रविना आणि राजेश यांचा नुकताच प्रेमविवाह झालेला. दोघंही कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून एकत्र. पुढे नोकरी देखील एकाच ऑफिसमध्ये त्यमुळे दोघांच्या घरचे एकमेकांना चांगलेच परिचयाचे. घरच्यांनी अगदी थाटामाटात दोघांच लग्न लावून दिल. दोघ लाग्ना नंतरचे दिवस छान एन्जॉय करत होते. थोड्याच दिवसांनी ऑफिस जॉईन केलं.
नव्याचे नऊ दिवस सं पले आणि घरामध्ये कुरबुरी सुरु झाल्या. रविना एकुलती एक लेक असल्यामुळे थोडी लाडतच वाढलेली होती, तिला घरकाम आणि ऑफिस दोन्ही सांभाळायची सवय नव्हती. त्यामुळे राजेशची आई आणि रविना यांच्यात सतत काहीनाकाही कारणावरून कुरबुरी होत असत. राजेश दोघींमध्ये कधी पडत नसे, चुकून कधी पडलाच तर त्याला दोन्हीकडून ऐकून घ्यावे लागत असे.
त्यामुळे सुरवातीला तो रविनाला समजावून सांगत असे, पण त्यानंतर त्या दोघांत विनाकारण वा द होऊ लागल्याने त्याने तसे करणे सोडून दिले. असेच दिवसामागून दिवस जात राहिले सासू सुनेची कुरबुर अशीच सुरु राहिली. पण होणाऱ्या बाळाच्या चाहुलीने त्यामध्ये थोडी शिथिलता आली होती. राजेश देखील रविनाची काळजी घेऊ लागला.
त्यातच राजेशला चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी आपणहून चालून आली त्यामुळे सगळेच आनंदात होते. दोघांच्या घरी नुकताच बाळ राजांनी जन्म घेतला. त्यामुळे सगळे आणखी खुश झाले. बाळाची दुड दुड घरच्यांची मने जिंकून घेतली. छोट्या राजवीरने अख्ख्या घरावर राज्य केले. त्याच्या सं गोपनात मात्र त्याच्या आई बाबांची मदत करायला कोणीच नव्हते.
नोकरी करून घरचे काम करून बाळाला सांभाळताना रविना दमून जात असे. राजेश सकाळी लवकर गेला कि रात्री उशीरच घरी येत असे. त्यामुळे त्याच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणेच चुकीचे होते. सासू सासरे घरी असले तरी बाळाला सांभाळण्याचे तेवढेच काम करत तेही मनात आले तरच. सगळ्या गोष्टींचा वाईट आल्याने रविनाने सासरच्याच्या पासून वेगळे व्हायचे ठरवले.
तसे तिने राजेशला पण सांगितले. राजेशने देखील तिला साथ दिली आणि ते दोघेही वेगळे राहू लागले. नवीन घर तिने तिच्या आई बाबांच्या घराजवळच घेतले. त्यामुळे तिला आई बाबांची मदत मिळत रहिली. राजवीर त्यांच्याकडे छान रमत असे. त्यामुळे सगळ्यांचीच काळजी मिटली. लांब राहिल्याने प्रेम वाढते म्हणतात.
त्यांच्या बाबतीतही तसेच झाले. सासू सासरे आता व्यवस्थित वागू लागले, घरी येऊन सगळ्यांशी बोलून करून जाऊ लागले. सगळेच कसे गोडी गुलाबित चालू राहिले. को व्हीडमुळे आता दोघांचेही काम घरातूनच सुरु झाले होते. त्यामुळे दोघाही एकमेकांना देखील वेळ देऊ शकत होते, आई बाबा दोघापन घरी असल्यामुळे राजवीर खूपच खुश होता.
चांगले दिवस फार काळटिकून राहत नाहीत. को रोनामुळे सर्वत्र कामगार कपातीचे सत्र सुरु झाले. त्यामध्ये राजेशचे देखील नाव होते. त्याला बातमी ऐकून धक्काच बसला. नवीन घराचा हप्ता, कारचे लोन, राजवीरची शाळा, आई बाबांच्या औ षधाचा खरच सगळे कसे भागवायचे याच विचारांनी त्याचे डोके भणभण करू लागले. त्यामुळे त्याला दा रूचे व्य सन लागले.
रविना त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, त्याच्या अश्या विचित्र वागण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काहीच समजेना, एक दिवस राजेश रात्री खूप उशिरा घरी आला ते देखील दा रू पिऊन. ते पाहून मात्र रविनाला संताप अनावर झाला. ती त्या रात्री त्याला काहीच बोलली नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र खूप बोलली, पण राजेश मात्र काहीच ऐकून घेत नव्हता, त्याच्या अश्या वागण्याच आणि दा रू पिण्याच कोणताच साम्राठ्न त्याच्याकडे नव्हत.
हतबल होऊन रविना घर सोडण्याच्या विचारात होती. त्याआधी एक शेवटचा उपाय म्हणून तिने राजेशच्या बहिणीला फोन केला. फोनवरून तिला सगळी हकीकत सांगितली, राजेशची बहिण त्याच्याहून चार वर्षांनी मोठी होती. दोघे बहिण भाऊ पहिल्यापासून एकमेकांचे चांगले मित्र होते, त्यांची चांगलीच गट्टी जामायची, म्हणूनच रविनाने रश्मीला सगळ सांगितलं. रश्मीने तिला धीर दिला, आणि शांत राहण्यास सांगितलं.
दोन दिवसांनी रश्मी राजेशकडे अचानक राहायला आली. तिला पाहून राजेशला भरून आल, त्याने तिला बघून घट्ट मिठी मा रली, आणि र डू लागला, शांत झाल्यावर तिने राजेशला र डण्याच कारण विचारलं. त्यान नोकरी गेल्याच सांगितलं. ऐकून रश्मी आणि रविना दोघींना देखील ध क्का बसला, परंतु त्यातून सावरत रश्मीने राजेशला धीर दिला. त्याने हे सगळ आधी न सांगण्याच कारण विचारल.
नंतर आपल्याकडचे थोडे पैसे उसने देऊन लहानसा उद्योग चालू करण्यास सुचवले. राजेशला तिची ही कल्पना पटली. त्याने लगेचच तसे करण्यास होकार दिला. त्याच्या आई बाबांनी देखील त्याला थोडी मदत केली. लवकरच त्याच्या नव्या व्यवसायाची भरभराट होऊ लागली. त्याची आर्थिक स्थिती पुन्हा पूर्वीसारखी झाली त्यामुळे त्याचे दा रूचे व्य सन देखील सुटले. पुन्हा दोघांच्या नव्या आणि आनंदी संसाराचा श्रीगणेशा झाला.