प्रॉपर्टिची कागदे हरवली तर काय करावे…तसेच दुसऱ्याच्या हाती ती कागदे लागली तर काय करावे

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, अस म्हणतात की प्रॉपर्टी पेक्षा प्रॉ पर्टीची कागदपत्रे खुप महत्वाची असतात, त्यामुळे आपल्या प्रॉपर्टीची कागद पत्रे सांभाळणे आणि ती व्यवस्थित ठेवणे हे अत्यंत महत्वाचे असते. तरी देखील काही वेळेस प्रॉपर्टीची ओरिजिनल कागदपत्रे आहेत ते हरवतात आशा परिस्थितीत काय करावे किंवा आपल्याकडे प्रॉ पर्टीची मूळ कागदपत्रे नसतील.

तर आपला प्रॉपर्टीवरील मालकी हक्क संपुष्टात येतो का? तर नाही या परिस्थितीत आपण काय करू शकतो? आणि आपल्याकडे कोणकोणते पर्याय शिल्लक राहतात? मूळ कागदपत्रे जेव्हा आपल्याकडून हरवतात किंवा गहाळ होतात तेव्हा सर्वात प्रथम ही कागदपत्रे हारवल्याबाबत तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला दिली पाहिजे, याला आपण डॉ क्युमेंट मिसिंग कंपलेंट अस म्हणतात.

जिथे तुमची कागदपत्रे हरवलेली आहेत त्या पो लीस स्टेशन ला तुम्हाला त क्रार द्यावी लागेल. या तक्रारींमध्ये तुम्हाला तुमची जी कागदपत्रे हरवलेली आहेत त्याचा पूर्ण तपशील द्यावा लागेल आणि ही कागदपत्रे कशा प्रकारे गहाळ झालेली आहेत हे देखील सांगावे लागेल. किंवा मिसिंग कंपलेंट दाखल केल्यानंतर तुम्हाला त्याचा एक मिसिंग कंपलेंट नंबर मिळतो.

आणि तुमच्या तक्रारीचा एक नमुना देखील मिळतो. त्याचबरोबर एक जाहीर नोटीस स्थानिक वृत्तपत्रात देणे देखील गरजेचे आहे, की ज्या नोटिसमध्ये हे नमूद असायला हवे की अमुक प्रॉपर्टीचा मूळ दस्त हरवलेला आहे त्याची मिसिंग कंपलेंट दिलेली असून त्याचा नंबर अमुक असा आहे आणि जर ते मूळ कागदपत्र कोणाला सापडले.

आणि त्या कागदाचा गैरवापर करून कोणी व्यवहार केला तर तो आमच्यावर बं धनकारक नाही. आता आपण हरवलेल्या कागदपत्रांची सर्टीफाईड कॉपी म्हणजे सही शिक्क्याची नक्कल काढून घ्यायची. सर्टीफाईड कॉपी कशी काढावी याची प्रक्रिया आपण पाहुयात, सर्वप्रथम जेथे प्रॉपर्टी स्थित असेल तेथील सब रजिस्टर ऑफिस मध्ये म्हणजेच..

दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन एक अर्ज द्यावा लागेल. त्यांध्ये अर्जदाराचे नाव, दस्त क्रमांक, दस्ताचा दिनांक आणि दस्तावरील लिघून घेणार आणि लिहून देणार यांचे नाव नमूद करावे लागेल आणि जी काही कार्यालयीन फी असेल ते भरून सर्टीफाईड कॉपी म्हणजे साक्षांकित प्रत दोन ते तीन कार्यालयीन दिवसात तुम्हाला मिळून जाईल.

अर्ज करताना एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की छापील अर्ज असेल तर त्यामध्ये कोलम असतो, त्यामध्ये विचारले जाते की साक्षांकित प्रत तुम्हाला हवे असण्याचे कारण काय तर तेथे स्पष्ट नमूद केले पाहिजे की मूळ दस्त हरवलेला आहे. त्याचप्रमाणे जर साध्या आणि कोऱ्या कागदावर अर्ज करत असेल तर ते देखील नमूद केले पाहिजे.

तूंचे मूळ दस्त ऐवज हरवले आहे आणि त्यासाठी ही साक्षांकित प्रतिची अवशक्यता आहे. याप्रकारे जर तुम्ही साक्षांकित प्रत प्राप्त करून घेतली कि ती प्रत अगदी मूळ कागद पत्रांसारखीच असते आणि का यद्याने त्या साक्षांकित प्रतीला तेवढीच किंमत देखील आहे. आणि अशी साक्षांकित प्रत तुम्ही को र्टात देखील पुराव्याच्या उद्देशाने दाखल करू शकता आणि को र्टात स्वीकारला ही जातो. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज ला ईक, शे अर आणि फॉ लो करा.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *