खूप काही स हन केल आता यापुढे मी स हन करू शकत नाही. तू तुझ्या वाटेने जा मी माझ्या वाटेने जाते. हे शब्द ऐकून त्याचे कान ग रम शिसे ओतल्यासारखे ता पले, शिरा ताठ्ल्या, त्याचा चेहरा रा गाने लालबुंद झाला. बि यरचा एक एक घोट घेत घेत तो तीच सगळ बोलण आठवत राहिला.. काय काय नाही केल आपण तिच्यासाठी बारा वर्षे तब्बल बारा वर्षे. आपण आपल सर्वस्व तिच्यासाठीच दिल, आणि तीन शेवटी आपल्याला ध क्के मा रून बाहेर घालवल??
येवढा कसला राग? एवढ काय वाईट वागलो आपण तिच्याशी? बारा वर्षांचा काळ सगळा त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागला. बारा वर्षापूर्वी ती आपल्या ऑफिसमध्ये आली नोकरी मागण्यासाठी एक वि धवा, पदरात दोन मुले, घरच्यांनी बाहेर काढलेलं, एक आधारहीन अबला म्हणून ती आपल्यासमोर आली. आपल्याला तिची दया आली म्हणून आपण तिला आपल्या ऑफिस मध्ये नोकरी दिली. मुलांच्या शाळेचा खर्च सोसला.
राहायला घर मिळवून दिल. आणि त्याबदल्यात आपण फक्त एकाच अपेक्षा ठेवली ती म्हणजे श रीर सुखाची..श रीर सुख दोघानाही हव होताच कि, माझ्याकडे काय नव्हते? सगळच होत, गाडी, बंगला, सगळ गुमान ऐकणारी बायको, समजूतदार मुले, अगदी सगळच होत. तरी देखील मनासारखं श रीर सुख नव्हत ते मी तिच्यामध्ये शोधल. त्यात माझ काय चुकल? दोघांच वय देखील समान त्यामुळे विचार एकमेकांशी जुळणारे.
माझा बिझनेस वाढवण्यात तिनेच मला खूप मदत केली. हुशार होतीच ती…तिच्या नवनवीन कल्पनांमुळे माझा बिझनेस खूप पुढे आला. थोड्याच दिवसात तिला मी माझी बिझनेस पार्टनर बनवली. तिला माझ्याकडून आणखीन वेगळ्या नात्याची अपेक्षा होतीच, पण मेच नेहमी नकार देत राहिलो. नाही म्हणत राहिलो. तिला देखील माझ्या नाकारामागील कारणे पटत होती.
म्हणून ती देखील शांत राहिली प्रत्येकवेळी माझ्याकडून जे आणि जेवढ मिळेल त्यामध्ये समाधानी राहिली. दोघांची मुले मोठी होत होती. त्यांना आमच्याबद्दल काहीच कळत नव्हत अस नाही परतू त्यांनी स्वतःहून आम्हाला कधी काही विचारल नाही आणि आम्ही त्यांना आमच्याबद्दल काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. एक दिवस अचानक तिच्या मोठ्या मुलाने आम्हाला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि त्या दोघांमध्ये भां डण झाल.
दोघांच्यात टोकाचे वाद झाले. तरी आमच नात पुढे खूप दिवस तसच चालू राहील. आणि एक दिवस अचानक तिने मला जायला सांगितलं. फक्त सांगितलच नाही तर तीन तिच्या घरातून मला ध क्के देऊन बाहेर काढल. तुझी मला गरज नाही, यापुढे तू माझ्या घरी कधीच येऊ नको म्हणाली मला, ज्याच्यामुळे ती आज स्वतःच्या पायावर उभी होती. त्या घरातून जे घर तिला मी मिळवून दिल.
त्याला सरळ जायला सांगितलं. कारण काहीच सांगितलं देखील नाही. आज जवळपास वर्षभराने तिचा फोन आला आज पुन्हा भेटूयात? एकदाच. शेवटच? तिच्या फोनवर तो स्तब्ध..काय करू ? जाऊ कि नको तिला पुन्हा भेटायला गेल्या नंतर काय बोलू? काय सांगू तिला? का बोलावलं असेल तीन तेही एवढ्या दिवसांनी पुन्हा नात तयार करायची इच्छा असेल तिला? कि मी दिलेल घर, गाडी सगळ परत द्यायचं असेल? हेल्लो ..ऐकतोय का तू ?
सगळा विचार चालू असताच ती पुन्हा बोलू लागली. तुला खूप काही सांगायचं आहे. ते ही महत्त्वाच. सो प्लीज आज नाही म्हणू नको आज भेटूयात प्लीज. आणि पुन्हा मी तिला नाही म्हणू शकलो नाही. ठीक आहे, भेटूयात…मी म्हणालो. आपल्या नेहमीच्या ठिकाणीच. ठीक आहे. ती म्हणाली. त्यादिवशी भेटलो नेहमीच्याच जागी. तशीच ती मला बाहेर काढलेल तेंव्हा होती तशीच. शांत, स्तब्ध आणि मी निःशब्द.. पुन्हा तसाच..ती काय बोलते याची वाट पाहत.
सॉरी..त्यादिवशी मी खूप चुकीची वागले मला माहित आहे. पण माझ्या मुलाने मला आणि तुला नको त्या अवस्थेत पाहिलं खूप दिवस तो शांत राहिला पण एक दिवस त्याचाही राग अनावर झालाच. त्याने मला सांगितलं, मी आणि तो यातील एकच कोणीतरी तुला मिळेल तू कोलाची निवड करायची तू ठरवायची.. मी काय बोलणार त्यावर.. तू हृदय तर तो श्वास दोघांपैकी एकाची निवड कशी करू काहीच समजत नव्हत..पण काय करू शेवटी काही झाल तरी मुलांसाठी जीव तुटतो ना…म्हणून तुला असा वागवल.. जमल तर मला माफ कर…
तिच्या बोलण्यावर काय उत्तर देऊ मलाच समजत नव्हत. फक्त येवढच म्हणालो तुझ बरोबर आहे स्मिता.. आपण समा जाच्या नजरेत कितीही चुकीचे ठरलो तरी चालेल आपण आपल्या मुलांच्या नजरेतून उतरून चालणार नाही.तू जा तुझ्या वाटेने, माझ काही म्हणण नाही आणि उठून तडक घरी निघून आलो. बारा वर्षात तिच्यासोबत घालवलेल्या अनेक आठवणी मनात रुंजी घालत राहिल्या तश्याच..पुन्हा…