तानाजी मालुसरे याच्या मृत्यू नंतर ‘रायबाचे’ काय झाले…त्यानंतर रायबा सोबत…जाणून घ्या अपूर्ण इतिहास…आणि आज सुद्धा..

लाईफ स्टाईल

आपल्यातील प्रत्येक मराठी माणसाला तानाजी मालुसरे आणि त्याचा इतिहास अगदी तोंड पाठ आहे, आपल्याला माहित आहे कि कोंढाण्याच्या स्वारीमध्ये तानाजी मालुसरे याचा मृ त्यू झाला, पण त्याच्या मृ त्यू नंतर त्याच्या मुलांचे म्हणजेच रायबाचे काय झाले हे आपल्यातील अजून बऱ्याच लोकांना माहित नाही आहे तर आज आपण त्याच बदल जाणून घेणार आहोत.

तानाजी मालुसरे हे एक शूर आणि प्रसिद्ध मराठा योद्धा होते, ज्यांचे नाव पराक्रमाचे प्रतिशब्द आहे. ते एक महान यो द्धा तर होतेच पण ते छत्रपती शिवाजी राजेंचे एक अतिशय विश्वासू मित्र आणि सरदार होते. ४ फेब्रुवारी १६७० च्या यु द्धात त्यांनी त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. जिथे त्यांनी मोगल किल्ल्याचा कि ल्लेदार उदयभान राठोड याच्या वि रुद्ध शेवटच्या श्वा सापर्यंत ल ढा दिला.

या ल ढाईमुळे म राठ्यांच्या स्वरा ज्यात कोंढाणासारखा महत्वाचा किल्ला आला. परंतु याच ल ढाई त्यांना वीर म रण आले. दुः ख व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले “गड आला पण सिंह गेला” आणि कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले. “आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे ” असे नरवीर तानाजी मालुसरे म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांचा वि वाह आणि कोंढाण्याचे यु ध्द एकत्र आले.

परंतु तान्हाजींनी कोंढाण्याचे यु ध्द जिंकून कोंढाणा गड ताब्यात आणून दिला. पुढे तान्हाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा यांचे काय झाले हेच आपण जाणून घेणार आहोत. तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात अ जराम र झाले आहे. तान्हाजी मालुसरे धा राती र्थी पडल्यानंतर स्वत: शिवाजी महाराजांनी उमरड येथे जाऊन रायबाचे ल ग्न लावून दिले. इ. स १६७४ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेजवळ एका डोंगरावर एक किल्ला बांधला.

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. किल्ले पारगड महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला एक नितांत सुंदर किल्ला. चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे.

पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाचा साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. या हिरव्यागार वनश्रीनेच त्याच्याकडे खेचायला होते. चारही बाजूला अतिशय घनदाट जंगल असलेल्या पारगडावर १६७६ साली छत्रपती शिवाजी महाराज स्वत: उपस्थित होते.

त्यांच्या उपस्थितीतच पारगडचा गृहप्रवेश आणि वास्तुशांती पार पडली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांना पारगडचा किल्लेदार नेमले. रायबा मालुसरे यांच्यासोबत शेलार मामा होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृ त्यू नंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मो घलांची पारग डावर अनेक आ क्रमण झाली.

मावळ्यांनी गड सु रक्षित ठेवला. रायबा मालुसरेंना पारगडाचे किल्लेदार नेमले तेव्हा एक राजाज्ञा दिली होती. ती म्हणजे, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत गड जा गता ठेवा. छत्रपतींच्या मृ त्यू नंतरही तान्हाजी मालुसरे यांच्या वं शजांनी पारगड जा गता ठेवला आहे. तान्हाजी मालुसरे यांचे ११ वे वं शज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोडींबा शेलार, गडावरील झेंडे लावण्याचे काम असलेले बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे, घोडदळ प्रमुखांचे वं शज विनायक नांगरे, गडकर्यांचे वं शज शांताराम शिंदे, त्याच्याबरोबर तो फखाना प्रमुख विठोजी मिळवू यांचे वं शज आजही पारगडावर वास्तव्यास आहेत.

इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखा न याने पारगड घेण्यासाठी गडा शेजारच्या रामघाटात तळ ठो कला. पण गडावरील केवळ पाचशे सै निकांनी मु घल सै न्यावर छु पे ह ल्ले करून त्यांना पुरते है राण केले. शेवटी खवासखा नने सावंतवाडीच्या खेमसावंताना कु मक घेऊन येण्यास सांगितले. पण गडावरील सै न्याने त्यांनाही दाद दिली नाही.

अखेर कंटाळून खवासखा न रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मो घलांनी पारगडासमोर सपशेल हार प त्करली. याच ल ढा ईत गडावरील तो फ खान्याचे प्रमुख विठोजी माळवे धा राती र्थी पडले. त्यांची स माधी आजही गडावर आहे. भक्कम नैसर्गिक सं रक्षण रचनेमुळे व गडावरील इमानी मावळय़ांमुळे याच्या निर्मितीपासून पुढे तब्बल १८१ वर्षे पारगड अजिंक्य राहिला.

शिवरायांच्या माघारी त्यांच्या मृ त्यू नंतर सुमारे ३४० वर्षे हा गड त्या शू र मावळ्यांच्या वारसांनी आजही जा गता ठेवलाय. पारगड अजिंक्य होता आणि अजिंक्यच राहिला. असा हा इतिहास संपन्न किल्ले पारगड जुन्या अवशे षांनी व अजूनही नांदत्या गडकऱ्यांच्या घरांनी जागता असून, निसर्गानेही संपन्न आहे. तर ही होती आपले इतिहास गा जवणारे तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे पुत्र रायबा यांची माहिती.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.