्याला पडला.

कसली लाज होती त्याला जाऊन पॅड मागायला. मे डिकल मध्ये स्त्री असली तरी वर तोंड करून तो तिला कं डो म मागतोय की, मग पॅ ड मागायला कसली लाज होती. नेहाला थोडं माहित होतं आज पिरि यड येणार आहेत म्हणून, असेल कदाचित तिची तारीख घरात पॅ ड आहेत म्हणून आणायचे विसरले असेल ती त्याच्या डोक्यात सगळा गोंधळ उडाला हो. नेहा नजरेसमोरून बाजूला जात नव्हती, बॅग घेतली आणि तडक घराकडे तो निघाला, जाता जाता एका मे डिकलवर थांबला आणि त्यातून एक भलामोठा सॅनि टरी पॅडचा पॅक घेतला.

तेवढा मोठा पॅक त्याच्या हातात पाहून सोसायटीतले पुरुष त्याच्याकडे पाहून हसत होते. तर बायकांचा प्रतिसाद संमिश्र मिळत होता. कोणाला त्याचा हेवा वाटत होता, तर कोणाच्या चेहऱ्या वर बायकोचा बैल असे स्पष्ट दिसत होतं. तो सगळ्यांना दुर्लक्षित करून डोअर बेल वाजवली. नेहाने दार उघडलं, ती खूप थकली होती. त्याने तो भला मोठा पॅक सोफ्यावर ठेवून नेहा ला जवळ घेऊन प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. आणि तिच्या माथ्यावर चुं बन घेऊन सॉरी नेहा म्हणाला.

तेव्हा तिच्या डोळ्यातले आनंदाश्रू मोत्यासारखे त्याच्या छातीवर पडत होते. नेहाने तो सोफ्या वरचा पॅक उचलला आणि प्रेमाने आपल्याजवळ घेतला. आणि त्याने मनाशी ठरवून टाकलं या चार दिवसात नेहाला त कसला त्रास द्यायचा नाही. तिचं अंग चेपून द्यायचं जेवढं जमतंय तेवढं आपण तिला खायला करून द्यायचं. शेवटी लोक बायकोचा बैल म्हणाले तरी चालेल. जोडीदार असतो कशाला ? एकमेकांची सुख दुःखे वाटून घ्यायला ना ? जर प्रत्येक पुरुषाने ठरवलं त्या चार दिवसात तिला हवं-नको ते बघितलं तिची विचारपूस केली तर तिच्या मनाला सुद्धा किती बरं वाटेल तुमचा एक प्रेमाचा शब्द सुद्धा तिच्या सर्व वे दना घालवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *