दिवाळी का साजरी केली जाते ?…काय आहेत यामागील दहा रहस्यमय कारणे ज्यामुळे आपण

धार्मिक

हिं दू सणांमध्ये गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा आणि प्रमुख सण दिवाळी साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासून या दीपावलीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातलं पीक कापून घरात येत असतं. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते.

गणरायाला नमन केलं जातं. अंधकारावर मा त करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो. पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा व ध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती.

सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळी बरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.

तुम्हाला माहितीये का, की या व्यतिरिक्त दिवाळी साजरी करण्याचे आणखी काही कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला तीच कारणे सांगणार आहोत. – दीपावलीच्या दिवशी लक्ष्मी देवीचा जन्म झाला:- माता लक्ष्मी ही धन-दौलतीची देवता आहे, हिं दू ध र्म आणि शास्त्रानुसार असे म्हटले जाते की कार्तिक महिन्याच्या अ मावस्येच्या दिवशी समुद्र मंथन करताना माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणून दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

– भगवान विष्णूने माता लक्ष्मीचे रक्षण केले:- वामन हा भगवान विष्णूचा पाचवा अवतार आहे. हिं दू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या वामन अवताराने माता लक्ष्मीला राजा बळीच्या तावडीपासून वाचवले होते. म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून दीपावली श्रद्धेने साजरी केली जाते.

– कृष्णाने न रकासुराचा व ध केला:- जेव्हा न रकासुर रा क्षसने तिन्ही जगावर आक्रमण केले व तेथील देवतांचा छ ळ केला तेव्हा श्रीकृष्णाने न रकासुराचा व ध केला. त्याची ह त्या श्रीकृष्णाने १६००० महिलांना त्याच्या कै देतून मुक्त होते. या विजयाचा आनंद २ दिवस साजरा करण्यात आला, त्यातील दिवाळी हा मुख्य दिवस आहे. दीपावली सणाच्या दुसर्‍या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून ओळखले जाते.

– पांडव परत आले:- महाभारत या हिं दू ध र्माच्या महाकाव्यानुसार पांडव कार्तिक अ मावस्येच्या दिवशी १२ वर्षांच्या वनवासानंतर परत आले होते. त्यांच्या आगमनाच्या आनंदात लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. – दीपावलीच्या दिवशी विक्रमादित्यचा राज्याभिषेक झाला होता:- दिवाळीच्या दिवशी पराक्रमी राजा विक्रमादित्यचा राज्याभिषेक झाला होता. राजा विक्रमादित्य हे आपल्या औदार्य, धै र्य आणि पराक्रमासाठी ओळखले जातात.

– आर्य स माजासाठी हा दिवस खूप खास आहे:- भारतीय इतिहासातील या दिवशी, १९व्या शतकातील विद्वान महर्षि दयानंद यांना याच दिवशी निवर्तले. आर्य स माजाचा संस्थापक म्हणून महर्षि दयानंद जाणले जातात. त्यांनी मानवतेचा व बंधुत्वाचा प्रसार केला.

– जैनांसाठी एक खास दिवस:- जैन ध र्माचे संस्थापक महावीर तीर्थंकर यांनी दीपावलीच्या दिवशी निर्वाण केले. संन्यासी होण्यासाठी त्यांनी आपले शाही जी वन आणि कुटुंबाचे ब लिदान दिले होते. व्रत आणि तपश्चर्येचा अवलंब करून त्यांनी निर्वाण प्राप्त केले. असे म्हटले जाते की वयाच्या ४३व्या वर्षी त्यांनी ज्ञानप्राप्ती केली आणि जैन ध र्म वाढविला.

– शीखांसाठी दीपावली खूप महत्वाची आहे:- शीखांचे तिसरे गुरु अमर दास यांनी दिवाळीला एक खास दिवसाचा दर्जा दिला होता. सर्व शीख त्याच्याकडे आले होते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते. १५७७ या वर्षी पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराची पायाभरणी दीपावलीच्या दिवशी झाली होती. दीपावलीचा दिवस शीखांसाठीही महत्त्वाचा आहे.

कारण १६१९ मध्ये त्यांचे सहावे गुरु हरगोविंद यांना मोगल शा सक जहांगीर याने ५२ राज्यांसह ग्वाल्हेर किल्ल्यातून मुक्त केले होते. – पोप जॉन पॉल यांचे दिवाळी भाषण:- १९९९ मध्ये, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पोप जॉन पॉल यांनी भारतातील चर्चमध्ये eucharist ची व्यवस्था केली होती. त्या दिवशी त्यांनी काळावर टिळा लावून दिवाळीविषयी भाषण दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *