आपण पाहत असाल कि सध्या प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक फ्याड आलं आहे ते म्हणजे, बायोपिकचे आता आपण म्हणाल कि बायोपिक म्हणजे नेमके काय बरं? तर आपणांस सांगू इच्छितो कि बायोपिक म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनावर आधारित एक वास्तवदर्शीत सिनेमा म्हणजे बायोपिक, आता आपण काही वर्ष पहिले असेल कि अनेक दिग्ग्ज लोकांचे बायोपिक लोकांच्या भेटीला आले होते.
त्यामध्ये मग आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी याचा बायोपिक, तसेच संजय दत्त, धोनी, सचिन, यासारखे अनेक लोकांच्या आयुष्यावर चित्रपट आले तसेच कपिल देव, सायना नेहवाल याच्या आयुष्यावर सुद्धा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. पण या सर्व चित्रपटांमध्ये हवा झाली ती एकाच बायोपिकची ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे तसेच मराठी जनतेचे कैवारी आणि आपले सगळ्यांचे लाडके हिं दू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याच्या बायोपिकची.
आणि महाराष्ट्रातील तसेच जगातील कोणत्याही व्यक्तीने जर का चित्रपट पहिला असेल तर त्याच्या म नात बाळसाहेब ठाकरेबद्दलचा आदर अजून वाढला असेल, कारण त्याचा असणारा सं घर्ष आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी केलेले काम इतकेच काय तर त्याच्या एका शब्दाने दिल्लीतील स रक राची देखील हवा टाईट व्हायची, असा त्याचा दरारा होता आणि हा संपूर्ण दरारा अनेक लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.
त्यांनी केलेले काम, म नात असणारा मराठी भाषेबदलचा आदर, तसेच रा जका रणात राहून देखील त्यांनी जोडलेली अनेक मंडळी यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या म नात बाळासाहेबांविषयी नितांत आदर आहे. पण त्याच्यावर बायोपिक हा बनला पाहिजे असा विचार कोणाच्या मनात सर्व प्रथम आला असेल तर ते व्यक्ती म्हणजे संजय राऊत, मग काय त्यांनी चित्रपट बनवायचा चंगच बांधला.
त्यानंतर लगेच ही कल्पना उद्धव ठाकरे याना सांगण्यात आली आणि त्याच्याकडून सुद्धा होकार आला, त्यानंतर मात्र प्रत्येक कामाने वेग घेतला. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला लोकांनी उत्तम आणि भरभरून प्रतिसाद दिला. आपल्याला कदाचित माहित असेल कि या चित्रपटांचे दिग्दर्शन हे संजय राऊत आणि अभिजीत पानसे यांनी केले. पण त्याच्या समोर सर्वात मोठा प्रश्न होता कि बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वासाठी कलाकार म्हणून कोणाला घ्यायचे.
तसेच हा चित्रपट तेव्हाच हि ट झाला होता जेव्हा याची प्रथम संकल्पना मांडली होती, पण त्यानंतर हा चित्रपट आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला तो म्हणजे बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकी याना कास्ट केल्यावर. जेव्हा या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला तेव्हाच लोकांना ध क्का बसला होता, कारण बाळासाहेबांच्या भूमिकेत नवाजला पाहून खरंच बाळासाहेब आवतरले होते कि काय असे वाटत होते.
त्यावेळी नवाज या भूमिकेत परफेक्ट दिसेल अशी कोणी सुद्धा कल्पना केली नव्हती. अर्थात तो एक उत्कृष्ट कलाकार आहेच त्यामुळे त्याने केलेल्या बाळासाहेबांच्या भूमिकेचं सर्वच स्तरातून भरभरून कौतुक झालं! पण आपणांस सांगू इच्छितो कि या चित्रपटांसाठी एका वेगळ्याच कलाकाराचा विचार केला गेला होता, या बाळासाहेबांच्या भूमिकेमध्ये सर्वप्रथम दिवंगत अभिनेता इरफान खान याची निवड झाली होती.
होय आपल्याला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण सिनेमाच्या प्रदर्शनावेळीच डायरेक्टर रोहन मापूसकर यांनी म्हंटलं हॊत कि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी इरफान खानची निवड करण्यात आली होती. यावर अगदी संजय राऊत आणि अभिजीत पानसे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली होती आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला होकार दिला होता.
पण अचानक इरफानच्या आ जा राची बातमी धडकली, त्याच्या या असणाऱ्या आ जारामुळे तसेच त्याच्या इतर फिल्म शुटींगच्या डे ट्समुळे इरफानऐवजी नवाजला हा रोल देण्याच फिक्स करण्यात आलं. त्यानंतर नवाजला मातोश्री वरून फोन गेला कि तुम्ही भेटायला या, त्यानंतर नवाजला सुद्धा धक्का बसला, कि आपलं कोठे काय चुकले आहे का? आपल्याला का बरं बोलावलं असेल असे अनेक प्रश्न त्याच्या म नात आले होते.
आणि याचा खुलासा त्याने स्वतः केला होता. त्यानंतर जेव्हा तो मातोश्रीवर पोहचला आणि जेव्हा त्यांना सांगण्यात आले कि तुम्हाला बाळासाहेबांची भूमिका करायची आहे. त्यानंतर नवजाला सुद्धा असे वाटले कि आपण स्वप्नात तर नाही ना, त्यानंतर नवाजने सुद्धा लगेच होकार दिला आणि या चित्रपटाला गती मिळाली.
नवाजूद्दीनने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय बाळासाहेब हे उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, हावभाव हातवारे आणि बॉडी लॅंगवेज हे सगळं नवाजने हुबेहूब पडद्यावर मांडलं! पण ही भूमिका जरी इरफान खानने केली असती तरी त्याला सुद्धा लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला असता. कारण इरफानचा अभिनय आपण सर्वानी पहिला आहेच त्यामुळे एका वेगळ्या स्वरूपात बाळासाहेब आपल्यासमोर दिसले असते.
पण आज इरफान खान आपल्यामध्ये नाही आहे पण त्याच्या अनेक भूमिका आज सुद्धा आपल्या मनात कायम आहेत, तसेच आपल्याला सुद्धा इरफान खानला बाळासाहेबांच्या भूमिकेत बघायला आवडले असते का हे क में ट करून आम्हाला नक्की सांगा तसेच जर का आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.