आजची पोस्ट अश्या कॉलेज कुमारांसाठी तसेच इतर वयातील पुरुषासाठी आहे जे सोशल मीडिया वरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून त्या गोष्टीवर विश्वास ठेऊन फसवणुकीला ब ळी जातात. फेसबुक वरती असे भरपूर मुलींच्या नावाने अकाउंट आहेत. एन्जल प्रिया, लव्हली ग र्ल असे असे नाव आणि आकर्षक डी पी लावलेला असतो.
मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली कि मुले हरखून कोणताही विचार ना करता ती रिक्वेस्ट स्वीकारतात. मग एकमेकांचे नंबरची देवाणघेवाण होते. मग चालू होते ओळख व्हायला. मुले त्या मुलीला इतके भाळतात कि स्वतः बद्दल खरी खोटी माहिती देतात. नाव गाव खर सांगून बाकीची माहिती खोटी सांगतात म्हणजे प्रॉ पर्टी किती घर कसे आहे गाडी आणि इथंच तो मुलगा फसतो.
मुलीने विणलेल्या खोट्या जाळ्यात अडकत जातो आणि त्या मुलीच्या गोड गोड बोलण्यावर विश्वास ठेवतो. मग फ्रेंडशिप मग प्रपोज मग एकमेकांचे सेल्फी पाठवणे आणि मग सुरवात होते प्रायव्हेट फोटो पाठवायची. ती त्याला से क्स चाट साठी रिक्वेस्ट करते. मुलाच्या मनात पण असाच काहीतरी असते. आणि तो त्या गोष्टीच्या परिणाम काय होईल याचा विचार न करता त्या मुलीला से क्सचाट साठी तयारी दाखवतो.
सुरुवातीला ती मुलगी स्वतःचे न्यू ड विडिओ तुम्हाला व्हाट्सअँप व्हिडीओ कॉ ल वर दाखवते आणि तुम्हालाही न्यू ड व्हायला सांगते. तुमच्याही मनात असेच काहीतरी तरी असते तुम्ही इतके मोहात असता कीं ती मुलगी जे सांगत ती गोष्ट ऐकत असता. त्या नंतर ती तुम्हाला तुमचा प्रायव्हेट पा र्ट दाखवण्यासाठी हट्ट करते आणि तुम्ही तीच्या सांगण्यानुसार करताही.
तुम्हाला या गोष्टीची कल्पना ही नसते कि तुम्ही तिच्या जा ळ्यात अ डकला आहेत आणि तिने तुमच्या व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले आहे. आणि त्यात तुम्ही गळ्यापर्यंत फसला आहेत. दुसऱ्या दिवशी तुमचे स्क्रीन रेकॉर्डिंग ज्यात तुम्ही पूर्ण न्यू ड असता तो व्हिडीओ तुम्हाला पाठवला जातो आणि मग सुरवात होते तुम्हाला ब्लॅ कमेल करण्याची. आता तुम्हाला समजते कि तुम्ही किती मोठी चूक केली आहे ज्या मुलीला फकत २ दिवस ओळखता तिच्यावर एवढा कसा विश्वास ठेवला.
ती मुलगी व तिचा साथीदार तुमच्याकडे पैशाची मागणी करतो आणि जर पैसे नाही दिले तर व्हिडीओ लीक करण्याची ध मकी देतो. पैसे देण्याशिवाय पर्याय नसतो मग मित्राकडून उधार घेणे किंवा काहीतरी विकून तुम्ही त्यांचे पैसे देता. पण पैसे देऊन पण त्यांची मागणी काही थांबत नाही आणि मागेल तेव्हा पैसे देण्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर तुम्हाला एका अज्ञात नंबर वरून कॉल येतो.
महिला बोलत असते आणि ती सांगते कि ती अमुक अमुक पो लीस स्टेशन वरून बोलत आहे. “तुमचा न्यू ड व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे आणि तो व्हिडीओ काढून देण्यासाठी ५०००० रुपये द्यावे लागतील”. आता तुम्हाला तुम्हाला इज्जतीची काळजी वाटते आणि त्यामुळे तुम्ही घरी मित्रांना सांगू शकत नाही आणि पो लीस कंप्लेंट हि करू शकत नाही.
आता व्हिडीओ काढून टाकण्यासाठी तुम्ही परत ५०००० रुपयाची जुळवा जुळव करता आणि पैसे देऊन टाकता. खरतर फेसबुक वर फे क अकाउंट उघडून तुमच्याशी चाट करणारी महिला नसून पुरुष आहे आणि त्याने मुलीचा म्हणून स्क्रीनवर खोटा व्हिडीओ दाखवलेला असतो. पण तुम्हाला तो खरा वाटलेला असतो. तूम्हाला वस्तुस्तिथी समजते पण वेळ गेलेली असते असते.
हे खूप मोठे रॅकेट आहे जे झारखंड राजस्थान मधून लोक चालवतात. कमी वेळात ज्यास्त पैसे मिळवण्यासाठी काम धंदा ना करता लोकांना फसवायचे काम हे लोक करतात. त्यांच्याकडे सिम कार्ड फेक असते त्यामुळे त्यांचा पत्ता कधीही लागत नाही, काही टोळ्या लोकांना एटीएम बंद होईल तुमच्या मोबाईल वर एक कोड येईल असे सांगून लोकांचे परस्पर बँकेतून पैसे काढून घेतात. ऑनलाईन खरेदी च्या वेबसाईट पण लोकांना फ सवण्याचा काम करता.
या टोळीला ब ळी पडायचे नसेल तर खालील गोष्टी ध्यानात ठेवा- १. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपला नंबर देऊ नका. २ मोबाईल वर आलेला कोड कोणालाही देऊ नका. ३. ध मकीला ना घाबरता पो लिसांना सांगा. ४.तुमची प्रोफाईल लॉक करून ठेवा. ५. सोशल मी डिया वरच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊ नका.