नमस्कार मंडळी, आपली भारत भूमी हि देवादिकांची, शुरविरांची भूमी मानली जाते. इथे अनादी आणत काळापासून अनेक देव देवतांनी अवतार घेऊन त्यांचे इच्छित कार्य पूर्ण केले आहे, त्याबद्दलच्या आणत आख्यायिका आपल्याला माहित आहेत. असे म्हणतात कि भारतात दर बारा किलोमिटरवर एक देऊळ आहे.
त्यातली अनेक मंदिरे हि अतिप्राचीन आणि भव्यदिव्य स्वरुपात नावारूपाला आलेली आहेत हे आपल्याला माहित आहेच. याच मोठमोठ्या मंदिरांचे तीर्थक्षेत्र बनत असते. अशी अनेक तीर्थ क्षेत्रे आपल्या भारतात आहेत. जिथे भाविक मोठ्या श्रद्धेने आणि आस्थेने आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी दर्शनाला जात असतात.
श्री क्षेत्र जेजुरी आणि तिरुपती हि दोन स्थाने त्यापैकीच आहेत. तिरूपती बालाजीचे मंदिर माहित नाही असा एकही भारतीय आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी बालाजीचे दर्शन घ्यावे हि आपल्या सर्वांचीच इच्छा असते. तिथल्या झाग्मागातामध्ये अनेक भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी गर्दी करत असतात. अश्या या बालाजीची ख्याती देसातच अन्ही तर विदेशात सुद्धा पसरली आहे.
कुबेर बालाजीच्या घरात पाणी भरतो असे म्हणले जाते. अश्या या लखपती, आणि धनाढ्य तीरुपतीने कधीही कर्ज घेतले असेल असे आपल्याला वाटते का? नाही न? परंतु हि गोष्ट सत्य आहे. साक्षात धनदेव बालाजीने आपल्या आयुष्यात एकदा कर्ज घेतले होते. ते सुद्धा जेजुरीच्या खंडेराया कडून विश्वास नाही बसत ना? वाचा मग पुढची कहाणी..
महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे श्री क्षेत्र जेजुरी आपल्या लाडक्या खंडेरायाची सोन्याची जेजुरी. डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. जेजुर गडाला सोन्याची जेजुरी का म्हणत असतील बर? अहो अर्थातच खंडेराया देखील श्रीमंत आणि धनवान होता म्हणून.
कर्ज मागण्याचे कारण काय? मुळातच श्रीमंत असणाऱ्या बालाजीने खंडेरायाकडे कर्ज का मागितले हा प्रश आपल्याला नक्कीच पडला असेल न? तर कर्ज मागण्याचे कारण होते विवाह. व्यंकटेश अवतारात भगवान विष्णूनी देवी पद्मिनीसोबत विवाह करण्याचे ठरवले होते हे तर आपल्याला माहित आहेच. आता हा विवाह का करण्यात आला याचे उत्तर आपल्याला समुद्रमंथनाच्या कहाणीतून मिळेल.
समुद्रमंथनातून निघालेल्या देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंच्या हृ दयात वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला होता. एकदा भृगु ऋषी त्यांना भेटावयास आले असता श्रीविष्णू देवीच्यासोबत वेळ घालवण्यात व्यस्त होते, ते पाहून राग अनावर झालेल्या ऋषींनी त्यांना शा प देण्याचे ठरवले असतानाच श्रीविष्णुनी त्यांची क्षमा मागितली आणि श्राप देऊ नये अशी विनंती केली, परंतु राग अ नावर झालेल्या ऋषींनी त्यांच्या छातीवर लाथ मा रली आणि ते तेथून निघून गेले.
हा प्रसंग लक्ष्मी देवीनी पहिला, आपले स्थान जिथे आहे तिथे एका ऋषींनी लाथ मारली आणि आपल्या स्वामिनी काहीच केले नाही म्हणून त्यांचा क्रो ध अनावर झाला. आणि त्या तेथून निघून गेल्या. आपली प्रा ण प्रिय पत्नी कुठे गेली याचा शोध जेंव्हा विष्णूनी घेतला तेव्हा त्यांना समजले कि त्या पद्मिनी रुपात पृथ्वीवर अवतरीत झाल्या आहेत, म्हणून भगवान विष्णूनी सुद्धा श्रीव्यंकटेश अवतार घेऊन त्यांच्यासोबत विवाह करण्याचे ठरवले.
यथा अवकाश त्यांचा विवाह ठरला. हा विवाह मोठ्या दिमाखात करावा अशी व्यंकटेशशाची इच्छा होती. त्यासाठी लागणारी आवश्यक संपत्ती त्यांच्याकडे नव्हती. ही संपत्ती कोठून आणावी हा विचार त्यांच्या मनात चालू असतानाच, त्यांना जेजुर्गादाची आठवण झाली, तेथून कोणीही रिकाम्या हाती परत येत नाही हि अखायिका त्यांनी ऐकली होती. तेव्हा जास्त वेळ ण घालवता त्यांनी सेवका मार्फत आपला निरोप खंडोबा देवाला पाठवला.
खंडोबाने देखील बालाजीची अडचण समजून त्यांना सेवकामार्फत बैलगाड्या भरून सुवर्ण मुद्रा पाठवून दिल्या. हि रक्कम जेव्हा बालाजीनी मोजली तेंव्हा त्या तब्बल सात कोटी सुवर्ण मुद्रा असल्याचे लक्षात आले. पुढे याच मदतीतून बालाजी आणि देवी पद्मिनी यांचा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला.