प्रेमविवाह केला आणि आई वडीलांन पासून दूर राहू लागले पण पुढे जे घडतं गेले ते पाहून…

लाईफ स्टाईल

भरत आणि अनुजा दोघेही हॉस्टेलमध्ये एकमेकांचे मित्र झाले. होस्टेलमधले तसेच शाळेतल्या अनेक उपक्रमांमध्ये ते सहभागी व्हायचे. इतरांच्या तुलनेत त्यांच्याकडे विशेष काही गोष्टी होत्या त्यामुळे ते दोघेही इतर विद्यार्थ्यांपेक्षा उठून दिसायचे. शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांचे लक्षात यायचे. उपक्रमाच्या निमित्ताने नेहमी त्यांचा संवाद व्हायचा, बोलणं, चालणं व्हायचं. परस्परांना सहकार्य करणे व्हायचे.

या सर्व गोष्टींमुळे यांची गाढ मैत्री झाली आणि पुढे या लोकांनी लग्न करण्याचे ठरवले. पण दोघांचेही आई-वडील तयार होईना. मात्र होस्टेलमध्ये जुळलेलं नातं इतकं घट्ट होतं की दोघांनाही एकमेकांपासून करमेना आणि त्यामुळे त्यांनी शेवटी सगळ्यांच्या वि रोधात जाऊन लग्न केले. अनुजा भरतच्या घरी सून म्हणून नांदायला आली.

दोन वर्षे झाले तरी सासू-सुनेचे जमेना. भरतच्या आई वडिलांना वाटायचं की आपला मुलगा आंधळा आहे म्हणून सून तरी आंधळी नसावी. जेणेकरून भरतचा संसार सुखी होईल. आणि असंच अनुजाच्याही आई-वडिलांना वाटायचं की आपली मुलगी आंधळी आहे म्हणून आपला जावई आंधळा नको; जेणेकरून आपल्या मुलीचे भले होईल.

पण हे दोघेही जन्मताच आंधळे त्याला आता काय करणार आणि त्यात लग्न झालेलं. त्यामुळे आता दोघेही कायम सोबत राहणार होते. मात्र ही परिस्थिती भरतच्या आईला स्वीकारायला जमेना. त्यामुळे ती सतत अनुजाच्या हात धुवून मागे लागायची. तिला सतत टोमणे मा रायची, तिचा सतत तापमान करायची. लग्नापूर्वी अनुजाला स्वयंपाक करणे जमत होते मात्र ही सासू तुला स्वयंपाक घरात सुद्धा उभी करीत नसे.

असे दोन वर्ष निघून गेले. शेवटी अनुजाने निर्णय घेतला की आपला जर त्रा स घरच्यांना होत असेल तर आपण वेगळे का राहायला नको? आणि तिने हा निर्णय भरतवर सोपवला. भरतही समजदार होता. त्यांनी वेगळे राहणे पसंत केले. या दोन वर्षात त्यांना ओजस नावाचा छोटा बाळ झालेला. हे मायबाप आपल्या लेकरासह घर सोडून दुसरीकडे राहायला गेले.

वेगळे राहायला आल्यामुळे हे दोघे स्वतंत्र होते. त्यामुळे आपल्या सवयीनुसार आणि मनानुसार आणि आपल्या क्षमतेनुसार दोघेही काम करू लागले. दोघेही आंधळे होते म्हणून प्रत्येक गोष्टीत हे परस्परांना सहकार्य करायचे. बाळ छोटा होता त्यामुळे खूप गोष्टी सावधगिरीने पाळाव्या लागत असे. मात्र डोळे जरी आं धळे असले तरी नजर आणि दृष्टिकोन तेजस्वी होता.

मनात स्वावलंबीपणा दाटलेला होता आणि त्यामुळेच प्रत्येक स मस्येवर मा त करत हे आं धळे दाम्पत्य एक एक नवीन गोष्ट शिकत होते. दोघांनी नोकरीचा छान अभ्यास केला आणि दोघेही बँ केत नोकरीला लागले. हुशार तर ते लहान पणापासूनच होते. त्यामुळे आता त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. स्वतःचे घर झाले. ओजसही आता थोडा मोठा झालेला.

आणि त्याला आपल्या आं धळ्या आई-वडिलांची सवय झाली होती. आता परिस्थिती खूप बदलली होती. पूर्वी‌ ज्या आई-वडिलांनी घरातून हाकलून दिले आज त्याच आई-वडिलांना आपल्या मुलाचा संसार पाहून भरून येत होते. कारण एक डोळस व्यक्ती काय संसार थाटेल असा संसार या दोघांनी आंधळे असताना थाटला होता. दोघांचंही एकमेकांवर अपरंपार असं प्रेम होतं.

आंधळे जरी असली तरी त्यांच्यात खूप चांगला संवाद असे. खूप समजूतदारी पण असे. त्यामुळे आपुलकीचा ओलावा कधीच कोरडा झाला नाही. आता तर ओजसच्या पाठीवरती असीम नावाचा दुसरा मुलगा झाला. पूर्वी स्वयंपाक करताना, भांडी घासताना किंवा घरातील अनेक काम करताना सवय नसल्यामुळे खूप जास्त अडचणी यायच्या. मात्र स्वावलंबी मनाने हळूहळू श रीराला तशी सगळी सवय लावून घेतली.

स्वतःपुरतेच काम करता यायचे असे नाही तर हे लोक आपल्या मुलाला शिकवायला सुद्धा लागले. सुदैवाने ओजस आणि असीम आंधळे नव्हते. दोघेही आपल्या डोळ्यांनी टकमक पाहू शकत होते.‌ आणि आता तर ते इतके मोठे झाले आहेत की दोघेही आई-वडिलांचा आधार म्हणून उभे राहिले. आं धळे मुलं म्हणून टाकून दिलेले आई-वडील हल्ली आपल्या लेकरांकडे येणे जाणे वाढवताना दिसतात.

आपल्या म्हातार पणात यांच्याच दोन पै शाचा आधार होईल असे त्यांना वाटते. आणि हे आं धळे दांपत्य त्यांनी आपल्याला हाकलून दिले म्हणून कधीही त्यांना टाकून देण्याचा विचार देखील करत नाही. कारण यांची वृत्ती आणि दृष्टिकोन अगदी स्वच्छ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *