नवऱ्याने गर्भशाय नाही म्हणून पत्नीला हाकलून दिले..पत्नीने दुसरे लग्न केले पुढे जे झाले आवश्य पहा

लाईफ स्टाईल

तर शैलेशने खिन्न मनाने पूजाचा फोन ठेवला. आपल्या दुसऱ्या मुलीला प्राचीला फोन करून आपल्या दुसऱ्या लागनाबद्दल सांगाव का हा विचार त्यांच्या मनात आला, पण त्यांना पूजाचे शब्द आठवले, बाबा या वयात तुम्ही दुसर लग्न करून आम्हाला सा वत्र आई आणणार? आम्हाला हे पटत नाही. आम्ही या लग्नाला सं मती देऊ शकत नाही आणि तरी सुद्धा जर तुम्ही दुसर लग्न केल तर आम्ही कधी तुमच्याकडे येणार नाही.

आपल्या पहिल्या पत्नीच्या फोटो समोर उभे राहून त्यांनी बराच वेळ विचार केला, आणि ठाम निर्णय घेऊन बाहेर पडले. शैलेश आणि शैलजा यांचा छान सुखाचा सं सार सुरु होता. पण शैलजाला कॅ न्सर असल्याच नि दान झाल आणि सगळचं विखरून गेलं. शैलजाचा कॅ न्सर शेवटच्या स्टेजला होता त्यामुळे ती शेवटचे सहा -आठ महिने झोपूनच होती, त्या काळात सुनीताचा त्यांना खूप आधार होता. शैलजाची सर्व सु श्रुषा तिने अगदी निगुतीने केली होती. तेव्हाच शैलजाने शैलाशला सांगितले कि, माझ्यानंतर एकटे राहू नका, सुनीताशी बुलून लग्न करा, पण माझ्या मुलींचं माहेर मात्र तो डू नका.

सुनिता शैलेश पेक्षा दहा वर्षांनी लहान होती. मात्र तितकीच समंजस आणि क रारी. वयाच्या चोविसाव्या वर्षी लग्न झालेलं होत, पण तिला ग र्भाशय नाही हे तिच्या नवऱ्याला लग्नानंतर समजल म्हणून त्याने तिला अर्ध्या रात्रीतून घरातून बाहेर काढाल होत, तेव्हापासून ती एका महिला आश्रमात राहून आपल आयुष्य ज गत होती. न र्स म्हणून ती एका दवाखान्यात काम करत होती. संध्याकाळी शैलेश आणि सुनिता त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटले. त्यांनी सुनीताला सांगितले कि आपण उद्या लग्न करतोय.

तिने आधी मुलींच्या सं मती बद्दल विचारल त्यांनी सकाळी पूजाच्या सोबत झालेल्या फोन बद्दल सांगितलं.आणि आपल्या ल ग्नाच्या निर्णयावर ते ठाम राहिले. सुनिता आणि शैलेश याचं याआधीच लग्नाबद्दल बोलण झालेलं होत. तेंव्हा शैलेश ने तिला स्पष्टपणे सांगितल होत, या वयात लग्न करण्याच कारण म्हणजे आपल्याला हवी असलेली सोबत मिळवणे आणि कुटुंब टि कवणे जे शैलजाने त्यांना सांगितले होते.

सुनीताला सुद्धा कोणाच्या तरी आधाराची गरज होतीच, आश्रमात सगळ्यांसोबत राहून सुद्धा तशो ती एकटीच असायची. आपल्या हक्काच आपल अस स्वतःच कुटुंब असाव असं तिला खूप वाटायचं. शैलाजाच्या आ जारपणात तिने शैलेश आणि शैलजाच नातं पाहिलं होतं. शैलेशचा प्रेमळ स्वभाव, सतत आपल्या कुटुंबाचा विचार कारण या गोष्टी तिला आवडल्या होत्या. शिवाय लग्न करण्यामागे असलेला त्याचा प्रांजळ हेतू त्याने आधीच स्पष्ट केला होता, त्यामुळे ती सुद्धा लग्नाला तयार झाली होती.

शैलेश च्या दोन्ही मुलीनी लग्नाला संमती दिल्यानंतर आपण लग्न कराव अस दोघानाही वाटत होतं. त्यासाठीच ते दोघे थांबले होते. पण सकाळच्या फोन मुले त्यांना त्या दोघींची या साठी परवानगी नाही हे समजल होत. सुनिता लग्नाला तयार झाली. आणि दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केल देखील. दिवस असेच जात होते. शैलेश आणि सुनीताचा सं सार आनंदाने सुरु होता. पण शैलेश मात्र दोन्ही मुलींच्या आठवणीने कधी कधी अस्व स्थ होत असे, त्याला शैलाजाचे शेवटचे शब्द आठवत असत कि, माझ्या मुलींचं माहेर मात्र तो डू नका.

एक दिवस असच शैलेश शैलाजाच्या फोटोसमोर उभा होता, व्याकूळ होऊन तो फोटोत असणाऱ्या शैलाजाशी बोलू लागला, शैलजा, मी आपल्या मुलींसाठी सगळ केलं ग पण त्यांनी मात्र मला समजून घेतलच नाही. तू सांगितल्याप्रमाणे वागून पण मी आपल्या मुलींचं माहेर टिकवू शकलो नाही. हे सगळ बोलण सुनिता मागे राहून ऐकत होती. काहीतरी ठरवून ती आतमध्ये गेली. काही दिवसांनी शैलेशला बोलावून ती त्याला घरामध्ये असणाऱ्या गोष्टींची जागा दाखवू लागली.

शेजारच्या जोशी काकूंना चार दिवसाच्या स्वयपाक करण्यासाठी सांगितलं असल्याच तिने सांगितलं. हे सगळ करण्याच कारण विचारलं तर तिने शैलेशच्या मुली घरी येणार असल्याच सांगितलं. शैलेश ला या गोष्टीच आश्चर्य वाटलं. तेंव्हा तिने शेजारच्यांकडून दोन्ही मुलींना फोन करून शैलेशची तब्येत बि घडली असल्याच खोट सांगितलं असल्याच स्पष्ट केलं. त्या तुम्हाला भेटायला येणार असताना मी आ श्रमात जाऊन राहीन म्हणून देखील स्पष्ट केलं.

मी जरी नसले तरी, मुलीना ओटी आणि तुळशीच रोप भेट म्हणून द्या, आयुष्य कितीही पुढे गेल तरी माहेरचा ऑ क्सिजन कमी पडता कामा नये हे त्यांना पटवून द्या अस देखील सांगितलं आणि आपणा निघून आ श्रमात गेली. शैलेशच्या मुली घरी आल्या तेव्हा शैलेशला व्यवस्थित असल्याच पाहून खूप आनंद झाला. त्यांना शैलेशने सुनिता बद्दल सगळ सांगितलं आणि तिने दिलेलं तुळशीच रोप देखील त्यांना दिल. आपल्या वडिलांनी दुसर ल ग्न का केल हे त्यांच्या लक्षात आल.

मुली जाताना आपल्या वडिलांना घेऊन निघाल्या त्या थेट सुनीताच्या आ श्रमात गेल्या, त्यांनी सुनीताला भेटून आनंदाने मिठी मा रली आणि वडिलांचा हात आनंदाने तिच्या हाती दिला. सुनीताला आता आपलं सगळ कुटुंब मिळाल्याचा आनंद झाला होता. आणि हे सगळ पाहून त्यांच्या सोबत असलेली तुळस आनंदाने डोलत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *