तिरुपती बालाजी मंदिर वा वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला पर्वतरांगेत आहे. हे देऊळ असलेल्या डोंगराला तिरुमला (श्री + मलय) म्हणतात. हे देऊळ भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर (तिरुमला) मोठे वारुळ होते.
एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान २००० वर्षे जुणे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथील पहिली वेदी बांधली.
कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. हे महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले. हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते.
कोल्हापूरनिवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महलक्ष्मी जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे. पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महलक्ष्मीचा उल्लेख आहे. काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव आहे परंतु करवीरात शिव व महलक्ष्मी दोघांचेही वास्तव्य आहे, असे सांगितले जाते.
त्यामुळे भक्ती आणि मुक्ती मिळते असा भोळ्या भक्ताचा भाव आहे. तीरुपती बालाजी आणि अंबामाता यांचे नेमके नाते काय असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो, कारण तीरुपतिला जाऊन आलेले भक्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण झाल्याचे समजत नाहीत. म्हणून आज आपण त्याचे कारण जाणून घेणार आहोत .
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं. बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत, जो वर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही कथा आहे.
एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशाई असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती. भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही, ह्याचा राग येऊन महर्षी भृगु ह्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ताप्र’हार केला. भृगु ऋषींचा क्रो’ध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी
त्यांची क्षमा मागितली, आणि भृगुंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रो’ध अनावर झाला. ह्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून, आज ही कोल्हापूर मधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी आख्यायिका आहे.
महालक्ष्मीच्या देवस्थानाचे तिरुपती देवास्थानाशी नाते सांगणारी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली, तरी कोल्हापूरचे देवस्थान कधी निर्माण केले गेले, ह्या बद्दल माहिती उपलब्ध आहे. हे देवस्थान सहाव्या शतकामध्ये चालुक्य वंशाच्या कर्णदेव राजाने बनवविले. पण ह्या देवस्थानाला खरी प्रसिद्धी मिळाली, ती ११८२ साली, जेव्हा शिलाहार राजवंशाने कोल्हापूर आपली राजधानी म्हणून घोषित केले.
आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गु प्त देवस्थान आहे असे म्हटले जाते. शक्ती संतुलित रहावी यासाठी शिवही तेथे असल्याचा समज आहे. पण शिवाच्या देवस्थानमध्ये भाविकांना जाण्यास बं’दी आहे. गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले. विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला.
बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शा प दिला. हे ऐकून क्रो’धीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शा’प दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पाप मुक्तीसाठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पा पमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.