तेव्हा जर ही घटना बाळासाहेबांपर्यंत पोहचली नसती…तर आयुष्यात कधी आपण वडापाव खाल्ला नसता…त्यानंतर बाळासाहेबांनी जे काही केले…जाणून आपल्याला सुद्धा

लाईफ स्टाईल

आज वडापावचे नुसते नाव जरी काढले तर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते, आपल्याला आठवतो तो म्हणजे पिवळा धमक लुसलुशीत वडा, त्यामधील असणारी भाजी, आणि त्यासोबत आपल्याला ठ सका आणणारी हिरवी मिर्ची, आज प्रत्येक मराठी माणसाला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे वडापाव, आपण आज महाराष्ट्र्मध्ये कोठेही जा आपल्याला सगळीकडे स्वस्तात मस्त हा वडापाव मिळणारच.

आज आपल्या महाराष्ट्रात ‘जोशी वडेवाले’, ‘जम्बो वडापाव’ याचे आज खाद्य क्षेत्रात आदराने नाव घेतले जाते, पण आपल्याला माहित आहे का कि या वडापावची सुरुवात कशी झाली, प्रथम हा वडापाव कधी आणि कोणत्या पद्धतीने चालू झाला, नाही ना! चला तर मग जाणून घेऊया कि वडापावची सुरुवात कशी झाली.

आपणांस सांगू इच्छितो कि प्रथम माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी, मराठी माणसाने सुद्धा उत्तर तसेच दक्षिण भारतीय राज्यासारखा, एखादा पदार्थ शोधावा अशी हाक दिली, आणि त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी, थालीपीठ, शाबू वडा, मेदुवडा यांसारखे अनेक प्रयोग करण्यात आले. पण या सर्वामध्ये बाजी मारली ती म्हणजे वडापावने.

आणि वडापावचे संपूर्ण श्रेय हे अशोक वैद्य या व्यक्तीला जाते, आणि त्यांनी प्रथम माननीय बाळासाहेब ठाकरे याच्या हस्ते उदघाटन करून दादर येथे त्यांनी आपला पहिला वडापावचा गाडा सुरु केला. वरळी, परेल, वाशी येथील अनेक कामगार हे दादर स्टेशन वरून जायचे, त्यावेळी दादर स्टेशनला अनेक खाद्य पदार्थाच्या गाड्या असायच्या पण त्यांनी वेगळे काही तरी म्हणून वडापावची चव चाखली आणि काही दिवसांतच संपूर्ण मुंबई मध्ये हा वडापाव फेमस झाला.

त्यानंतर अनेक मराठी लोकांनी वडापावचे गाडे त्यावेळी मुंबई मध्ये सुरु केले आणि त्याला खं बीर साथ दिली ती म्हणजे त्यावेळच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने, तेव्हा शिवसेनेच्या बैठका असायच्या तेव्हा लोकांना वडापाव चा अल्पोआहार देण्यात येत असे. तेव्हा मुंबई मध्ये उडपी हॉटेल मध्ये मिळणारी, इडली, डोसा, ऑम्लेट याना खूप मागणी होती पण वडापाव जेव्हा पासून सुरु झाला तेव्हा या खाद्य पदार्थाची आवड कमी झाली.

मग तेव्हा दक्षिण भारतीय लोकांनी या वडापावच्या गाडी मालकावर द बाव आणण्यास सुरुवात केली पण ही गोष्ट तेव्हा बाळासाहेबांपर्यंत पोहचली, आणि तेव्हा संपूर्ण दक्षिण भारतीय तसेच उडपी हॉटेल व्यवसायिकांना ध मकी दिली कि ‘जर कोणत्याही मराठी माणसाच्या वडापावाच्या गाडीला हात लावलं तर गाठ माझ्याशी आहे” त्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेला सुद्धा आदेश दिले कि मुंबई मधील कोणत्याही वडापावच्या गाडीला हात नाही लागला पाहिजे.

त्यांना कोणती अडचण आली तर…त्यानंतर कधीच कोणत्या मराठी हातगाडी चालवणाऱ्याला त्रा स झाला नाही. तसेच त्यावेळी मुंबई मध्ये मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरु होत होते. तरीसुद्धा मुंबई मधील मराठी माणसाची वडापाव बद्दलचे आकर्षण कमी झाले नाही. प्रत्येक वडापावची गाडी चालवणाऱ्या मालकाने त्या सोबत वेगवेगळ्या चटण्या, मिर्ची देण्यास सुरुवात केली. आणि संपूर्ण महाराष्ट्राला हा बदल आवडला, आणि संपूर्ण राज्यात मराठी माणसाने वडापावला पसंती दिली.

एका अर्थाने वडापावला महाराष्ट्रा ओळख बनवली, त्यानंतर इतर राज्यातील लोकांना सुद्धा हा वडापाव आवडू लागला. आणि २१व्या शतकांत संपूर्ण वडापावला एक वेगळे रूप मिळाले, ६० च्या शतकात फक्त मुंबई मिळणारा हा वडापाव आज संपूर्ण जगभर पोहचला कारण त्यावेळी बाळासाहेब याची खं बीर साथ होती म्हणूनच आज आपण आवडीने वडापाव खात आहे, आणि हाच वडापाव आज अमेरिका, दुबई, ऑस्ट्रोलिया या सारख्या देशाच्या विमानतळावर सुद्धा मिळत आहे.

२३ ऑगस्ट १९६६ रोजी अशोक वैद्य यांनी पहिला वडापाव तयार केला होता. त्यामुळे हा दिवस वडापाव दिन म्हणून साजरा करतात, पण १९९८ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी अशोक वै द्य यांचं नि धन झालं. पण आज सुद्धा त्याचा हा गाडा दादर स्टेशन वर चालू आहे. अशोक वै द्य यांनी शोध लावलेल्या या वडापावमुळे किती तरी लोकांचे आज दहा रुपयांमध्ये पोट भारत आहे त्यासाठी त्याचे आभार हे नक्कीच मा नले पाहिजेत. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. जेणेकरून त्यांना सुद्धा वडापावचा हा इतिहास कळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *