मी नल अतिशय सुंदर, देखणी मुलगी, घारे डोळे, गोरा रंग, लांबसडक केस, सुबक ठेंगणी अतिशय गुणी मुलगी तसेच सुरवाती पासूनच आई बाबांनी अतिशय लाडात वाढवलेली. बोट दाखवेल ते घरात हजर इतक प्रेम, अवखळ बोलण्याने सगळ्यांना आपलेसी करणारी, म नमोहक म्हणताच डोळ्यासमोर जिचा चेहरा येईल अशी ती आणि आता ती बी.ए. च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे.
कॉलेजच्या फुलपंखी जगात नुकतेच पाउल टाकलेलं, नवीन मैत्रिणी, नवा अभ्यास नवीन जगात रममाण झालेली ती आपल्या आजूबाजूला अनेक मुला मुलीना सोबत फिरताना बघायची. अल्लड वयातील हे नवीन जग तिला नेहमीच भुरळ घालत असायचं. रूपवती असल्याने बरीच मुल आधीपासूनच तिच्यावर फिदा असायची. तिच्या नखरेल अदानी लाखो दिल घा याळ केले जायचे.
ती मात्र अजून कोणाला भुलली नव्हती आणि एक दिवस अचानक तो आला, उंच, देखणा, पहाडी छा ती, पिळदार श रीरयष्टी एखाद्या सिनेमाच्या हिरोला सुद्धा ट क्कर देईल असा आणि तेथेच मी नलची भिरभिरती नजर स्थिरावली.
कॉलेज कट्ट्यावर दोघांची नजर एकमेकांना भि डली, आणि तेथेच दोघांची वि केट पडली. मग रोजचे भेटणे, बोलणे वाढत राहिले.
ओळखीने आता मैत्रीची जागा घेतली. रोज एकत्र कॉलेजला येण एकमेकांसोबतच वेळ घालवण हे नित्याच झाल. संपूर्ण कॉलेज त्यांना लैला मजनू म्हणत असे. मैत्रीची सीमा पार होऊन प्रेमाचा रस्ता कधी लागला त्यांदेखील समजल नाही.
तो जितका दिसायला सुंदर तेवढाच सवयीनी ब रबाद झालेला. प्रेमाच्या पा शात ओ ढण्यासाठी मोठमोठ्या बाता मारणारा, व्य सनी माणूस.
पण तिला त्याची कल्पना नव्हतीच कधी. आपली गावाकडे बारा एकर शेती आहे, २ मजली घर आहे, समोर दुकान आहे शिवाय शहरात ३/४ घरे भाड्याने दिली आहेत अस तिला सांगत राहिला. ती त्याच्या प्रेमात एवढी आं धळी झालेली कि तो जे सांगतो ते खर आहे कि नाही हे तपासून पहाव असा तिला कधी वाटलच नाही.
तो आता तिच्याशी जास्तच प्रेमाने वागू लागलेला, श रीर सं बं ध ठे वण्याची मागणी करू लागला. तेंव्हा मात्र तिने लग्न करण्याचा हट्ट केला. नाईलाजाने त्याने तो मान्य देखील केला. त्याच्या घरातून लग्नाला परवानगी होतीच. तिच्या घरी मात्र ह ल्लाबोल झाला. त्याच्या सवयी घरी माहित असल्याने तो घरच्यांना कधी पसंत पडला नाहीच. उलट त्याच्याबद्दल सांगितल्यावर तिच्या घरच्यांनी तीच लग्न जबरदस्तीने दुसरीकडे जमवण्याचा प्रयत्न करायचे ठरवलं.
तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. पण मी नल सुरवाती पासूनच हट्टी होती. पाहिजे असलेली गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी होती. प्रेमाच्या बाबतीत ती कशी हार मा नेल. तिने घरच्यांच्या मनाविरुद्ध ल ग्न करण्याच ठरवलं. एकेदिवशी दोघेजण पळून गेले, देवळातल्या गुरुजींनी लग्न लाऊन दिल. आणि घरी ती केल्यानंतर प्रचंड गोंधळ झाला.
आई वडिलांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. भावाने तिच्याशी संपर्कच तो डला. गावात सगळीकडे तिच्या कुटुंबाची नाच्चकी झाली. वडिलांनी कित्येक दिवस अन्न-पाणी सोडले होते. भावाचे मित्र तिला फोन करून तिच्या घरच्या परिस्थिती बद्दल सांगत असत. की तू अस करायला नको होत म्हणून रा गवत असत. सगळ्या गोष्टी ऐकून तिच्या म नात कालवा कालव व्हायची.
आपण हे काय करून बसलो अस तिला वाटत राहायचं. पण आता या सगळ्याचा काहीच उपयोग नव्हता. वेळ हातातून निघून गेली होती. त्याच्या घरी मात्र त्यांच्या लग्नानंतर फार काही बदल घडला नव्हता. नव्याची नवलाई काही फार दिवस टिकली नाही. घरात कमावता नवरा एक आणि खाणारी तोंडे सहा अशी परिस्थिती होती. सासूने तर लग्नानंतर आठवड्यातच घरच्या कामातून लक्ष काढून घेतले.
घरात धुणी, भांडी एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयपाक सगळ्या गोष्टी तिलाच बघाव्या लागत. सगळ्यांच्या तऱ्हा सांभाळताना नाकी नऊ येत असत. हतबलतेने ओ क्साबो क्शी र डण्या शिवाय तिच्या हाती मात्र काही उरत नसे. तिला आपल्या आईची अश्यावेळी खूप आठवण येई, तिला आईने आजपर्यंत स्वतःची चादर घडी करू दिली नव्हती, ती मीनल आज सहा जणांच्या तऱ्हा सांभाळून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्रियकराचा नवरा कधी होऊन गेला तिलाच समजल नाही. रोजच्या श रीर सु खापेक्षा जास्त जवळची ती त्याला कधीच वाटली नाही. काही सांगणे, बोलणे प्रेमाने चार गोष्टी बोलणे हे कधी त्याच्याकडून झालेच नाही. घरी त्याच्यापेक्षा लहान भाऊ आणि बहिण त्याचे आईवडील अशी सहा माणसे. लग्न आधी याने सांगितलेल्या बारा एकर जमीन, शेतीवाडी पैकी काहीच यांचं नव्हत २ पडक्या खोल्या आणि समोर दुकान, ते ही कर्जत बु डालेले.
समोर दोन भावंडांची लग्न सगळी जबाबदारी याचीच. नवऱ्याशी काही बोलण्याची सोय नाही, काही सांगायला गेल तर तो आर डा ओर डा करत राही, तुझ्याशी लग्न करून चूक केली म्हणे. तू घरात आल्यापासून अवदसा आली म्हणून मा रहा ण सुरु करे. आज तिच्या पोटात एक अंकुर फुलत आहे. त्याच्या भविष्याच्या काळजी पोटी सगळ स हन करत ती आला दिवस ढकलत आहे.
कारण आता तिच्याकडे मागे जाण्याचा मार्गच नाहीये. कारण जी वन हा एकरी मार्ग असतो इथे एकद्या वेळी यु ट र्न घेऊन परत जाणे कोणालाही शक्य नसते. तिलाही हे लक्षात आल आहे. पण काय करायचे तिला तिच्या चु कीच्या निर्णयाची फळे भो गावी लागत होती..