नमस्कार मित्रांनो, समीर आज वेगळ्याच खुशीत दिसत होता. नुकताच त्याला एक चांगल्या पगाराचा जॉब मिळाला होता. चांगला पगार ही होता आणि जॉब तोही इथेच पुण्यात. त्यामुळं समीर अतिशय खुश झाला होता. मै जिंदगीका साथ निभाता चला गया…असे मस्त गाणे गुणगुणत गाडी चालवत घरी जायला निघाला. बाहेर हवा देखील तशीच धुंद होती. नुकतीच पावसाची एक सर पडून गेली होती. संध्याकाळ होती आणि पश्चिमेला छानसे इंद्रधनुष्य आले होते.
रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती त्यामुळे समीर काहीसा बिनधास्तपणे गाडी चालवत होता. अचानक समोर एक वळण आले आणि समीरचा पाय अ कॅसिलेटर वरून खाली दाबला गेला. आणि क्षणार्धात काय झाले काही कळलंच नाही आणि कानात कानठळ्या बसवणारा आवाज आला अन तो बेशुद्ध झाला. जाग आली तेव्हा त्याच्या नाका तोंडात न ळ्या होत्या, ऑ क्सिजन लावला होता, आय सी यु च्या बेडवर.
बाजूला एक न र्स तिच्या मोबाईलवर गुंग होती आणि बाकी तीव्र शांतता पसरलेली होती. घशाला कोरड पडली तसं त्याने क्षीण आवाजात हाक मा रली. “पाणी हवंय मला..” शेजारच्या न र्सला बहुतेक ऐकू गेलं असावं. पण तिचा चेहरा खूपच उजळला आणि पटकन तिने फोन लावला. “डॉ क्टर, 12 नंबर पेशंट शुध्दीवर आला लवकर या” न र्सने समीर ला सावकाश चमच्यानं पाणी पाजलं, तसं त्याला थोडीशी तरतरी आली.
तो उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती. “अहो तुम्ही इतक्यात काहीच हालचाल करू नका. एकतर दहा दिवसानी तुम्हाला शुद्ध आली आहे” काय? एक – दोन नाही तर दहा दिवस आपण या खाटेवर बेशुद्धावस्थेत होतो हे ऐकून समीर सुन्नच झाला. एका क्षणात सगळं होत्याच नव्हतं झालं. नुकतीच तर त्याला नवीन नोकरी लागली होती, आधीच्या जॉबला कंटाळून गेलेला.
या नवीन नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या आनंदात घरी जाऊन कधी एकदा आईला आणि स्मिताला ही आनंदाची बातमी सांगतो अस झाल होत आणि या आनंदात असतानाच अस काही घडावं, याला नियती म्हणावे की त्याचे दुर्दैव हेच त्याला कळत नव्हते. असा विचार करत असतानाच त्याची आई आणि स्मिता दोघी त्याच्या समोर आल्या.
“पांडुरंग पावला रे बाळा समीर, नुसता जीव टांगणीला लागला होता दहा दिवस. सुखरूप तू यातून बाहेर यावास म्ह्णून साकडे घातले होते बघ विठ्ठलाला.. धन्य आहे तो धन्य”
इतके दिवस काळजीने डबडबलेले आईचे डोळे आता आनंदाने भरून आले. “समीर तू ठीक आहेस ना रे? मला किती दिवस झोपच नाही आणि असा कसा तू गाडी चालवतो रे.. ती बाई बिच्चारी….” स्मिता असे काही बडबडत असतानाच आई ने डोळे मोठे केले. तसं स्मिता ही गप्प बसली. समीर ला काही समजू न देताच त्या दोघीही तेथून निघाल्या आणि जाताना न र्सशी काहीतरी कुजबुजत निघून गेल्या.
दिवसातून दोन- तीन वेळेस डॉ क्टर यायचे आणि चेक करून औ षध बदलून निघून जायचे. दिवस जात होते… हळूहळू समीर ला चांगलेच कळू लागले होते की आपण गेली जवळपास महिनाभर तरी इथे आहोत. हे हॉ स्पिटल देखील शहरातील अगदी नामांकित द वाखान्यात मोडते. आपण जर महिना भर इथे आहोत तर आता होणारं बिल किती असेल याची त्याला काळजी वाटू लागली होती.
कारण सध्या त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. जेमतेम तीन माणसांचा संसार आणि त्यासाठी लागणारे पैसे एवढंच. आधीची नोकरी सुटून चार महिने झालेले आणि नवीन जॉब अजून सुरू होणार तेवढ्यात हे घडले.. त्यामुळे बँक खात्यात पैसे ही थोडकेच. स्मिता आणि आई ने आपल्या द वाखान्याचे पैसे कसे आणि कुठून गोळा केले ??
स्मिता आणि आईला विचारले तर त्यांनी सांगितले ही नाही.
आहेत माझ्याकडे..एवढंच स्मिता बोलली. तिच्याकडे तर कुठून येणार पैसे? लव्ह मॅरेज केलं तेव्हाच तिच माहेर तु टलं. एकाच गावात असूनही त्याचे सासरे- सासू कधीच तिच्याकडे आले नव्हते. आता तर त्यांना आपले असे पाहून आनंदच झाला असेल कदाचित. पैसे देणं, मदत करणे तर लांबच. मग स्मिता ने कसे जमवले पैसे? विचार करून त्याचे डोके सुन्न होत असायचे. कोणीच काही बोलत नसायचे. पण जसजसे एकेक दिवस द वाखान्यात वाढत होता तसा त्याचा संयम तुटत चालला.
त्याचे हात, पाय बाकी शरीर प्रकृतीत सुधारणा होत होती पण मनात अनेक विचार चालू असायचे. असेच विचार करत असताना एके दिवशी समोर एक साठी ओलांडलेले, एक सद्गृहस्थ त्याच्या रूममध्ये आले. “नमस्कार समीर जी, मी अजय मेहता “नमस्कार..? सॉरी पण मी ओळखले नाही आपल्याला? “कसं काय ओळखणार? आपण पहिल्यांदाच तर भेटतोय “कशी आहे आता तब्येत? डॉ क्टरांनी सांगितलेकी औ षध वेळेवर घेता की नाही?
आणि भरपूर जेवत जा. आणि हो तुमच्या या हॉ स्पिटलमधील खर्चाची काहीच काळजी करू नका. तुम्ही निश्चिन्त राहा आणि लवकर बरे व्हा. तुम्ही बरे झाले की निवांत बोलू या. चला परत येईन मी. निघतो आता. अंधार झाला की मला ही दिसत नाही.” समीर ला काहीच कळेना, कोण हा मेहता आणि असा अचानक मला भेटायला आला, आपली विचारपूस केली आणि परत खर्चाची चिं ता करू नको म्हणाला नेमक भानगड काय त्याला समजली नाही.
त्या दिवशी स्मिता जेवणाचा डबा घेऊन आली आणि त्याने हा मेहताचा विषय तिला सांगितला. “मी सांगते तुला सगळे त्या दिवशी तू गाडी चालवत निघालास आणि एक वळणावर तुझ्या गाडीचा ब्रेकच फे ल झाला. तुला समजलंच नाही. समोरच्या वळणावर एका बंगल्यातून एक न र्स नुकतीच एका अ र्धांगवायू झालेल्या वृद्ध महिलेला व्हील चेअर वरून फेरफटका मा रत बाहेर पडलेली. रस्त्यावर उतार होता त्यामुळे तुझ्या गाडीने तिला जोरात ध डक दिकी.
नर्स लांब उडाली पण तिला काहीच झालं नाही आणि बिचारी ती वृद्ध स्त्री याच दवाखान्यात ऍ डमिट होती. तू आणि ती महिला तुम्ही दोघेही मृ त्यूशी दहा दिवस झुं ज देत होतात..पण ती वृध्द महिला नवव्या दिवशी शुद्धीवर आली ती जणू तुला या सगळया जंजाळातून मुक्त करण्यासाठीच. तिनेच तिच्या नवऱ्याला सांगितले की मी अनेक वर्षे जे शरीराचे भोग भोगले त्याची देवालाच दया आली असेल आणि त्यानेच या समीर ला पाठवलं असेल मला मुक्ती देण्यासाठी.
तेव्हा मी गेल्यावर तुम्ही केस वेगेरे काहीच करू नका. उलट त्या बिचऱ्याचे जे काही हॉ स्पिटलचे बिल येईल ते ही तुम्हीच भरा. देवाच्या दयेने आपल्याकडे खूप काही आहे.. माझी ही शेवटची ईच्छा आहे असेच समजा.. असे म्हणून तिने डोळे मिटले. स्मिता सांगत होती आणि समीर चा विश्वासच बसत नव्हता. अशी ही माणसे या जगात असतात हेच त्याला मुळी पटत नव्हतं. पण सत्य तर समोरच होतं.
मेहता शेठजी नी त्यांच्या बायकोला दिलेला शब्द तंतोतंत पाळला. हॉ स्पिटलचे पाच साडे पाच लाखाचे बिल त्यांनी भरले. त्यांना एकच मुलगी होती ती ही कॅनडा मध्ये. त्यामुळे मग त्यांनी समीर लाच आपला मुलगा मानला व राहिलेली काही वर्षे समीरच्या संसारात रमवली आणि त्यांनीही ही इहलोकीची यात्रा सुखात संपवली.