फेसबुक ते त्या मुलाची रूम, नंतर त्या मुलीसोबत जे घडले ते पाहून..आज त्या मुलींची अवस्था..प्रत्येक आई वडिलांनी एकदा पहाच

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, साधनाने नेहाच्या खोलीचे दार उघडून आत पाऊल टाकले. एक प्रकारची उदास, निराश शांतता तिच्या मनाला भिडली. नेहाला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. साधनाने तिचे कपड्यांचे कपाट उघडले. त्याबरोबर नेहाबद्दलच्या आठवणी तिच्या मनात दाटून आल्या. तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली. नेहा गेल्यापासून तिला एक प्रश्न सारखा सतावत होता, “अवघ्या सतरा वर्षांची माझी लेक, असे काय झाले की तीला स्वतःला संपवून घ्यावेसे वाटले?”

व्यवस्थित आवरलेल्या कपाटातील कपड्यांकडे सुन्न नजरेने पाहात तिने कपड्यांच्या खणा खालचा ड्रॉ वर उघडला. त्यात नेहाच्या हेअर पिन्स, बँड्स वगैरे एक्सेसरीज सोबत एक डायरी साधनाच्या दृष्टीस पडली. डायरी उचलून तिने तिची पान चाळली. डायरीत गौरीने तारखेनुसार काही नोंदी करून ठेवल्या होत्या. जवळच्या खुर्चीत बसून साधना डायरी वाचू लागली.

३०/०३/२०१८ आज खूप कंटाळा आलाय. अभ्यासाचाही मूड होत नाहीये. आजही आईला उशीर होणार असं दिसतंय. ती तरी काय करणार इअर एंडींगमुळे बँकेत तिला जास्त काम असणार त्यामुळे उशीर होणारच. माझे बाबा असते तर आईला एवढं काम करावंच लागलं नसतं. घरातली कामं, तिच्या ऑफिसच्या, माझ्या कॉलेजच्या वेळा सांभाळणं यातच तीचा दिवस मावळतो. एकच स्वप्न आहे तिचं..मी शिकून खूप मोठं व्हावं आणि तिचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार….चला थोडा वेळ फेसबुकवर जाते म्हणजे वेळ तरी जाईल.

३१/०३/२०१८ काल फेसबुकवर साहिलची फ्रेंड रिक्वेस्ट आली. खरं तर मी त्याला ओळखत नाही. आईने सांगितलंय, अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करायच्या नाहीत. पण कसला भारी दिसतो ना तो त्याच्या प्रोफाइल फोटोमध्ये मी त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट केलीये. ०१/०४/२०१८ आज अभ्यास झाल्यावर मी फेसबुक मेसेंजरवर साहिलशी खूप वेळ चॅट केलं. He is damn interesting. मस्त वाटलं त्याच्यासोबत चॅट करून.

०२/०४/२०१८ चॅट करताना मी आणि साहिलने आज एकमेकांचे सेल नंबर घेतले. त्याने लगेच मला कॉल केला. काय मस्त बोलतो? आवाज तर एखाद्या बॉलिवूड हिरो सारखाच वाटतो. खरं तर आईला हे सगळं अजिबात आवडणार नाही. पण मी कधी तरी त्याच्याशी बोलत जाईन. सारखं सारखं नाही. ०४/०४/२०१८ काल मी फक्त अभ्यास केला. मोबाईलला हात पण लावला नाही. खरंतर इलेव्हन्थची एक्झाम आताच संपलीय. पण ट्वेल्थचे क्लासेस कधीच सुरू झालेत. आणि ट्वेल्थला पहिल्यापासून खूप अभ्यास करायचा आहे.

नीटची एक्झाम देऊन मे डिकलला जायचंय मला. आईचीही तीच इच्छा आहे. आजही स्वतःला आवरतेय. फेसबुकवर गेले तर साहिल नेहमी ऑनलाइन असतोच. मग त्याच्याशी बोलण्यात खूप वेळ जातो आणि उगाच गिल्टी वाटत राहातं. आईला कळलं तर आवडणार नाही म्हणून आणि अभ्यासाचा वेळ गेला म्हणूनही. असं करते फक्त पाहते. . फेसबुकवर साहिल ऑनलाइन आहे का? ०५/०४/२०१८ काल फेसबुकवर गेले तर साहिल ऑनलाइन दिसलाच. पाच दहा मिनिटं चॅट करणार होते पण तास-दीड तास कसा गेला कळलंच नाही.

आत्ता अर्ध्या तासा पूर्वी त्याचा व्हिडिओ कॉल आला होता. एफबी प्रोफाइलवर दिसतो त्यापेक्षा वयाने थोडा मोठा असावा. वीस एकवीस वर्षांचा पण कसला हॅण्डसम दिसतो. आणि बोलतो पण मस्त. असं वाटतं. त्याच्याशी बोलत राहावं. येत्या रविवारी जेएम रोडवरच्या सीसीडीमध्ये भेटायचं म्हणतोय. जावं का? त्याला भेटायची तर खूप इच्छा आहे. ०८/०४/२०१८ आज आम्ही सीसीडी वर भेटलो. खूप गप्पा झाल्या. त्याचे आई-बाबा नगरला असतात.

तो इथं पुण्यात तीन मित्रांसोबत फ्लॅट शेअर करून राहतो. इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे. त्याचे ते माझ्याबद्दलचे पॅशनेट लूक मला आतपर्यंत मोहरून गेले. बोलता बोलता त्याने माझे हात हातात घेतले आणि माझ्या सर्वांगात वीज चमकून गेली. आय शुड कन्फेस. आय लव्ह हिम. येस. आय एम इन लव विथ हिम. १४/०४/२०१८ आजकाल डायरी लिहायला सुद्धा वेळ मिळत नाही. अभ्यासातही मन लागत नाही. या आठवड्यात मी कुठलीही विकली क्लास टेस्ट दिली नाहीये. बस. साहिल. साहिल. आणि फक्त साहिल. त्याच्याशी चॅट, फोन कॉल, व्हिडिओ कॉल आणि त्याचे विचार.

दुसरं काही सुचतच नाही. या आठवड्यात आम्ही दोनदा भेटलो. उद्या त्याच्या फ्लॅटवर भेटायचं ठरलंय. तर पाच दहा मिनिटं त्याच्याशी चॅट करते. फक्त पाच दहा मिनिटंच हं. १६/०४/२०१८ काल मी गेले होते साहिलच्या फ्लॅटवर त्याला भेटायला. आम्ही दोघंच होतो तिथे. त्याने मला मिठीत घेऊन कपाळावर, गालांवर आणि ओठांवर कि स केलं. नंतर हळुवार उचलून बेडवर ठेवलं. मी त्याच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाले होते की. माझे क प डे केव्हा दूर झाले कळंलच नाही. Ohh… I lo st myvir ginity. गिल्टी वाटतंय. But it was a hea venly exp erie nce. . and after all we lo ve each other. पण. पण आईला कळलं तर.

३०/०४/२०१आज काल आम्ही साहिलच्या फ्लॅटवरच भेटतो. तेही आठवड्यातून दोन तीनदा. राहवतंच नाही एकमेकांशिवाय, आम्हाला से क्स करण आता खूप आवडू लागला होतं, पण आज त्याने आम्हा दोघांचा सेल्फी व्हिडीओ काढला. तसं करताना. म्हणला. तुझी आठवण आल्यावर पाहात जाईन. मी नको म्हणत होते तरीही. २०/०५/२०१८ आईला काही कळलंय का ? विचारत होती. की मी क्लासेसच्या विकली टेस्ट्स का दिल्या नाहीत? क्लासच्या सरांचा तिला एसएमएस आला होता. माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली.

”तु मोठी झाल्यासारखी वाटतेय आणि आजकाल तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो गं. अभ्यासाचे टेन्शन आहे का?” मी काही तरी सांगून वेळ निभावून नेली. २५/०५/२०१८ Oh god !!! How could He do this to me???? He is a big che ater. रडून माझे आज डोळे आ ग करताहेत. त्या जागीही खूप खूप दुखतंय. आई गं !!! आज साहिलने त्याच्या मित्रांबरोबर. मला. शी .किळस येतेय मला स्वतःचीच. मी नाही म्हटले तर म्हटला, त्याच्यासोबतचा व्हिडिओ आईला पाठवेल आणि पो र्नसाइटवर सुद्धा अपलोड करेल.

अरे देवा !! कुठे अडकले मी ? आता यातून बाहेर कशी पडू ?? आईला सगळं सांगू का ? नको. तिला खूप खूप वाईट वाटेल. नकोच. १५/०६/२०१८ गेल्या काही दिवसांत माझ्या श री राची अक्षरशः चा ळण झालीय. कितीदा तरी साहिलने आणि त्याच्या त्या तिन्ही मित्रांनी माझ्यावर अ त्या चार करून माझ्या श री राचे ल चके तो डले आहेत. घाणेरडेपॉ र्न व्हिडि ओज दाखवून मला नाही नाही ते करायला लावतात. नाही म्हटले तर माझ्यासोबत काढलेले व्हिडि ओज व्हायरल करण्याची ध मकी देतात. मी आईचे ऐकायला हवे होते. अनोळखी साहिलची रि क्वेस्ट एक्से प्ट करायलाच नको होती.

म्हणजे आज असं काही झालंच नसतं. माझं आयुष्य पहिल्या सारखंच सरळ, छान असतं. मी, आई, मैत्रिणी, अभ्यास किती छान होतं सगळं. मीच माझ्या हाताने सगळं घालवलं. सगळ्यांना दूर करून या घाणे रड्या चक्रव्युहात अडकले. आता हे सगळं थांबवून, यातून सुटण्याचा एकच मार्ग दिसतोय मला. स्वतःला संपवायचं. आई मला माफ कर. . पण दुसरा काहीच मार्ग दिसत नाहीये.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *