त्यामुळे जर आपल्याला सुद्धा श्रीमंत व्हायचे असेल…तर या पाच गोष्टी गुप्तपणे कराव्याचं लागतील

लाईफ स्टाईल

श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी या गोष्टीचा हमखास पालन करतात. जगातल्या बहुतांशी श्रीमंत लोकांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या श्रीमंत होण्याच्या प्रवासामध्ये आपल्याला काही सामाईक गोष्टी सापडतात. जेव्हा लोक असं म्हणतात आज कालच्या जगामध्ये श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब होत आहेत.

तेव्हा त्यात अगदीच तथ्य नाही असं नसतं. पण श्रीमंत अजून का श्रीमंत होत आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना श्रीमंत होण्याची इच्छा आहे, अशांनी श्रीमंत होण्याचे अधिकाधिक श्रीमंत होत जाण्याचे पाच सिक्रेट –

• बिल गेट्स किंवा वॉरन बफे किंवा आपल्या भारतातील मुकेश अंबानी अजिम प्रेमजी यांच्यासारखे लक्ष्मीपती आपल्या मेहनतीने धनाढ्य झाली ही संपत्ती टिकावी आणि वाढावी म्हणून जे काही करतात ते प्रत्येक महत्वकांक्षी माणसाने समजून घ्यायलाच हवे. .

• बीबीसी कॅपिटल च्या एका अहवालानुसार सामान्य लोक हातात पैसे खुळखुळायला लागल्यावर, ते पैसे प्रॉपर्टी कार किंवा इतर अशा या गोष्टीवर खर्च करतात. पण श्रीमंत लोक तसं करत नाहीत. त्यांच्यासाठी पैसा हे साध्य नसून अजून पैसे कमवण्याचे साधन असतं, म्हणजे नेमकं काय ते आपल्याला श्रीमंत लोक पैशाच्या बाबतीत कसे वागतात, हे बघितल्यावर कळेल. तेच आज आपण बघणार आहोत .

• सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रीमंत लोक पैसे खर्च करण्यासाठी नाही, तर गुंतवणुकीसाठी आहेत यावर पूर्ण विश्वास ठेवतात. सामान्य लोक पैसे अशा व वस्तूंवर खर्च करतात, ज्यापासून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही, पण श्रीमंत लोक पैसे भावी परताव्याचा विचार करूनच गुंतवतात .

• दुसरा मुद्दा म्हणजे श्रीमंत लोकांकडे गुंतवणूक आणि तिच्याकडून मिळणारा परतावा यांच्याबद्दल प्रचंड सं यम असतो. माय फेवरेट हो ल्डिंग टाईम इज फोरेवर हे जगद्विख्यात गुंतवणूक गुरु बफेट यांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. श्रीमंत लोक आपला संपूर्ण व्यवसाय विकून त्यापासून मिळालेले पैसे न उधळता किंवा चु कीच्या ठिकाणी न गुंतवता योग्य संधीची वाट पाहातात आणि ती वेळ आल्यावरच गुंतवणूक करुन यशस्वी होतात.

• तिसरा मुद्दा म्हणजे श्रीमंत लोक जोखीम स्वीकारायला नेहमीच तयार असतात. जितकी जोखीम जास्त तितकाच जास्त परतावा या तत्त्वांवर त्यांचा दृढ विश्वास असतो. ते नेहमीच नवीन आणि भविष्यकाळात यशस्वी होईल असा व्यवसायाच्या शोधात असतात. त्यांच्यात पैसे गुंतवतात जर असे व्यवसाय चालले तर कधीकधी दोन हजार टक्के पर्यंत नफा मिळू शकतो. अर्थात त्यात पैसे बु डायची जोखीम असते. पण श्रीमंत लोक अशा प्रकारच्या जोखीम पूर्ण विचार आणि अभ्यास करूनच आपला निर्णय घेतात.

• त्याच बरोबर असलेला चौथा मुद्दा म्हणजे श्रीमंत लोक कधीही एकाच व्यवसायात पैसे गुंतवत नाहीत तर अनेक ठिकाणी पैसे गुंतवतात. जर एखाद्या ठिकाणी तोटा झाला, तर दुसऱ्या ठिकाणच्या नफयाने भरून काढतात. त्याचबरोबर ते पैसे गुंतवलेला कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत अतिसं वेदनशील असतात, जर व्यवसायात तोटा होणार असेल तर ते ताबडतोब आपल्या पैसे तिथून काढून घेतात आणि कमीत कमी तोटा होईल असे बघतात .

• शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्रीमंत लोक आपले पैसे काही वेगळ्या स्वरूपाचा गोष्टींमध्ये गुंतवतात. उदाहरणात प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती किंवा मग व्यवसायिक प्रॉपर्टी. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात .
या गोष्टी बऱ्याच काळापर्यंत चांगला परतावा देतात आणि श्रीमंत लोक जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये 2-3 घरे किंवा व्यावसायिक प्रॉपर्टीत घेऊन ठेवतात. हा गुंतवलेला पैसा त्यांना बराच काळ चांगले उत्पन्न मिळवून देतो .

यावरून असा निष्कर्ष काढता येईल की पैशाकडेच पैसा जातो. श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब होत आहेत हे जरी खरं असलं, तरी त्यामागे श्रीमंतांची पैशासाठी मेहनत न करता उलट पैशाला अजून पैसे कमवण्यासाठी मेहनत करायला लावण्याची म नोवृत्ती आहे, सामान्य लोक पैसा हे खर्च करायचं साधन मानतात आणि या उलट श्रीमंत लोक पैशाकडे अजून पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात.

ज्याला कोणाला श्रीमंत होण्याची इच्छा असेल, त्याने पैशाकडे खर्च करण्याची संधी म्हणून न बघता जर गुंतवणूक करून अजून पैसे कमावण्याची संधी म्हणून पाहिलं तर नक्कीच त्यांच्या परिस्थितीत बदल होऊ शकतो. यासाठी त्या माणसाकडे गडगंज पैसा आहे तसे अजिबात नाही. शिस्त, सं यम आणि जोखीम घेण्याची तयारी त्याच्या ब ळावर कोणताही सामान्य माणूस श्रीमंत होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *