निवृत्त झालेल्या या शिक्षकाला त्यांचा मुलगा आणि सून मारहाण करत होते पुढे जे घडले ते पाहून तुम्हाला धक्का बसेल….!

लाईफ स्टाईल

तर एकेदिवशी एक गुरुजींना वैतागून शेवटी इच्छा नसताना देखील पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली. साहेब जरा माझी तक्रार लिहून घ्या. साहेबांनी ओळखीचा आवाज ऐकून हळूच मा न वर काढुन पाहिले. एका सत्तरीतील वयोवृद्ध शर्ट पायजमा या साध्या वेशात समोर उभे राहिले होते. साहेबांना आवाजा बरोबरच चेहरा ओळखीचा वाटला. त्यांनी वयस्कर पाहून पुढे जाऊन बसायला खुर्ची दिली. “बोला काय नाव आपले? आणि काय त क्रार आहे तुमची? ” असे विचारले.

“माझे नाव तुकाराम काळे. मी एक निवृत्त शिक्षक आहे. बायकोचे नि धन झाल्याने सध्या मी मुलाकडे राहतो. माझी तक्रार अशी आहे की माझा मुलगा आणि सून मला प्रचंड त्रा स देतात. माझा मुलगा रात्री दा रू पिऊन आल्यावर मा रहा ण करतो.” गुरुजींचे नाव ऐकून साहेब थोडसं भू तकाळात गेले. गावात इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत हेच गुरुजी त्यांना शिकवायला होते. गुरुजींच्या आवाजातील जरब अजूनही तीच होती. त्यांचा स्वभाव खूपच मृदू आणि प्रेमळ असा होता.

तो साहेब अत्यंत हुशार असला तरी ही एक उनाड विद्यार्थी होता. शाळेच्या वेळात बऱ्याचदा वर्ग चुकवुन रान मळ्यात भटकायचा. शाळेतील इतर मित्रांच्या खोड्या काढायचा. गुरुजी जवळ नेहमी छडी असूनही त्यांनी त्याचा वापर मात्र कधीही केला नाही. छडी पेक्षा प्रेमाने समजावून सांगण्यावर त्यांचा जास्त भर असायचा. प्रेमाने समजून सांगितल्यास विद्यार्थी लवकर समजतात असा त्यांना वाटे.

तसेच बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शाळेबाहेर पाहूनही शिक्षा न करता गुरुजी त्यांना वर्गात आणून बसवायचे. आज शाळेतले ते दिवस आठवून साहेब भावनिक होऊन गालातल्या गालात हसत होते. गुरुजींनी साहेबांना हसताना पाहून विचारले,” का ओ साहेब का हसताय?” काही नाही, सहजच हसतोय. बरं तुम्ही तुमच्या मुलाचा मोबाईल नंबर मला द्या. आणि बिनधास्तपणे घरी जावा. काळजी करू नका पुढे काय करायचे ते मी बघतो. सगळं व्यवस्थित होईल.”

असे साहेबांनी त्यांना आश्वासन दिले. ठिक आहे म्हणत गुरुजी जरा काळजीनेच घरी निघून गेले. बरोबर एक आठवड्यानंतर आज पुन्हा एकदा गुरुजी पोलीस ठाण्यात आले. गुरुजींना पाहून साहेबांनी खुर्चीवरून उठत त्यांचे स्वागत करत त्यांना नमस्कार केला. “या या गुरुजी काय म्हणतात कसे आहात? तब्येत कशी आहे? मुलगा आणि सून यांनी पुन्हा त्रा स तर नाही ना दिला? अशा आपुलकीच्या स्वरात गुरुजींची चौकशी केली.

“नाही हो साहेब. तुम्ही काय जादू केली हे मात्र मला ठाऊक नाही पण सध्या घरी मात्र कमालीचा बदल जाणवत आहे. मुलगा आणि सून बाई माझी खूपच काळजी घेत आहेत. चहा नाश्ता जेवण सगळ काही वेळेत होत आहे. विशेष म्हणजे माझ्या मुलाचे दा रू पिऊन घरी येणे सुद्धा बंद झाले आहे. तुम्ही असं काय कानमंत्र दिलात?ते मला ठाऊक नाही.”, असे गुरुजी साहेबांना म्हणाले. “मी फार काही केले नाही फक्त फोन वरून माझ्या पोलिसी भाषेत त्यांना समजावून सांगितले.

त्यानेही लगेच समजल्यामुळे त्यांना पोलिस स्टेशनवर बोलवण्याचे वेळच आली नाही. आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला साहेब म्हणू नका “, तसेच साहेबांनी त्यांना ऐकवले. ” मी आज कोणतेही तक्रार घेऊन नाही तर तुमचे आभारच मानायला खास पोलिस स्टेशनवर आलो आहे. बाकी माझं कोणतेही काम नाही”, असे गुरुजी साहेबांना म्हणाले. “आभार मानून गुरुजी तुम्ही मला लाजवताय. तुम्ही मला ओळखलं की नाही हे मला माहीत नाही.

पण मी मात्र तुम्हाला पहिल्या भेटीतच ओळखले. तुम्ही मला पाचवी ते सातवी पर्यंत शिकवायला होता. “असे साहेब म्हणाल्यावर, “अरे मी तर तुला ओळखळच नाही. आज खूपच आनंददायी दिवस आहे. माझा विद्यार्थी पीएसआय झाला हे मला समजले. अविनाश तू?”असे म्हणत गुरुजींनी उठून पाठीवर शाबासकीची थाप मारली. गुरुजींची पाठीवर थाप पडतां साहेबांना गहिवरुन आले. गुरुजी ही तुमची कृपा आहे.

त्यामुळे तुम्ही मला प्रेमाने समजून सांगितलं. तुम्ही तेव्हा मला म्हणाला होतात की मी आज तुझ्या मागे छ डी घेऊन फिरतोय, तसा तो शिकून काही दिवसांनी गुं डांच्या मागे दं डुका घेऊन पडताना मला तुला पहायचय. गुरुजी तुमचे आणि माझे स्वप्न हे पूर्ण झालंय. त्यात तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. परीक्षा दिली. पास झालो. आणि योगायोगाने आज खाकी गणवेशात तुमच्यासमोर उभा आहे. खरोखरच मी खूपच नशीबवान आहे.”

“त्यात कसल आहे माझे योगदान? सर्व तुझी मेहनत आहे. हे माझे काम होते ते मी केले.”- गुरुजी. अविनाश -” मी ठरवलं आहे की तुमचे एक ताठ मा न खाली जाईल असे कोणतेही काम करणार नाही. अपरा ध्यांना शिक्षा करण्यासाठी आणि गरिबांना योग्य न्याय देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहील. वा, तू खरोखरच माझा विद्यार्थी आहे हे तू तुझ्या कामातून दाखवून दिले आहे.तुझे मनापासून धन्यवाद.!”- गुरुजी.

अविनाश साहेब -“तुम्ही मला तुमची मदत करण्याची अनोखी संधी दिलीत हे माझं भाग्य.तुम्हाला माझ्याकडून गुरू-दक्षिणा.” या पेक्षा चांगली गुरुदक्षिणा काय असावी? तुझ्याबद्दल इतरांना सांगताना मला अभिमान वाटेल. तुझे काम असेच सुरु ठेव. शुभेच्छा. निघतो. ” – गुरुजी. ” मी आज तुम्हाला असं जाऊ देणार नाही. जेवणाची वेळ झाली आहे. आज आपण सोबत हॉटेलमध्ये जेवण करूयात.”- अविनाश साहेब. असे म्हणत त्यांनी आग्रह करीत गुरुजींना हॉटेलमध्ये सोबत जेऊ घालत, घरी येण्याचे आमंत्रण देऊन, पुन्हा भेटू असे म्हणत निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *