नवसाने झालेली ही मुलगी बारावीत असताना असे काही वागते की…त्यामुळे आई वडिलांचे जे काही घडते…कदाचित

लाईफ स्टाईल

“बाबा माझ एका मुलावर जी वापाड प्रेम आहे. तो खूप श्रीमंत आहे. तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य एका छोट्याशा खोलीत काढल. मला माझा आयुष्य अस काढायचं नाही. तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून मीच माझ्या आयुष्याचा जी वनसाथी निवडला आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि पोलिसातही जाऊ नका तुम्ही मला शोधून परत घेऊन आला तर मी जिव देईन आम्ही लवकरच लग्न करणार आहोत” तुमची लाडकी, दिदी…

दिलीप थरथरत्या हाताने आपल्या लेकीच पत्र वाचत होता. त्याच्या हातातून पत्रासोबत अठरा वर्षांपूर्वीचा काळ निसटून जात असल्याच त्याला जाणवल. लग्नाला ७ वर्ष झाली तरी बायकोची कुस काही उजली नव्हती. “बाबा” म्हणून ऐकायला कान हत्तीसारखे झाले होते. डॉ क्टर इलाज करून पण हाती निराशाच लागत होती…बाप होता तर नास्तिकच पण शेवटचा उपाय आणि आईच्या इच्छा म्हणून तुळजाभवानीला नवस केला.

“तुझ्या आशीर्वादाने जर माझ्या घरात लक्ष्मीची पावल उमटली तर पायी तुला भेटायला येईन’ असा नवस केला. बोलात आणि फुलात गाठ पडली. काही महिन्यातच तुम्ही बाप होणार असल्याची बातमी बायकोने दिली. बातमी ऐकून नास्तिक बाप अस्तिक झाला. रोज मनोभावे तुळजा भवानीची पूजा करू लागला….आईचे आणि बायकोचे शेकडो नवस, प्रार्थना, पूजापाठ कामी आले होते.

बरोबर श्रावणातल्या तिसर्‍या दिवशी पहाटे तिचा जन्म झाला. बापाची लेकीसाठी असलेली, आजीची नाती साठीची आस संपली होती. ही आस संपायला सात वर्षांचा काळ लोटला होता. श्रावणातले ऊन पाहिल्यानंतर तणांचा जसा आकार बदलतो, ज्या प्रमाणे श्रावण चैतन्याचं वातावरण निर्माण करतो. तसाच आकार बापाच्या मनाने बदलला होता, चैतन्याच वातावरण त्याच्या आयुष्यात निर्माण झालं होतं.

मुलीच्या आनंदात नवस फेडण्यासाठी पायीदेखील चालत गेला. चालून चालून पायाला फोड आले होते. खोलवर काटे रुतले होते, बोटातून र क्त वाहत होते पण ते सगळ मुलगी झाल्याच्या आनंदापुढे फिक होत. लेकीच्या आनंदपुढे वेदना तग धरत नव्हत्या. दीदी हळूहळू घरात लक्ष्मीची पावलं टाकू लागली. तिच्या प्रत्येक पावलाने घरातील वातावरण प्रसन्न होत होत.

आई तर दिवसभर ताई ताई म्हणत पकडण्यातच दमून जाई. दीदीला काहीही कमी पडू नये म्हणून बापाने दुसरे अपत्य होत असून देखील जन्म न देण्याचा निर्णय घेतला. दीदीला पाच वर्ष पूर्ण होणार होती तेंव्हा दीदीचा वाढदिवस मोठा करायचा म्हणून वर्षभरापासून पगारातून काही रक्कम बाजूला काढून ठेवत होता. आयुष्यात एकदाही केकच तोंड न पाहिलेल्या बापाने लेकीसाठी पाच किलोचा केक आणला होता.

त्याला निमित्त होतं ते फक्त दीदीला पाच वर्ष पूर्ण झाल्याच. दीदीच्या वाढदिवसाला मी माझ्या दीदीला डा क्टर करणार म्हणून त्याने ठरवून टाकलं. त्यासाठी पुढच्या महिन्यापासून पैसेही शिक्षणासाठी बाजूला काढू लागला. दिदी पाचवी उत्तीर्ण झाली. लेकीच तोडक मोडक इंग्लिश ऐकून त्याला मोठं अप्रूप वाटत होत. अजून मेहनत करण्याची ताकद मिळत होती. तो अजून जोमाने काम करत होता. लेकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता.

लेकही तशी हुशार होती. शाळेत कायम दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असायची. मोठेपणी कोण म्हंटल्यावर तीही “मी डॉ क्टर होणार” म्हणूनच उत्तर देत होती. नववीत असताना पहिल्यांदाच तिने प्रथम क्रमांक पटकावला. नेहमी प्रमाने शाळेने प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरविल. आपल्या मुलीचा होत असलेला सत्कार पाहून बापाच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. डोळे सभागृहाला ओरडून सांगत होते “माझी लेकय माझी”.

सत्कार समारंभ झाल्यावर एक दिवस अशीच डा क्टर सायबिन होऊन माझी मान उंचाव असं बजावून सांगितलं. त्यावर तिने “होय बाबा” म्हणत मानही डोलावली. दिदी दहावीला तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. आनंदाच्या भरात पूर्ण कॉलनीत पेढे वाटले. पेढे वाटताना माझी दीदी डॉ क्टर होणार हे सांगायचं विसरला नव्हता. त्याने सगळ्यांना पेढे भरवले पण त्याला कोणीच पेढा नाही भरवला…त्याने काय केले पेढा भरवायला गुण तर दिदिने मिळवलेत नाही का ? त्याला का म्हणून श्रेय द्यायचं…?

दिदीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. विद्यालयात जाऊन महिना झाला आणि मोबाइलची मागणी केली. तो ही मोठा टच स्क्रीनचा बर का.. “घेऊ ना आपण तुला लागत आसल ना अभ्यासासाठी…! त्याच्यामूळ उगाच अभ्यासात खोळंबा नको”. बाप म्हणाला. दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर तिने सरळ सरळ दहा हजाराच्या फोनला हात लावला. लेकीची इच्छा मोडू नये म्हणून तो हळूच दुकानदाराला म्हणाला आता अर्धे देतो बाकीचे पुढच्या महिन्यात देतो.

पण दुकानदार ऐकायलाच तयार होईना शेवटी दुकानदाराने हप्त्यावर घेण्यास सांगितले. बापाच्या बटनाच्या फोनला दोन ठिकाणी रबर लावला होता. बॅ टरीला मागून कागदाची घडी लावून वापरत होता. पण….मोबाईल वर लेक मध्यरात्रीपर्यंत काही तरी करत असायची. माझी लेक अभ्यास करते म्हणत बापाला वेगळाच अभिमान वाटत होता. अकरावीला म्हणावे तसे गुण पडले नाही.

पण पेपर आता अवघड झाले असतील म्हणून बापाने काय विचारलं नाही आणि लेकिनेही काही सांगितलं नाही. बारावीला चांगले गुण मिळवायचे म्हणून क्लास लावला. कॉलेज आणि क्लास करून आठ वाजेपर्यंत दीदी घरात यायची. आज दहा वाजून गेले तरी दीदी घरी आली नाही. क्लासमध्ये फोन केल्यावर “श्रावनी आज आलीच नाही”. म्हणून सांगितलं. ते ऐकून काय करावं आणि काय नाही त्याला समजतच नव्हतं. बायकोचे डोळे रडून रडून लाल झाले होते. आणि आत्ता त्याच्या हातात ही पत्र पडल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *