डॉक्टर, अंगावरून पां ढरं जातंय..काय करू?…तर सर्वात आधी करा हे काम अन्यथा भविष्यात आपल्याला होऊ शकतात हे गंभीर रो ग

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, अं गावरून पां ढरा स्त्राव जाणं म्हणजेच ल्यूको रिया आणि यामुळेच यो नी मार्गाचा बाहेरील भाग जास्त प्रमाणात ओला राहतो. हा पां ढरा स्त्राव किंवा हा जादा ओलसरापणा कोणत्याही वयात होऊ शकतो. वेगवेगळ्या वयातल्या बालिका, मुली, तरुणी आणि वयस्कर महिला या ही एकच स मस्या घेऊन खूप वेळा स्त्रीरो गतज्ञांच्या क्लि निक मध्ये येतात. किंबहुना कोणत्याही स्त्रीरो गतज्ञांच्या क्लि नीकमध्ये हे पे शंट सर्वात जास्त असतात.

या पे शंटमध्ये मुख्य दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात पे शंट या पां ढरं जाण्यामुळे पूर्णपणे धा स्तावून गेलेली असते. कितीही वेळा तपासून औ षधे दिली, काही प्रॉ ब्लेम नाहीये असं सांगितलं तरी त्यांचं समाधान होतच नाही. दुसरा प्रकार मात्र जरा धो कादायक आहे या स्त्रि यांना योग्य उपचार आणि गरजेच्या तपासण्या करून घ्या असं कितीही सांगितलं तरी त्या सोयीस्कर रित्या गायब होतात आणि खूप त्रा स झाल्याशिवाय शक्यतो परत येत नाहीत.

अं गावर पां ढरे जाणे हे नक्की काय आहे? आणि वयानुसार कसे बदलत जाते हे आपण आता बघूया. सर्व प्रथम हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्या तोंडाच्या आतल्या भागाप्रमाणेच यो नीमार्ग हा ओलसर राहणेच अपेक्षित आहे, किंबहुना हा भाग पुरेसा ओलसर नसेल तर वेगवेगळ्या आ रोग्यस मस्यांना आमंत्रण देतो.

नैसर्गिक रित्या त्यासाठीच यो नीमार्गातल्या ग्रंथी हा पां ढरा स्त्राव निर्माण करत असतात. या स्त्रावामुळे यो नीमार्गाची प्रतिकारशक्ती चांगली राहते व वेगवेगळ्या जं तुसं सर्गापासून यो नीमार्गाचे संरक्षण होत असते. कोरडा पडलेल्या यो नी मार्गात ल घवीचा जं तुसं सर्ग ही फार पटकन होऊ शकतो. अगदी लहान बालिकांमध्ये म्हणजेच ज न्माच्या पहिल्या दिवसापासूनही मुलीच्या अं गा वर पां ढर जात असल्याची उदारहरणं आढळत असतात.

ज्या अ र्भ काच्या अं गावर पांढरं जात असतं, तिची आई किंवा न र्स यांच्या ते लक्षात येऊ शकतं. चार पाच वर्षा पर्यंतच्या मुलीच्या अं गावर जात असेल तर, तेही आई किंवा न र्सला समजू शकतं. कारण या वयापर्यंतच्या मुलीची अंघोळ, स्वच्छता त्याच करीत असतात. चौदा दिवसांपर्यंत ज्या मुलींच्या अं गावर जातं तो पांढरा स्त्रा व जास्त चिकट असू शकतो. अर्थात हा स्त्राव लक्षात आल्यावर त्याची गं भीर दखल घेण्यासारखं काही नसतं.

नि र्जंतूक कापसाच्या बोळ्यानं तो अवयव स्वच्छ ठेवावा एवढी काळजी मात्र घ्यावी. इतर कोणत्याही उपचाराची आवश्यकता नाही. नवजात अ र्भ काच्या अंगावर पां ढरा स्त्रा व जायचं कारण म्हणजे आईची हा र्मोन्स अ र्भ काच्या र क्तात मिसळतात. पौ गंडावस्थेतील मुलींमध्ये ज नन संस्था परिपक्व होऊ लागते तसतसा यो नीमार्गात पांढरा स्त्राव थोडा वाढू लागतो.

पा ळी सुरू होण्याच्या वेळेपर्यंत हे बदल चालू राहतात. पा ळी सुरू झाल्यावर हा पांढरा स्त्राव बहुतांशी हॉ र्मोन्सच्या चक्राप्रमाणे बदलत असतो. दरवेळी पा ळी सुरू होण्याआधी, नंतर आणि दोन पा ळ्यांच्या मध्ये जेव्हा स्त्रीबीज तयार होते तेव्हा हा स्त्राव थोडा जास्त प्रमाणात असतो. आता स्त्रियांना प्रश्न असा पडतो की मग हा स्त्राव नॉ र्मल आहे की नाही हे कसं ओळखायचं?

तर या स्त्रा वामुळे खा ज, ज ळज ळ अथवा वाईट वास असे त्रास होत असतील तर हे पांढरं जाणं बरोबर नाही आणि स्त्रीरो ग त ज्ज्ञांचा सल्ला लगेच घ्यावा हे उत्तम! यो नी मार्गाचा PH (म्हणजे आ म्लतेचा निर्देशांक) हा ऍ सि डीक असतो . या ऍ सिडीक PH मुळे वेगवेगळ्या जं तुसं सर्गापासून यो नीमार्गाचे रक्षण होत असते. पा ळी जेव्हा सुरू होते तेव्हा र क्ताचा PH अल्कलाईन असल्यामुळे यो नीमार्गाचाही PH बदलतो आणि त्या काळापूरती यो नीमार्गाची प्रतिकारशक्ती कमी होते.

त्यामुळे बहुतांशी यो नीमार्गाचे जं तुसं सर्ग पा ळीच्या नंतर दिसून येतात. यो नी मार्गाच्या जं तुसं सर्गाबद्दल स्त्रियांमध्ये अनेक गैरसमज दिसतात. सर्वात त्रा सदायक गैरसमज म्हणजे हे सं सर्ग बाहेरचं अथवा सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्यामुळे होतात हा आहे. यो नी मार्गाचे कोणतेही सं सर्ग हवेतून होत नाहीत. कोणत्याही स्वच्छता गृहामध्ये आजूबाजूला स्पर्श न करता स्त्रिया आपला कार्यभाग आटोपु शकतात, मग जं तुसं सर्ग कसा होऊ शकेल?

आणि अगदी क मो डचा स्पर्श झाला तरी लगेच जं तुसं सर्ग होईल असे अजिबात नाही. याबाबतीत सार्वजनिक स्वच्छता गृहांमध्ये भारतीय सं डा स उत्तम असे नमूद करावेसे वाटते कारण ते स्वच्छ ठेवणे सोपं आहे. काहीही झालं तरी बाहेरचं टॉ य लेट वापरायचं नाही या भयगंडामुळे स्त्रिया वेळेवर ल घवीला जात नाहीत, ल घवी दाबून ठेवतात आणि त्यामुळे ल घवीचा जं तुसं सर्ग निश्चित होऊ शकतो.

त्यामुळे स्त्रियांनी ही भीती मनातून काढून टाकावी तसेच स्त्रियांना कुठेही स्वच्छतागृह उपलब्ध असणे ही महत्त्वाची सा माजिक गरज आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यो नीमार्गाचा सं सर्ग आणि ल घवीचा सं सर्ग यात स्त्रिया नेहेमी गल्लत करतात. बऱ्याच वेळा या दोन्ही प्रकारच्या जं तुसं सर्गाच्या लक्षणांमध्ये थोडेफार साम्य असते. काही स्त्रिया औ षधांच्या दुकानातून किंवा स्वतःच्या मनाने वाट्टेल ती औ षधं घेतात.

याचा परिणाम असा होतो की जं तुसं सर्ग बरा तर होत नाहीच पण चुकीची अँ टिबा योटिक्स आणि क्रि म्स वापरल्यामुळे औ षधांना न जुमानणारे जं तुसं सर्ग होऊन बसतात. आजकाल असे खूप प्रकारचे जं तुसं सर्ग आम्ही स्त्रीरो गतज्ज्ञ बघत आहोत. असे जं तुसं सर्ग बरे करायला मग अक्षरश: काही आठवडे, कधीतरी महिने लागू शकतात. तेव्हा योग्य वेळी स्त्री रो गत ज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. तर मैत्रिणींनो ह्या स मस्येबद्दल तुमच्या थोड्या तरी शंकांचं समाधान झालं असेल अशी आशा करते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *