‘असावे घर ते आपुले छान’ ही प्रत्येकाच्या म नातली एक सुंदर कल्पना. माणूस कसाही असो वा कोणत्याही स्तरावरील असो प्रत्येकालाच एक सुंदर घरटे बनवण्याची म नापासून ओढ असते. घर एक असे ठिकाण आहे जिथे आल्यावर दिवसभराचे क ष्ट, त्रा स ,ता णत णाव सर्व काही विसरून माणसाला निवांतपणा वाटतो.
अनेक प्रसिद्ध व्यक्ती जसे की उद्योगपती ,सिनेमा जगतातील व्यक्ती, खेळाडू तसेच अनेक क्षेत्रातील लोकांनी कोट्यावधी रुपये खर्चून आपल्या म नाप्रमाणे सुंदर अशी आलिशान घरे बांधली आहेत. ती घरे पाहताना म न आणि भान हरपुन जाते आणि तोंडातून निघते ”आईशप्पथ”, तर आपल्याला माहित असेल जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा आणि भारतीयांच्या ”दिल की धडकन” असणारा भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार एम. एस. धोनी याचे घरही खूप आलिशान ,सुंदर आणि मनाला भुरळ पडावे असे आहे.
रांची या शहरामध्ये क्रिकेटपटू एम. एस .धोनी याचा अतिशय सुंदर व आलिशान बंगला साधारणतः सात एकर जागेवर बांधला आहे. बघताच क्षणी कोणाच्या सुद्धा मनात बसेल असे त्याचे घर आहे. त्याने घरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी एक मोठी सुंदर बाग बनवली आहे. शिवाय आतल्याआत खेळ खेळता यावेत म्हणून खूप मोठी मोकळी जागा ठेवली आहे.
त्या जागेवर ची हिरवळ आणि बाजूने असलेले रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहून म न अगदी प्रसन्न होते. पोहण्यासाठी त्याने मोठा जलतरण तलाव बनवला आहे. तसेच आपल्याला माहित असेल कि धोनीला बाईक्सची फार आवड असल्यामुळे त्याने आपल्या बंगल्यात गाड्या पार्क करण्यासाठी खास जागा ठेवली आहे.
आणि विशेष म्हणजे या बंगल्याचे डिझाईन स्वतः धोनीने केले आहे. हे घर बांधण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली होती. तसेच त्याच्या या घराचे नाव ”कैलाशपती” असे आहे. एकंदरीत तो एक महालाच आहे. पण एवढे मोठे घर असताना सुद्धा धोनीने आता चक्क मुबंई, दिल्लीमध्ये फ्लॅट ना घेता चक्क आपल्या पुण्यामध्ये त्याने स्वतःसाठी एक आलिशान फ्लॅट घेतला आहे.
आपणास सांगू इच्छितो कि धोनीला पिंपरी- चिंचवड येथील गहुंजे स्टेडियमच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरण इतके भावले की त्याने तेथे घर घ्यायचे ठरवले. तसही त्याला अनेक वेळा आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएल सामन्यांसाठी आयोजित केलेल्या संघासोबत पुण्यातील स्टेडियमला यावे लागायचे.
क्रिकेटच्या निमित्ताने त्याची सतत पुणेवारी व्हायची. त्यावेळी तेथील गहुंजे परिसरातील किवळे येथे येसतोडा प्रेसिडेन्शियल सोसायटीचे प्रोजेक्टचे काम सुरू होते. तर याच सोसायटीमध्ये त्याने प्लॉट विकत घेतला आहे. तसेच जेव्हापण तो पुण्याच्या दौऱ्यावर येतो तेव्हा तो याच घरात राहतो.
तसेच तेथील दिलेल्या लोकांच्या अधिक माहितीनुसार धोनी येते सारखा येत असतो, आणि ते म्हणाले कि धोनीला येथील वातावरण खूप पसंद आहे. त्यांच्यानुसार तो जेव्हा सुद्धा इथे मुक्कामासाठी येत असतो तेव्हा तो पहाटे पाच वाजता जॉगिंगला बाहेर पडतो. तर तेथील लोकांनी कधीकधी छतावर देखील नेट प्रॅक्टिसस करताना पहिले आहे.
तसेच तेथील लोकांच्या माहितीनुसार धोनी काही महिण्यापुर्वीच येते आला होता आणि तब्ब्ल सात दिवस तो आपल्या कुटुंबासॊबत वास्तव्यास होता. त्यामुळे एकंदरीत धोनी आता पुणेवासीय झाला आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आणि तसं पण पुण्यातील वातावरण जगातील कोणत्याही व्यक्तीला भावते आणि जो कोणी सुद्धा पुण्यात येतो तो पुण्याचा दिवाना होऊन जातो.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.