नमस्कार मित्रांनो, या जगामध्ये खूप कमी लोकांच्यात माणुसकी आहे असे म्हणतात. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सुद्धा अशी काही माणसे असतात की त्यांच्या चांगुलपणामुळे आपण सुद्धा खूप काही शिकत असतो. तर अशाच घडलेल्या एका घटनेबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी छोट्याशा कृतीमधून सुद्धा आपल्या मध्ये कसा बदल घडू शकतो हे मला त्या गोष्टीमधून अनुभवायला मिळाले.
तर झाले असे की मी ऑफिसला जायला बोरिवली स्टेशनला मी नेहमीप्रमाणे आलो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे स्टेशन माणसांनी तुडुंब भरले होते. ऑफिसला जाण्यासाठी मधला डब्यात बसणे सोयीस्कर असल्यामुळे मी लेडीज डब्याच्या पाठीमागे असलेल्या डब्याची वाट पाहत उभा होतो. इतक्यात माझ्या बाजूला काही अंतरावर उभ्या असलेल्या एका महिलेचं लहान बाळ रडायला लागलं.
बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. बाळाकडे क टाक्ष टाकुन सगळे जण आपापल्या मोबाइलमध्ये आणि पेपरमध्ये पाहू लागले. असाच थोडा वेळ निघून गेला पण ते बाळ काही र डायचे थांबेना. आजूबाजूच्या महिलांनी सुद्धा त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते बाळ काही रडायचे थांबत नव्हते.
त्या बाळाच्या आईची परिस्थिती तर पाहण्यासारखी झाली होती. शेवटी त्या बाळाच्या आईने बॅ गेतील दुधाची बाटली काढून त्या बाळाच्या तोंडाला लावली. पण ते बाळ काही दुध प्यायला तयार होईना. अखेर त्या महिलांच्या घोळक्यामध्ये थांबलेल्या एका आजीने तिला त्या बाळाला अंगावरचे दूध पा जायला सांगितलं. सुरुवातीला त्या आईने फक्त हो म्हंटलं, पण बाळ र डण्याचं शांत होत नाही हे लक्षात येताच ती बाळाला घेऊन स्टेशनवरच्याच एका बाकड्यावर बसली आणि बाळाला पा जू लागली.
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी महिलेला बाळाला पा जताना बघितलं की तिला मॅ नर्स नाहीत, अशि क्षित आहे असे लोक बोलतात. एवढ्या लहान बाळाला ट्रेनमधून फिरवतातच का असे अनेक प्रश्न विचारून है राण करतात. ही घटना घडेपर्यंत मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक होतो. ती महिला शिक्षित होती की अशिक्षित, सुसंस्कृत होती की नव्हती या नको त्या प्रश्नात अडकण्यापेक्षा ती एक स्त्री होती आणि पाच ते सहा महिन्याच्या बाळाची आई होती हेच महत्त्वाचं होतं.
ती बाकड्याच्या कडेला बसून बाळाला अं गावरचं दूध पा जत होती. आता आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी बाळाला पा जायला बसल्यावर जे होतं, अगदी तेच बोरीवली स्टेशनवर होत होतं. काही अपवा द वगळता येणारा जाणारा प्रत्येकजण त्या बाईकडे नजर टाकून, बघून जातच होता. माझं त्या महिलेकडे कमी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांकडे लक्षं जास्त होतं.
आपल्या स माजाची मा नसिकता कधी बदलणार हाच एक प्रश्न माझ्या म नात राहून राहून येत होता. काही पुरुषांनी तर तिच्याकडे अ श्लिल नजरेने पाहायलाही कमी केलं नाही. या असल्या गोष्टींमुळे आणि मा नसिकतेमुळे आपला देश कधीच सुधारणार नाही या मतावर मी येतच होतो इतक्यात २५ ते २७ वर्षांचा एक तरुण मुलगा माझ्या समोर आला. हा ही त्यांच्यापैकीच एक असं मला वाटत होतं.
कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी तो एक वाटत होता. जीन्स, टी-शर्ट, कानात इअरफो न्स आणि पाठीला बॅग लावून तो स्टेशनवर उभा होता. त्याने त्याच्या बॅगमधून पेपर काढला आणि तो अगदी सहजपणे त्या महिलेच्या समोर जाऊन उभा राहिला. मी त्याच्याकडेच पाहत होतो, तो नक्की काय करतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं. तो पेपर महिलेला कव्हर करेल अशा पद्धतीने त्याने पूर्ण उघडला आणि तो अगदी सहजपणे पेपर वाचायला लागला.
एका क्षणासाठी त्या महिलेलाही कळलं नाही की ही व्यक्ती कोण आहे आणि हा अचानक माझ्यासमोर का आला. पण नंतर काही सेकंदांमध्येच तिला त्या मुलाचा हेतू लक्षात आल्यावर ती फार रि लॅक्स झाली. त्याच्या या कृतीमुळे ती बाई आता पटकन कोणाच्या डोळ्यात येत नव्हती आणि तिही शांतपणे आपल्या मुलाला पा जू शकत होती. त्याची ही काही मिनिटांची कृती पाहून मला खरंच ध क्का बसला.
ही गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही. मी अशा पद्धतीने का विचार केला नाही? याचा मलाच प्रश्न पडला. त्याच्या त्या दोन-तीन पावलांच्या कृतीने माझी विचार करण्याची पद्धतच पार बदलून टाकली. खरंच, या जगातील प्रत्येक द्रौपदीला असा एखादा कृष्ण भेटायलाच हवा… असा विचार करून मी तिथून मार्गस्थ झालो.