नमस्कार मित्रांनो, घरच्यांचा विरो ध पत्करून अंतर जातीमध्ये पळून जाऊन वि वाह करणारी आरती दहा वर्षांनी हातात एक लिफाफा घेऊन माहेरच्या दारात उभी होती. इतक्या वर्षांनी माहेरच्या दारात उभे राहताना म नात भीती आणि डोळ्यात पाणी होते. घरात आरतीचा भाऊ सुजय, सुजयची बायको मेघा आणि आई जरा टे न्शन मध्ये बसले होते.
आरतीच्या बाबांना हा र्टच ऑ परेशन सांगितलं होतं, ऑ परेशनला 5 ते 6 लाख खर्च येणार होता. सुजयचे शिक्षण झाले असले तर नोकरीत धरसोड चालू होती त्यामुळे पगारही कमीच होता. इतके दिवस बाबांच्या जी वावरच घर चालत होतं. पैशाची जुळवाजुळव कशी करायची हाच प्रश्न पडला होता. सगळे हतबल झाले होते.
तेवढ्यात दारात आरती उभी राहिली हातातील लिफाफा पुढे करत आणि म्हणाली दादा माझा वाटा. आरतीचे हे शब्द ऐकताच सुजयला खुप रा ग आला त्याने खा डकन तिच्या कानाखाली वा जवली आणि म्हणाला आमची बेइज्जती करून पळून गेलीस आणि आता बाबा हॉ स्पिटलमध्ये आहेत, आम्ही कोणत्या परिस्थिती मधून जात आहव कळतंय का तुला?
बाबांना माहीतच होत की त्या लोकांनी पैशासाठी तुला फसवली. एक दिवस हे होणारच होत म्हणा! आरती र डत तशीच दारात उभी होती. आई पुढे येऊन म्हणाली तू घरात लहान, हुशार म्हणून तुझ्या शिक्षणाला बाबांनी कष्ट करून पैसे भरले आणि तू त्यांच्या अशा अवस्थेत वाटा मागतेस, चांगलेच पांग फेडलेस तू आमचे..
हात जोडून तळतळीने आई बोलली. पण आरती काहीही न बोलता र डतच होती. सगळ्यांच बोलून झाल्यावर ती दिर्घश्वास घेऊन म्हणाली आई, वहिनी, दादा मला माफ करा मी तुमच्या विरो धात जाऊन लग्न केले. पण मला माहित होतं की तुमचा विरो ध राहूल ला नव्हता त्याच शिक्षण नोकरी बघून तुम्ही पसंती दाखवली होती, तुमचा नकार होता तो फक्त जातीला.
पण दादा तिथून मागे येणं मला जमलं नसतं. मान्य आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप केलंय, पण त्यावेळी तुमच्या मनात जे होत, ना की राहूल पैशासाठी माझ्याशी लग्न करतोय पण मी तुम्हाला किती समजावलं तरीही तुम्ही समजावून घेत नव्हता. या दहा वर्षात राहूल ने माझ्या कमाईचा एक ही रुपया मागितला नाही.
हातातला लिफाफा पुढे करत ती म्हणाली दादा यात रक्कम न टाकलेला चेक आहे. बाबांच्या ऑ परेशन ला जेवढे पैसे लागतील तेवढे टाक पण बाबांना बरे कर. ती रडतच होती, बाबांचं उद्या ऑ परेशन आहे हे मला समजलं. तुम्ही मला दिलेले संस्कार, शिक्षण, प्रेम याची तर परत फेड नाही करू शकत, पण माझ्या माणसांच्या संकटावेळी खारीचा वाटा मागायला आली आहे.
आणि मी हे माझ्या घरच्यांना विचारूनच देत आहे त्यांनीच सांगितले सुखापेक्षा दुःखातला वाटा आयुष्यभर पुरेल. उद्या माझं काही वा ईट झालं तर ? मला माझ्या सासरच्याबरोबर माहेरची माणसं ही माझ्या मागे उभी हवीत. आरतीचे हे शब्द ऐकून सगळ्यांनाच गहिवरून आलं. सुजय नी तिला जवळ घेतलं, एवढी मोठी झाली का ग आरती.
आज मलाच चार चांगल्या गोष्टी शिकवल्यास. माफ कर! मी तुझ्या घरच्यांना चुकीचं समजलो. वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. यापैकी कुठल्याही नावाचा किंवा ठिकाणाचा कुठल्याही वा ईट गोष्टीशी सं बंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शे अर करायला विसरू नका.