तानाजी मालुसरे याच्या मृत्यू नंतर ‘रायबाचे’ काय झाले…त्यानंतर रायबा सोबत…जाणून घ्या अपूर्ण इतिहास…आणि आज सुद्धा..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे हया अजरामर झालेल्या वाक्यामधील रायबाचे लग्न नंतर कसे झाले व त्यांनी त्या काळात काय केले हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. आजच्या लेखात आपण नरवीर तानाजी मालुसरे व त्यांचा पुत्र रायबा यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.

1665 साली मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या तहानुसार शिवाजी महाराजांच्या अखत्यारीतील जवळपास 23 गड आणि किल्ले हे मिर्झाराजे जयसिंग यांना देण्यात आले होते. त्यापैकी कोंढाणा अर्थातच सिंहगडावर राजमाता जिजाऊ यांचे विशेष प्रेम होते. या किल्ल्याचा सुभेदार उदयभान हा त्याठिकाणी जनानखाना चालवत होता.

त्यामुळे जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला कोणत्याही परिस्थितीत मोघलांच्या ताब्यातून सोडवून घ्यायचा होता. ही मोहीम फत्ते करण्यासाठी तानाजी मालुसरे पुढे सरसावले त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपला मुलगा रायबाचे अगदी जवळ आलेल्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आले होते.

मात्र आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला सारत आधी स्वराज्याची जबाबदारी स्वीकारण्यास त्यांनी प्राधान्य दिले व त्यांनी कोंढाणा किल्ला मोघलांशी धीरोदात्तपणे ल ढवून स्वराज्याचे निशाण फडकावून शिवरायांच्या चरणी अर्पण केला. ही मोहीम फत्ते करत असताना तानाजी मालुसरे ल ढता-ल ढता धारातीर्थी पडले.

आपल्या विर सरदाराच्या स्मरणार्थ छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले. तानाजी मालुसरे  ह्या निधड्या छातीच्या सिंहाच्या मृ त्युनंतर त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी शिवरायांनी घेतली. शिवाजी महाराजांनी उमरड येथे जाऊन रायबाचे लग्न लावून दिले.

इ.स १६७४ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेजवळ एका डोंगरावर एक किल्ला बांधला. चारही बाजूला अतिशय घनदाट जंगल असलेल्या पारगडावर १६७६ साली छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच पारगडचा गृहप्रवेश आणि वास्तुशांती पार पडली.

तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांना पारगडचा किल्लेदार नेमले. रायबा मालुसरे यांच्यासोबत शेलार मामा होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृ त्यूनंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोघलांची पारगडावर अनेक आ क्रमण झाली पण मावळ्यांनी गड सुरक्षित ठेवला. रायबा मालुसरेंना पारगडाचे किल्लेदार नेमले तेव्हा एक राजाज्ञा दिली होती.

ती म्हणजे, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत गड जागता ठेवा. छत्रपतींच्या मृत्यूनंतरही तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनी पारगड जागता ठेवला आहे. तान्हाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोडींबा शेलार, गडावरील खींडी लावण्याचे काम असलेले बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे..

घोडदळ प्रमुखांचे वंशज विनायक नांगरे, गडकर्यांचे वंशज शांताराम शिंदे, त्याच्याबरोबर तोफखाना प्रमुख विठोजी मिळवू यांचे वंशज आजही पारगडावर वास्तव्यास आहेत. तो फखाना प्रमुख विठोजी माळवे हे एका यु द्धात धारातीर्थी पडले त्यांची समाधी आजही पारगडावर बघायला मिळते. पारगड अजिंक्य होता आणि अजिंक्यच राहिला.

इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखा न याने पारगड घेण्यासाठी गडा शेजारच्या रामघाटात तळ ठो कला. पण गडावरील केवळ पाचशे सै निकांनी मु घल सै न्यावर छु पे ह ल्ले करून त्यांना पुरते है राण केले. शेवटी खवासखा नने सावंतवाडीच्या खेमसावंताना कु मक घेऊन येण्यास सांगितले. पण गडावरील सै न्याने त्यांनाही दाद दिली नाही.

अखेर कंटाळून खवासखा न रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मो घलांनी पारगडासमोर सपशेल हार प त्करली. याच ल ढा ईत गडावरील तो फ खान्याचे प्रमुख विठोजी माळवे धा राती र्थी पडले. त्यांची स माधी आजही गडावर आहे. भक्कम नैसर्गिक सं रक्षण रचनेमुळे व गडावरील इमानी मावळय़ांमुळे याच्या निर्मितीपासून पुढे तब्बल १८१ वर्षे पारगड अजिंक्य राहिला.

शिवरायांच्या माघारी त्यांच्या मृ त्यू नंतर सुमारे ३४० वर्षे हा गड त्या शू र मावळ्यांच्या वारसांनी आजही जा गता ठेवलाय. पारगड अजिंक्य होता आणि अजिंक्यच राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *