नवीन लग्न झालेल्या बायकोची कानामागे झंडूबाम लावायची सवय, पण नवऱ्याला हे 5 वर्षांनी कळते तेंव्हा

लाईफ स्टाईल

आमचे लग्न कसे झाले हेच अनेकांना कोडे होते. तसे पाहिले तर माझी नोकरी चांगली होती. स्वतःचे घर होते. घरात वडील सोडले तर कोणीच आ-जारी पडत नसत. घरात नोकर ठेवण्यापर्यंत सुबत्ता होती. तिची माझी ओळख एका लग्नात झाली. दिसायला खूपच सुंदर तिच्यापुढे मी काहीच नाही. तिला मी सांगितले होते लग्नानंतर नोकरी केलीस तरी चालेल.

लग्नानंतर तिने नोकरी केली मग दोन वर्षात सोडली. जास्त जाड नाही तशी बारीक ही नाही, तिच्या गोरेपणात एक वेगळीच सोनेरी झाक होती, पांढरी गोरी नव्हती, खूपच मनमिळाऊ होती. सगळे कसे उत्तम परंतु एक गोष्ट खटकत होती. अर्थात ती मला जाणवत नव्हती ती म्हणजे एकटी असल्यावर कधी-कधी कानाच्या मागे अमृतांजन चोळायची.

तिला गरमपणा आवडत असणार किंवा त्वचारो’ग असू शकतो. मी तिला घेऊन डॉ’क्टर कडे गेलो. त्यांना काही वाटले नाही, असते सवय एखाद्याला. संसार खूप आनंदात चालला होता. दोन वर्षात वडीलही गेले. आम्ही दोघेच उरलो. लग्नाला पाच वर्ष झाली आनंदात पाच वर्षे गेली. मुल होत नव्हते म्हणून थोडे वाईट वाटत होते, मी तिला म्हणालो, “नाही तर नाही आपण मुलगी दत्तक घेऊ,

निदान तिला घर तरी मिळेल”. तिला ते पटले होते. एका ठिकाणी नाव ही नोंदवले होते. एके दिवशी डोके दुखते म्हणून वारंवार अमृतांजन लावू लागली. डॉ’क्टर कडे नेऊन तपासणी केली, सिटीस्कॅन केले. डॉक्टर म्हणाले मेंदूत गाठ झाली आहे आणि लास्ट स्टेज आहे. मी हादरलो ती पण हादरली तरी तिचे कानामागे अमृतांजन लावणे चालू होते. माझे जग पार बदलले होते.

चांगल्या संसाराला नजर लागली होती. आणि काल स्वतःच्या आठवणींचे अस्तित्व ठेवून अखेर ती गेली. दुपारची वेळ होती घरात मी आणि नोकर सगळीकडे सामसूम. दाराची बेल वाजली, मी दार उघडले आणि त्या व्यक्तीला आत घेतले. कदाचित तिच्या ओळखीचे कोणी असेल म्हणून आत घेतले. ती व्यक्ती माझ्याच वयाची होती. तो म्हणाला मी अजय माने,

ऋतुजाचा कॉलेजमधील मित्र. खूप चांगली होती ती. आमचा ग्रुप कॉलेजमध्ये खूप धमाल करायचा. खूप हुशार होती ती. तो बोलत होता मी ऐकत होतो. लग्नानंतर तिने गप्पा मारताना कॉलेज बद्दल सांगितले होते. बोलता बोलता अजय स्तब्ध झाला. लांबून आला होता बहुतेक. मी चहा सांगितला तो नको म्हणाला नाही, कदाचित त्याला त्याची गरज होती.

त्यावेळी त्याच्या डोळे भरून आले होते. चहा पिता पिता गप्पा झाल्या. त्याने जाण्याआधी त्याचा पाऊच उघडला विजिटिंग कार्डचा गठ्ठा काढता काढता त्या पाऊच मधून अमृतांजनची बाटली खाली पडली. मी सहजपणे त्याला दिली. त्यांने कार्ड दिले, येतो म्हणाला. दार लावता लावता अचानक का कुणास ठाऊक ती अमृतांजनची बाटली आठवली आणि मी हादरलोच.

सगळा उलगडा झाला. खरे खोटे माहित नाही ती माझ्याशी खूप प्रामाणिक होती. आनंदाने थोडा काळ का होईना उत्तम संसार केला होता हे महत्त्वाचे होते. बाकी मनाचा खेळ. तरीही अमृतांजनचा वास अस्वस्थ करतोय जरी त्याने माझे डोके दुखायचे थांबले तरी आता तो वास माझीही पाठ सोडत नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *