विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जा तींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जा ती ध र्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य, तर आपल्याला माहित असेलच कि महाराष्ट्र हे अनेक महान संतांचे जन्म स्थान आहे. याच भूमीवरील संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव आणि संत जनाबाईंचे हे जन्मस्थान आहे.
यापैकी संत तुकाराम महान संतांपैकी एक होते. नेहमी ईर्ष्या, द्वेषापासून दूर असलेले संत तुकाराम हे महाराष्ट्राच्या इतिहासात एक महान संत होते, त्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी वनात एक प्रसंग इतिहासात सांगितला जातो. पुण्याजवळ लोहगाव नावाचे गाव आहे. संत तुकाराम महाराज या गावांमध्ये सतत येत-जात असत, कारण लोहगाव हे तुकोबांचे आजोळ होते, त्याचबरोबर त्यांची पत्नी रखमाबाई ही देखील त्याच गावातील होती.
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असत. तुकाराम महाराज त्यांच्या कीर्तनातून शिवबांच्या स्वराज्य बद्दल लोकांमध्ये नेहमीच जागृती करत असत. गावातील युवा मुलांना स्वराज्यसाठी, शिवरायांच्या सै-न्यामध्ये सहभागी व्हायला सांगत असत. असेच एक वेळेस, लोहगावात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यांना घेऊन, संत तुकोबा रायांचे कीर्तन ऐकण्यासाठी आले होते.
शिवाजी महाराज संत तुकोबांच्या कीर्तनासाठी उपस्थित राहणार आहेत, ही बातमी एका गु प्तहेराने चाकणच्या मुघली सुभेदाराला सांगितली. तेव्हा छत्रपती शिवरायांना पकडण्याची ही चांगली संधी चालून आल्याचे लक्षात आल्यावर त्या चाकणच्या सुभेदाराने घोडेस्वारांची एक तुकडी ताबडतोब लोहगावाच्या दिशेने पाठवली. रात्री तुकोबांचे किर्तन सुरु झाल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज किर्तनाला येऊन बसले होते.
परंतु त्याच वेळी मुघल सै न्याने किर्तन होत असलेल्या गावाला चहुबाजूने वेढा घातला, ही बातमी आपल्या मावळ्या गु प्तहेरांनी शिवरायांना दिली, परंतु राजे निश्चिन्त पणे आपल्या जागी बसून राहिले, परंतु किर्तनाला जमलेले लोक मात्र चलबिचल करीत असल्याचे पाहून, तुकोबांनी विचारपूस केल्यावर, त्यांना या गडबडीचे कारण समजले. किर्तनाच्या वेळी शिवरायांवर असे संकट आले, याचे त्यांना विलक्षण दुःख वाटत होते.
त्याच वेळी दैवी चमत्कार झाल्याप्रमाणे अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट सुरू होता. तेव्हाच सोसाट्याच्या वाऱ्याने सर्व दिवे विझले आणि सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले. तेव्हा किर्तनाला आलेल्या बायका-पोरांनी घाबरून आ क्रो श सुरू केला, गावकरी सैरावैरा धावू लागले.
तुकोबांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला, तेव्हा मोघली सै न्यही ओलेचिंब झाले होते व अंधारातील गोंगाट ऐकून ते प्रचंड भयभीत होऊन गेले होते. त्यांच्याकडे असलेल्या मशाली पावसाच्या पाण्याने भिजल्यामुळे, लवकर पे टत नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धि कौशल्याचा वापर करून, एक योजना आखली. महाराजांनी आपल्या सोबत असलेल्या आठ-दहा मावळ्यांना हातात मशाली देवून, घोड्यावर बसायला सांगितले.
पाऊस कमी झाल्याने, मशालीनी पे ट घेतला आणि महाराजानी मावळ्यांना योजना समजावली, पे टत्या मशाली हातात देवून घोड्याच्या भरधाव वेगाने मावळे गावातून बाहेर पडले. तेव्हा शिवाजीराजे आपल्या मावळ्यांसह मशाली घेऊन घोड्यावरून पळून जात आहेत, असा मुघल सै न्याला संशय आला. सर्वच्या सर्व मुघल सै न्य अंधारात त्यांचा पाठलाग करत गावाच्या वेशीवर येऊन मावळ्यांचा पाठलाग करू लागले.
आणि तिकडे योजनेप्रमाणे, महाराज मंदिरातच बसून होते, मात्र मुघल सै न्य मावळ्यांचा पाठलाग करत गावापासून दूरवर निघून गेलं होतं, तेव्हा महाराजांनी तुकोबांना नमस्कार केला आणि तुकोबांचे आशीर्वाद घेऊन, ते आपल्या सोबत राहिलेल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले. इकडे मोघली सै न्य पाठलाग करत असताना, मावळ्यांनी आपल्या हातातील मशाली विझवल्या आणि अंधाराचा फा यदा घेवून झाडा-झुडपात गायब झाले.
तिकडे छत्रपती शिवाजी महाराज मोघलांच्या तावडीतून निसटून सुखरूपपणे पुणे प्रांतांमध्ये पोहोचले. हा तुकोबांच्या भक्तीचा आणि छत्रपती शिवरायांच्या बुद्धी चातुर्याचा आविष्कार असल्याचे सांगितले जाते. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी ऐतिहासिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.