रिद्धी फोन जोरात आपटून डोके धरून बसली होती. काय ग रिद्धी काय झाले? तिचा सं ताप पाहून मी तिला विचारल. कैनही ग निलेशचा फोन होता. रात्री उशिरा येणार आहे म्हणून सांगायला. त्यात एवढ चिडण्यासारख काय आहे? मी न कळून विचारल. आंग या महिन्या भरातील ही चौथी वेळ आहे त्याची उशिरा येण्याची आणि कारण काय तर तेच पार्टी करणे.
मला वैताग आलाय सगळ्याचा. काही विचारल तर भांडण नको म्हणून मी गप्पच बसते आणि हा त्याचा गैरफा यदा घेतो. रात्री उशिरा घरी येतात आणि जेव्हा घरी येतात तेव्हा आपला मोबाईल आणि इ यरफोन घेऊन आत बा थरूममध्ये जातात आणि खूप वेळ बाहेरच येत नाहीत. असे अनेक प्रसंग घडले जेव्हा मी खूप वेळा बोलावल्यावरच ते बाहेर आले आहेत.
रिद्धी रडकुंडीला येऊन सांगत होती. जेव्हा ते घरी असतात तेव्हा सुद्धा जास्तीत जास्त वेळ बा थरूम मध्येच घालवतात. मला कळत नाही आहे की अशी काय गोष्ट आहे. ज्यासाठी त्यांना बा थरूममध्ये मोबाईल आणि इ यरफोन घेऊन जावा लागतो आणि ते एवढ्या वेळ आतमध्ये घुसून नक्की काय करतात.
मी देखील कामाला जाते, घराबाहेर असते. पण जेव्हा माझे पाऊल घरात पडते तेव्हा मी जास्तीत जास्त वेळ माझ्या संसाराला व मुलांना देण्याचा प्रयत्न करते. मुलांसोबत खेळते, घरातील कामं उरकते, घर स्वच्छ करते. माझ्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न करते, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करते.
मात्र त्यांच्याकडून असे काहीच प्रयत्न दिसून येत नाहीत. ते येतात आणि फोन घेऊन बा थरूम मध्येच तासनतास बसून असतात. यामुळे आता मला हळूहळू न नात्याचा कंटाळा येऊ लागला आहे. या सवयीमुळे मी देखील अनेकदा चिडचिड करते. कारण माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. ते दिवसभर फोनमध्ये असतात.
रात्री झोपताना सुद्धा ते फोन सोडत नाहीत. यामुळे आता आमच्यात रोजच भांडणे होऊ लागली आहेत. याचा प्रभाव एकंदर कुटुंबावर सुद्धा दिसून येतो आहे. माझ्या मुलांना सुद्धा कळते आहे की त्यांचे वडील चुकीचे आहेत. मला माझा संसार मोडायचा नाही. पण यातून बाहेर कसे पडावे हेच कळत नाही आहे. तूच सांग आता मी काय करू यावर.
रीधीच बोलण ऐकून मी विचार करू लागले, तिला हळू हळू समजावलं,”रिद्धी, लग्न हे असे बंधन आहे जे कोणा एकाने प्रयत्न करून चालत नाही तर त्यासाठी पती आणि पत्नी या दोघांचे प्रयत्न असावे लागतात. तेव्हाच ते नाते पुढे जाऊ शकते. जर तसे झाले नाही तर ते नाते तुटू सुद्धा शकते. तुमच्या नात्यात सुद्धा हीच स मस्या आहे.
यावर सर्वात पहिला उपाय म्हणजे तु निलेश सोबत मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. त्यांना त्यांची चूक समजावून सांगितली पाहिजे. संसार तुटत चालला आहे याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी. यासाठी त्यांच्याशी बसून नीट शांतपणे बोल”. तुला माहित आहे की तो चुकत आहेत, पण त्याला त्याची जाणीवच नाही आहे.
त्यामुळे थेट जाऊन त्याच्याशी भांडू नको किंवा त्याला जबरदस्ती करू नको. तुला त्याला नीट समजावून सांगावेच लागेल आणि तेव्हा जाऊन ही गोष्ट बदलेल. यासाठी हवं तर तु पुढाकार घे. वेळ पडली तर कमीपणा घे. तुमच्यासाठी आता तुमचा संसार वाचवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याला बदलायला थोडा वेळ दे.
जर त्याला खरंच बदलायचं असेल तर ही गोष्ट लगेच नीट होऊ शकते.” जर निलेशला या नात्याची, तुझी खरच गरज असेल तर तो नक्कीच तुझ्यासाठी बदलेल. पण तुला त्यासाठी प्रयत्न करावा लगेल. तर मित्रांनो तुमच्या टि प्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टि प्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा.