अविनाश खिन्न मनाने गाडीची डिक्की लॉ क करत होता. आजपर्यंत एवढं दडपण कधी आपल्या मनावर आलं नसल्याचं त्याला पुन्हा जाणवलं. आपल्या आईला गाडीत बसवत ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला. गाडी चालवण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. तरी सुद्धा गाडी सुरु करून तो गाडी चालवू लागला. आपल्या आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडणं त्याच्या जी वावर आलेल होत. आईला मात्र या गोष्टीची कानोकान खबर नव्हती.
अविला आपल्या आयुष्याचा सगळा प्रवास आठवत होता. दहा वर्षाचा असताना बाबा गेले, त्यानंतर आई आणि वडील दोघांची जबाबदारी समर्थपणे सांभाळून तिने अविला स्वतःच्या पाहावर उभं केलं होत. उत्तम शाळेत शिक्षण, चांगली नोकरी आणि उच्चविद्या विभूषित जी वनसाथी सगळं त्याला त्याच्या आईनं देऊ केलं होत. दोघांचाही एकमेकांवर खूप जी व होता. अश्या आपल्या आईला आज आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून आपल्यापासून दूर करण खूप जड जात होत.
गाडी आपल्या गतीने पळत होती. अविच मात्र रस्त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करणारी जननी विरुद्ध आपली जी वन संगिनी असा सं घर्ष त्याच्या मनात सुरु होता. अविची आई स्वतः खंबीर होती. अवीच्या संसारात तिची तिळमात्र अडचण होत नसायची, नित्य पूजा, हरिपाठ, देव-देवस्ती आणि अवची मुलगी मीराचा सांभाळ यात तिचा वेळ छान जात असे. तिने अवीच्या वडिलांच्या मागे त्यांनी स्वतः आपला संसार सांभाळला होता.
आजपर्यंत त्यांनी अवि कडून एका पैशाची देखील मदत घेतलेली नव्हती. तरी देखील आवीची बायको जयंती आपल्या सासूवर आपल्या मैत्रिणी आहे माहेरच्या माणसांच्या सांगण्यावरून नाराज होती. तिला आश्रमात सोडून येण्यासाठी तिने अविकडे हट्ट धरला होता, शिवाय जोपर्यंत आई जात नाही तोपर्यंत बोलणार नाही अस सांगून अविशि पंधरा दिवसांपासून अबोला धरला होता. आवीची आई मात्र शांत होती, आपण कोठे जात आहोत याच तिला कल्पना तर आली नसेल न म्हणून अवि चिं ता करत होता, आपण जे करतोय ते चु कीच आहे.
हे समजत असल्याने तो अजूनच काजील झाला होता, त्याच्या डोळ्यातून सतत अ श्रू येत होते. आई मात्र ज्ञानेश्वरी वाचण्यात म ग्न होती. रस्त्याच्या बाजूला आविला उसाचा गाडा दिसला. रस पिऊन डोक शांत कराव असा विचार करून अवीने गाडी थांबवली, एक वृद्ध आजी आणि तिची सून मिळून तो गाडा चालवत होत्या, समोर एका तरुण मुलाचा हर घातलेला फोटो लावलेला होता. अवीची आई त्या फोटोकडे सारखी पाहत होती.
त्यांच्या समोरच एक आठ वर्षाची गोंडस मुलगी इंग्रजी शाळेच्या गणवेशात अभ्यास करत बसली होती. अवीच्या आईने तिला नाव विचारल्यावर खानखनीत आवाजात तिने माय नेम इज भागीरथी असे सांगितले. आज्जीने अविला रसाचे ग्लास आणून दिले आणि अवीच्या आई च्या थोड बाजूला आपल्या जागेवर जाऊन ती बसली, अवि मात्र अजूनही विचारात ग र्क होता. त्याला आपण काय करणार आहोत याचा काहीच अंदाज नव्हत.
अवीच्या आईची नजर मात्र फोटोवरून हटत नव्हती. ते पाहून त्या रसवाल्या आजीने सांगितले,”ल्येक हुता माझा, गाडीवरून पडला अन आम्हाला वाऱ्यावर सोडून गेला.” म्हातारीचे डोळे भरून आले. अवीच्या आईने तिचे सां त्वन केले. अवीने ते सगळ बोलण ऐकल होत. तो आपल्या आईचा विचार करू लागला आपले बाबा गेले तेव्हा आईची अ वस्था याहून वेगळी नव्हतीच, तरीपण तिने सगळ्या गोष्टी समर्थपणे सांभाळल्या. आपल्याला काहीही कमी पडू दिल नाही.
आपण मात्र या सगळ्याच्या बदल्यात तिला आपल्यापासून दूर करण्याचा विचार करतोय? एवढे क्रू र कसे वागू शकतो आपण. आपल्या माउलीची उतराई करताना तिला आपल्या पासून वेगळे करणे बरोबर आहे का? त्याला आता स्वतःचीच ला ज वाटू लागली, काहीही झाले तरी आईला शेवटपर्यंत आपल्यासोबतच ठेवायचं असा विचार त्याने पक्का केला आणि रसाच बिल भागून तेथून निघाला.
इकडे जयंती आपली सासू गेली म्हणून तिची खोली आवरण्यासाठी अवीच्या आईच्या खोलीत गेली. तिथे तिला सगळ्या सामानात तिच्या आणि मीराच्या नावाने केलेल्या काही इ न्व्हेस्ट मेंटच्या पावत्या आणि अवीच्या आईंचे सगळे दागिने सापडले. ते पाहून जयंतीला धक्काच बसला, आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावाने काहीही न करता सगळी मालमत्ता सुनेच्या आणि नातीच्या नावे करून ठेवलेली पाहून तिला खूप वा ईट वाटले, आपली चूक तिच्या लक्षात आली.
आणि आपल्या सासूची क्षमा मागून तिला पुन्हा घरी घेऊन या असा संगय्साठी ती अविला फोन करू लागली. अवीने जयंतीचा एकही फोन घेतला नाही, आईला सोडले कि नाही हेच विचारणार त्यातून पुन्हा वा द होणार, हे नको म्हणून त्याने फोन बंद करून टाकला. वृ द्धाश्रमाची पाटी आता जवळ दिसू लागली होती, तिच्याकडे साफ दुर्लक्ष करून त्याने गाडी समोर दिसणाऱ्या साई मंदिराकडे नेली.
तिथे जाताच आईचा खुललेला चेहरा पाहून त्याला बर वाटलं आपण कशासाठी आईला आणल होत हे तिला समजल नाही याच त्याला समाधान वाटल. जयंती फोन करून थ कली होती. आईच दर्श घेऊन झाल. तिच्या हातातली प्रसादाची वाटी घेण्यासाठी तो पुढे सरसावला. आईला घेऊन पुन्हा घरी आला. जयंती दोघांना पाहून खुश झाली तिने आपल्या सासूला मिठी मा रली आणि फोन न उचलल्याबद्दल अविशि भांडू लागली. आवी साठी हे सगळ नवीन होत. पण समाधानच होत. एवढ्यात छोटी मीरा शाळेतून येऊन आजीला बिलगली.
`