कदाचित आपल्याला माहित असेल कि भारताच्या पूर्वेकडील ओरिसा राज्य हे बंगाल, झारखंड, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यांच्या सीमांनी जोडलेले असून ऐतिहासिक काळी कलिं ग राज्य म्हणून प्रसिद्ध होते. आणि सम्राट अशोकाने जेंव्हा कली ग राज्यावर आक्रमण केले तेव्हा झालेला र क्तपात, जी वितहा नी पाहून त्याने बुद्धध र्म स्वीकारला.
हा इतिहास तर आपल्याला महितीच आहे. पण ओरिसा म्हणल्यावर सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येते ते कोणार्कचे सूर्यमंदिर. भारतीय स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना असलेले कोणार्क सूर्यमंदिर कलिं ग शैलीचे उदाहरण आहे. भगवान जाग्न्नाथांच्या मंदिरापासून ४० किमी अंतरावर असलेल्या या मंदिराची अनेक रहस्ये आहेत.
या भागात आपण त्याच रहस्यांची माहिती घेणार आहोत. कोणार्क हा शब्द कोण आणि अर्क या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. अर्क याचा अर्थ आहे सूर्य आणि कोण म्हणजे किनारा. सूर्याचा कोपरा असे देखील आपण याला म्हणू शकतो. तर आपणांस सांगू इच्छितो कि कोणार्क मंदिर हे लाल रंगाच्या सॉडस्टोन आणि काळ्या ग्रानाईट दगडांपासून बनवलेले आहे.
गंगा वेशातील राजा नरसिंहदेव यांनी आपल्या घराण्याचे वर्चस्व सिध्द करण्यासाठी हे मंदिर बांधण्याची घोषणा केली होती. बाराशे स्थापत्यकार आणि तेवढ्याच कारागिरांनी आपल्या स र्जनशिलतेने आणि सामर्थ्याने बारा वर्षे खपून हे मंदिर बांधण्यात आले. तरी सुद्धा या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. तेंव्हा बिसू महाराणा यांचा मुलगा ध र्मपाद यांनी हे बांधकामं पूर्ण करण्याची तयारी दाखवली.
त्याला मंदिर बांधकामाचे व्यावहारिक ज्ञान नसले तरी त्याने स्थापत्यशास्त्राचा अभ्यास केला होता. त्याने कामगारांना मंदिराच्या शेवटचा मध्यवर्ती दगड बांधण्यासाठी सांगितले, आणि मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. पण यानंतर या कलाकाराचा मृ तदेह समुद्रकिनारी सापडला. असे मानतात कि, आपल्या लोकांच्या हितासाठी त्याने आपले प्रा ण दिले होते.
तसेच मंदिराची रचना अश्याप्रकारे केली गेली आहे कि, सूर्य भगवान आपल्या रथावर आरूढ होऊन पुढे जात आहेत. मंदिरातील सर्व कोरीवकाम अतिशय कल्पकतेने केले आहे. सूर्यदेवाच्या रथाच्या आकारात मंदिराचे बांधकाम केले आहे. या रथात १२ मीटर रुंद धातूनी बनवलेल्या चाकांच्या २ जोड्या असून त्यासमोर सात घोडे आहेत, त्यापैकी चार उजवीकडे तर तीन डावीकडे आहेत. सध्या त्यापैकी एकच घोडा शिल्लक आहे.
मंदिराची रचना अशा प्रकारे केली गेली आहे, सूर्याचा पहिला किरण थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडेल. मंदिराची उंची २२९ फूट म्हणजेच ७० मीटरइतकी आहे. या मंदिरात सूर्यदेवाच्या तीन मूर्ती तयार केल्या आहेत. तसेच कोणार्क मंदिराची काही रहस्यमय वैशिष्टय आहेत ते आपण पाहुयात.
कोणार्क मंदिराची रहस्ये:- मंदिराच्या माथ्यावर १ जड चुंबक ठेवण्यात आले होते आणि मंदिराचे प्रत्येक दगड २ लोखंडी तटांनी सुशोभित केले आहे. असे म्हंटले जाते कि या चुंबकामुळे मूर्ती हवेत तरंगताना दिसते.
- सूर्य हे उर्जा आणि जी वनाचे प्रतिक मा नले आहेत. म्हणूनच रो गांचे उपचार करण्यासाटी सूर्यमंदिर सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे.
- मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या पायथ्याशी १२ चाकांच्या जोड्या आहे. त्यावरून वेळ सांगता येते. या चाकांची सावली पाहून दिवसाच्या नेमक्या वेळेचा अंदाज बांधता येतो.
- मंदिराच्या वरचा मजला लोखंडी किरणांनी बनवलेला आहे. मुख्य मंदिर शिखराच्या बांधकामात ५२ टन चुंबकीय लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मंदिर रचना हि समुदाच्या हालचाली सहन करण्यास सक्षम आहे.
- असे असले तरी मंदिर गेली ११८ वर्षे बंद आहे. मंदिरातील महत्त्वाचा भाग तब्बल ११८ वर्षांपासून वाळू भरून बंद करण्यात आला आहे. काय कारणे असतील मंदिर बंद ठेवण्याची? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मंदीर इतकी वर्षे बंद का आहे:- वाढत्या प्रदूषणामुळे या प्राचीनवस्तूला धो का निर्माण झाला होता, त्यामुळे आतील कलाकुसर खराब होत होती. आणि हा ठेवा पुढील पिढीपर्यंत टिकवून ठेवता यावा, यासाठी १९०३ मध्ये तत्कालीन गव्हर्नर जॉन वूडबर्न यांनी जगमोहन मंडपाच्या भिंतीची उंची वाढवली आणि वाळू भरून मंदिराचा मुख्य दरवाजा बंद केला.
या काळात पुरातत्व अभ्यासकांनी हि वाळू काढून टाकण्याची मागणी केली. दरम्यान सीबीआरआयच्या टीम ने इंडोस्कोपी करून मंदिराच्या आतील भागाचे फोटो काढले. सध्या या फोटोच्या आधारे आभ्यास सुरु आहे.