काही वेळा आपल्या आयुष्यात अशा घटना घडून जातात ज्या खूप विचार करायला लावतात. आणि अशा काही गोष्टी जी वाला चटका लावून जातात. आपल्यावर सुद्धा कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्याकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या करावे. हल्ली पाहायला गेले तर आपल्या आजूबाजूला किंवा काही ठिकाणी, हा आई-वडिलांचा सांभाळ करत नाही, त्यांना नीट बघत नाही, सुनबाई वेळेवर खायला देत नाही.
सासू-सासर्यांशी व्यवस्थित बोलत नाही, त्यांच्यावर ओरडते खेकसते अशा गोष्टी ऐकायला मिळत आहेत. लांब शहरात जॉबला असल्यामुळे मुले आई-वडिलांना वृ द्धाश्रमात ठेवतात. अलीकडच्या मुलींना तर सासू-सासरे आपल्याजवळ नको असतात. मग मुले सुद्धा आपल्या बायकोचे ऐकून आपल्याच आई-वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. असे कित्येक प्रसंग पाहून मन अगदी हळहळते. आपल्या पोटच्या मुलाने असे केल्यावर आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो.
पण त्यांची काहीही अपेक्षा नसते, फक्त आपल्या मुलाने आनंदात आणि सुखात असावे एवढीच त्यांची इच्छा असते. आपल्या मुलाने कितीही हाल केले तरी शेवटी आई-वडिलांचं काळीज ते काळीजच. आईवडिलांची आपली मुलं सुखात आनंदात रहावेत, त्यांना काहीही कमी पडू नये असाच आशीर्वाद आणि इच्छा असते, आणि आज आपण असाच एक हृदय स्पर्शी किस्सा पाहणार आहोत.
तर आज रितेश ला थोडा नाहीतर फारच वेळ झालेला होता. अगदी रात्रीचे बारा वाजून गेले होते. दिवसभर कामाच्या धावपळ आणि गडबडीमुळे तो खूपच दमून गेला होता. थकलेला रितेश त्याच्या घरी आला. घरात आल्या आल्या रितेश ची बायको नीलमने त्याच्यावर ओरडायला आणि खेकसायला सुरुवात केली. ती त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करु लागली. ऑफिस मधून तर तुम्ही लवकर निघाला होतात. इतका वेळ कुठे गेला होतात? काय करत होता एवढा वेळ बाहेर? काम काय एवढा वेळ असतात का? बारा वाजून गेले आहेत रात्रीचे.
इतक्या वेळाने रात्रीचे काय काम होते तुमचे? असे बरेच प्रश्न ती विचारत होती. ती खूप रागात होती. नीलम रितेशला काही बोलूच देत नव्हती. प्रश्नांवर प्रश्न विचारत होती. त्यातूनच रितेश सांगत होता. अगं आईला आणायला गेलो होतो. आता तर नीलमचा खुपच पारा चढला होता. कशाला आणले त्यांना इकडे? तुमच्या भावा कडेच राहू द्यायचे होते. इथे काय पैशांचे झाड आहे काय? आधीच तुमचा पगार 10 हजार. एवढ्या तुटपुंज्या पगारामध्ये आपल्या घरच्या गरजा पूर्ण होत नाहीत, आणि त्यांना काय घालणार आहात.
तुमच्या आईला सुद्धा ला ज वाटत नाही का? त्यांना माहीत नाही का आपल्यातील पैशांची अडचण. तरीसुद्धा त्या कशा काय येऊ शकतात. रितेश नीलमला समजावत होता. तरीसुद्धा ती एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिचा तोंडाचा पट्टा काही बंद होत नव्हता. खूप काही भलतेसलते वा ईट बडबडत होती ती, दरवाजाच्या बाहेरच आई अंधारात उभी होती. हे सर्व बोलणे ऐकून डोळ्यातील पाणी पदराने ती पुसत होती. खूप वाईट वाटत होते तिला. नीलम ने दरवाजातील लाईट लावला आणि बघते तर काय. तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
लगेच तिने विचारले, आई तू? अगं तू इथे कशी काय? आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. रडत रडत ती सांगत होती, अग तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी माझा खुप छळ केला, खूप हाल केले. खूप दिवस मी त्रास सहन केला. पण आता मात्र सहन करण्यापलीकडे सर्व गोष्टी चालल्या होत्या. सहन न होताच मी जावईबापूंना फोन करून सांगितले. तर जावईबापू लगेच मला नेण्यासाठी आले. आणि मी इथे आले. दोन मिनिट नीलमला काहीच सुचेनासे झाले. तिचे डोके अगदी भिन्न झाले. तिने आईचे डोळे पुसले आणि स्वतःचे हि.
लगेचच तिने आपल्या आईचा हात धरुन तिला घरात आणले. दुपारपासून काहीच खाल्लं नसशील ना? तू हात पाय धुऊन घे. तुला जेवण गरम करून लगेच वाढते. नीलम ने रितेश कडे बघितले सुद्धा नाही. कोणत्या तोंडाने पाहणार? तिला रितेश बरोबर काय बोलावे हे समजतच नव्हते. तिला आपण तोंडघशी पडल्यासारखे झाले. पण तरीही रितेश कडे अगदी प्रेमाने पाहून ती म्हणाली, काय हो, किती छान सरप्राइज दिले मला! खूप दिवस झाले आईचे आणि माझी भेट झाली नव्हती.
तुम्ही तिला इकडे आणले. मला खूपच बरे वाटले. थँक्यू! तिला पुढे काय बोलावे सुचत नव्हते. ती घाबरली होती आणि तिला खूप पश्चाताप झाला होता. खाली मान घालून ती स्वयंपाक घरात गेली. मित्रहो, अशा कित्येक घटना रोज घडत असतात. पण कोणी गांभीर्याने याकडे लक्ष देत नाहीत. लोक तेवढ्यापुरतेच हळहळतात पण पुन्हा अशाच घटना घडतात. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आई-वडिलांसारखंच निस्वार्थ प्रेम या जगात कोणीही करू शकत नाही.
त्यांच्या मायेची आणि प्रेमाची तुलना कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. आई वडिलांनी आपल्या मुलांना जीवाचं रान करून मोठं केलेलं असतं आणि काही मुलं शेवटी त्यांना असं फळ देतात. या गोष्टीला काहीच अर्थ नाही. एक वेळ तुम्ही मंदिरात जाऊ नका, देव पूजा करू नका पण आई-वडिलांची सेवा करून त्यांच्यातच देव पहा. त्यातच पुण्य आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल आणि तुम्ही हे कराल तेव्हाच तुम्ही महान ठराल. आणि तुमच्या पुढची पिढी सुद्धा सुसंस्कारित होईल.